4- श्रावणमास
श्रावणमास (कविता) |
कवितेचा अर्थ-
श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरते. क्षणात पाऊस पडतो, तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते. ऊनपावसाच हा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. वर आकाशात इंद्रधनुष्याचा दुपेडी गोफ विणलेला दिसतो. इंद्रधनुष्य उमटलेले पाहून असे वाटते की, कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे.
ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला नि संध्याकाळ झाली असे वाटते न वाटते तोच ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे ऊन, उंच घरांवर नि झाडांच्या शेंड्यांवर झळकते. संध्यासमयी ढगांवर असंख्य रंग उमटतात- जणू ते ढग संध्याराग गात आहेत ! सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कुणी (चित्रकाराने) रेखाटले आहे असे वाटते.
आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की, जणू कल्पफुलांचा तो हार आहे आणि जमिनीव बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धरतीवर उतरले आहेत, असे वाटते. नुकत्याच पडून गेलेल्य पावसाने आपले भिजलेले पंख सावरत पक्षी फडफडत आहेत. हिरवळीवर आपल्या पाडसांसोबत सुंदर हरिणी बागडत आहेत.
हिरव्या माळरानावर गाईगुरेवासरे मजेत चरत आहेत आणि गुराखीसुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहेत. गराख्यांच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहेत. सोनचाफा फुलला आहे आणि रानामध्ये सुंदर केवडा दरवळत आहे. फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला, तसे आपले मनही पारिजातक पाहून निवळते.
फुलमालांसारख्या सुंदर मुली सजून-धजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले-पाने खुडत आहेत. देवाचे दर्शन घेण्यासाठी (सुवासिनी) स्त्रिया मंदिराकडे जात आहेत. त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही. त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे. ते गाणे त्यांच्या मुखावर वाचता येते.

प्रश्न1- 'सुंदर बाला या फुलमाला' या ओळीत सारख्या वर्णाचा उपयोग अधिक केल्यामुळे गोड नाद निर्माण होतो. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.
उत्तर : (१) श्रावण मासी हर्ष मानसी (२) तरुशिखरांवर, उंच घरांवर
(३) उठती वरती जलदांवरती
(४) उतरुनि येती अवनीवरती
(५) सुंदर हरिणी हिरव्या कुरणी
प्रश्न 2. पुढील अर्थांच्या कवितेतील ओळी शोधून लिहा :
(१) क्षणात पाऊस पडतो, तर क्षणात ऊन पडते.
उत्तर : क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
(२) झाडांवर, घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते.
उत्तर : तरुशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे.
(३) हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत.
उत्तर : सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.
* प्रश्न 3. पुढील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा : श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे; क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
उत्तर : श्रावण महिन्यात माळरानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येत तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊनपावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते.
मुक्तोत्तरी प्रश्न *
१. पुढील प्रसंगी काय घडते ते लिहा :
(१) पहिला पाऊस आल्यावर ... उत्तर : कडक उन्हाळ्यात वातावरण तापलेले असते. घामाच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो. पहिला पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते. हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिसू लागते पहिला पाऊस सर्व प्राणिमात्रांना हवाहवासा वाटतो.
(२) सरीवर सरी कोसळल्यावर...
उत्तर : आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो. सरीवर सरी कोसळतात, तेव्हा पावसात चिंब भिजावेंसे वाटते. झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशु-पक्ष्यांना मुबलक पाणी मिळते. सर्व सृष्टी न्हाऊन निघते. पशु पक्षी निवारा शोधतात. शेतकरी आनंदित होतात.
२. निरीक्षण करा व लिहा : श्रावण महिन्यातले तुम्ही पाहिलेले आकाशातील विशेष बदल
नमुना उत्तर: (१) पांढऱ्या ढगांचे पुंजके तरंगत असतात.
(२) अचानक वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात.
(३) आकाश काळ्या ढगांनी दाटून येते.
(४) पावसाची जोरदार सर येते.
(५) थोड्या वेळाने सूर्य ढगाआडून येतो व लख्ख ऊन पडते. कधी रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितिजाक इंद्रधनुष्य उमटते.
२. लेखन विभाग *(१) श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : वैशाखात कडक ऊन पडते. जमिनीला भेगा पडतात. अंगाची लाहीलाही होते. घामाच्या लागतात. नदीनाले आटतात. गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही. तहानेने प्राणिमात्रांचा जीव व्याकुळ होतो श्रावणात पावसाची रिमझिम बरसात होते. ऊन कोवळे होते. ऊनपावसाचा आनंददायी लपंडाव सुरू हवेत सुखद गारवा येतो. शेतात पेरलेले बियाणे उगवून येते. शेतकरी आनंदात असतात. नदीनाले भरभरून वा गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. सगळी सृष्टी हिरवीगार होते. पशु-पक्षी व माणसे आनंदात व उत्साहात वावरतात.
Good
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवाLovely test
उत्तर द्याहटवाMast
उत्तर द्याहटवा