भौमितिक आकृत्यांची ओळख
(चौकोन, त्रिकोण, आयत,वर्तुळ)बर्फाचे तुकडे |
कड़ा व कोपरे
बर्फीचा तुकडा पाहा.
बर्फीचा तुकडा चौकोनी आहे. चौकोनाला चार कडा व चार कोपरे असतात.
टेबल |
टेबलाच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करा. टेबलाच्या पृष्ठभागाला किती कडा आहेत ?
टेबलाच्या पृष्ठभागाला किती कोपरे आहेत
टेबलाच्या पृष्ठभागाचा आकार कोणता ?
आयत
आयताकृती कागद |
शेजारी दाखवल्याप्रमाणे एक आयताकार कागद घ्या.
आयताला कडा किती व कोपरे किती ?
आता समोरासमोरील कडा एकमेकींशी जोडण्यासाठी कागदाला अशी मधोमध घडी घालू पाहा ! जास्त लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते. कमी लांबीची कड समोरच्या कडेशी तंतोतंत जुळते. आयताच्या समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात.
आयताच्या समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या असतात
चौरस
चौरस |
रुमालाचे निरीक्षण करू. हा चौरस आहे. चौरसाला कडा व कोपरे किती ?
रुमालाची आडवी व उभी घडी घालून समोरासमोरच्या कडा समान लांबीच्या आहेत का ते पाहा. हे आता रुमालाचे समोरासमोरील कोपरे एकमेकांशी जुळतात का, पाहण्यासाठी अशी घडी घालू. कोपरे जुळतात व लगतच्या काही एकमेकांशी जुळतात. आता रुमालाची पुन्हा घडी घाला. सर्व कडा एकमेकींशी जुळतात.
चौरसाच्या चारही कडा समान लांबीच्या असतात. रुमालाची घडी घातल्यावर त्रिकोण मिळाला, हे लक्षात घ्या.
त्रिकोण
त्रिकोण |
त्रिकोणाला कडा किती ? कोपरे किती ? परिसरात आपल्याला हा आकार कुठे कुठे दिसतो, ते शोधा. काड्यांचा वापर करून खालील आकार तयार करा. चौकोन , आयत , चौरस , त्रिकोण.
खालील चाचणी सोडवा
● प्रश्नोत्तरे वाचा व लिहा
१) त्रिकोण म्हणजे काय ?
उत्तर :- तीन बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीला त्रिकोण म्हणतात.
२) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
उत्तर -- तीन
३) त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- तीन
४) त्रिकोणाला किती कोन असतात ?
उत्तर -- तीन
५) शिरोबिंदू म्हणजे काय ?
उत्तर -- आकृतीच्या दोन बाजू जिथे मिळतात, त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात.
६) चौरस म्हणजे काय ?
उत्तर :- चार समान लांबीच्या बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस चौरस म्हणतात.
७) चौरसाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
८) चौरसाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
९) चौरसाला किती कोन असतात ?
उत्तर -- चार
१०) चौरसाच्या चारही बाजू कशा असतात ?
उत्तर -- समान लांबीच्या
११) चौरसाचे सर्व कोन ( चारही कोन ) कसे असतात ?
उत्तर -- काटकोन
१२) आयताला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
१३) आयताला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
१४) आयताचे चारही कोन कोणत्या प्रकारचे असतात ?
उत्तर -- काटकोन
१५) चौकोन म्हणजे काय ?
उत्तर -- चार बाजूंनी बंदिस्त असलेल्या आकृतीस चौकोन म्हणतात.
१६) चौकोनाला किती बाजू असतात ?
उत्तर -- चार
१७) चौकोनाला किती शिरोबिंदू असतात ?
उत्तर -- चार
१८) चौकोनाला किती कोन असतात ?
उत्तर -- चार
१९) चौकोनाला किती कडा असतात ?
उत्तर -- चार
२०) चौकोनाचे प्रकार कोणते ?
उत्तर -- चौरस व आयत
खूप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद!!
हटवाVery nice
उत्तर द्याहटवा