१०. धाडसी हाली
पुरस्कारासह हाली बरफ |
तुम्हाला कशाची भीती वाटते ? कोणी म्हणेल, "झुरळाला. कोणी म्हणेल छट, झुरळाला काय घाबरायच ? आपण जवळ गेलो तरी ते पळून जात कोणी म्हणेल, मला अंधाराची भीती वाटते. त्यावर कोणी म्हणेल, 'अधाराची भीती? त्यात काय असतं घाबरण्यासारख ? दिवा लावला की अधार गायक ! पण समजा तुम्हाला कोणी विचारल, की तुमच्यासमोर एखादा वाघ किंवा बिबट्या उभा आहे. तर तुम्हाला काय वाटेल?' छे! वाघाला काय घाबरायच ? अस म्हणायची हिंमत कोणी करेल ? नाही ना? पण पुरस्कारासह हाली बरफ आपण अशा एका मुलीला भेटणार आहोत जी वाघाला घाबरून पळाली नाही. उलट तिने वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले. हाली बरफ ही ती धाडसी मुलगी. या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे मा. प्रधानमंत्र्याच्या हस्ते सन २०१३ मध्ये 'वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण आहे. या धरणाच्या परिसरात अभयारण्य आहे. तेथे विविध प्रकारचे जगली प्राणी आहेत. या भागात वेगवेगळ्या पाड्यावर आदिवासी राहतात. त्यांचे जीवन जंगलावर अवलंबून आहे. त्यामुळे जंगलात त्यांचा सतत आणि सहज वावर असतो. जगलाची, तिथल्या प्राण्याची त्यांना खडान्खडा माहिती असते. ते निर्भय असतात. जगल ही आपली संपत्ती आहे. तिचे संवर्धन कसे करावे हे आदिवासी जाणतात.
तानसा धरणाच्या परिसरातील आटगावजवळ नांदगावच्या जमनाचा पाडा आहे. तेथे हाली बरफ ही मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. निसर्गाच्या सहवासात लहानाची मोठी झालेली पाणीदार डोळ्याची, सावळ्या रंगाची, काटक हाली बरफ ही वारली या आदिवासी समाजाची आहे. हालीचे वडील रघुनाथ हे रेल्वेत कामाला होते. एका अपघातात त्याचा एक हात निकामी झाला. घरच्या गरिबीशी झुंज देणाऱ्या हालीने नेमके कोणते धाडस दाखवले ? चला, आपण तिच्याकडूनच ऐकूया. हालीची घेतलेली ही मुलाखत काळजीपूर्वक समजावून घ्या .
प्रश्न : तू जंगलात कशासाठी गेली होतीस? तुझ्यासोबत कोण होतं ?
हाली -लाकरा आनाला गेलतू, माझे सोबत माझी मोठी बहीण (शकुंतला) होती. पाठीमागशी बहिणीवर वाघाने हल्ला केला. तिचं पाठीचा लचका तोरला, माडी आनी पायाचा लचका कारला. बहीण जखमी झाली.
प्रश्न हाली तुझ्या बहिणीवर हल्ला केल्यावर तू काय केलस ?
हाली-मी आधी घाबर-घाबरशी झालू मग दगड आपटली. लाब-लांबची लोक आरडावरडा केलवर धावत आली. मी जोरात मोठी-मोठी दगड आपटली वाघाला दगड लागली. मंग वाघ पलून गेला.
प्रश्न- लोकानी काय मदत केली?
हाली- मी आरडावरडा केला. तवा काही लोक लाकरा गोला करीत होती. ती पन धावत आली
प्रश्न-ही गोष्ट बाकीच्या लोकाना कशी समजली ?
हाली-गावच्या लोकांनी सांगला.
प्रश्न-तुझ्या जखमी बहिणीला कुठे नेल ? मग ठान्याचे सिविल हासपिटला नेली.
प्रश्न-तुझी बहीण वाचली का? हाली : बहीण वाचली.
हाली- बहीण वाचली
याबद्दल तुला काय वाटत ?
हाली-आमाला बरा वाटला.
प्रश्न-तू बहिणीला वाचवलस. त्यानंतर तुला कोणीकोणी मदत केली?
हाली- आमचा मामा पाडु किरकिरे यानी लई मदत केली. गावचे लोक, शहापूरचे लोक यांनी सुदिक मदत केली. गावाचे शिक्षकानी सुदिक मदत केली
प्रश्न-तुझे पेपरात नाव आलं, बातमी छापून आली, तेव्हा तुला कस वाटल ?
हाली-चांगला वाटला.
प्रश्न-तू बहिणीला वाचवलस, त्यामुळे तुला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला. तुला दिल्लीला येण्याचे आमंत्रण मिळाले. तू कोणासोबत दिल्लीला गेली होतीस ?
हाली: दिल्लीला माझे सोबत माझी आई, माझा मामा होता.
प्रश्न- दिल्लीला गेल्यावर तुला कस वाटल ? तेथील अनुभव सांग.
हाली -दिल्लीला गेलवर चांगला वाटला. तिथ माझेसारखी दुसरी पन पोरा व्हती. काही पोरांची हत्तीवरशी मिरवणूक काढली. मी मोटारीशी फिरलू, चांगला खायाला मिलाला. खेलाला मिलाला. पंधरा दिस दिल्लीत व्हतू.
प्रश्न,- तुला कोणाच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला ?
हाली-मला प्रधानमंत्र्यांनी पुरस्कार दिला.
प्रश्न : तू किती शिकलीस ?
हाली : मी शाळेन गेलू नाय. आमची गरिबी. कुटुंब मोठा, म्हनून शालेन गेलू नाय.
प्रश्न : तुझ्या धाडसाची घटना वाचणाऱ्या मुलामुलींना तू काय सांगशील ?
हाली : घाबरले नाय पायजे. लोकांना वाचवले पायजे.
प्रश्न : एवढा मोठा पुरस्कार तुला मिळाला. सगळ्यांनी तुझं कौतुक केल. मग तुला काय वाटलं?
हाली : मला चांगला वाटला. पन मला काम मिलाला असता, त जास्ती चांगला वाटला असता.
प्रश्न : सध्या तू काय करत आहेस ? हाली : मी लग्न करून रातांधळे पाड्याला राहती. दिवसभर मोलमजुरी करती.
हालीचे आभार मानून आम्ही निघालो, तेव्हा तिचं धाडस, तिची परिस्थिती यांचाच विचार आमच्या मनात होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा