Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, १६ जुलै, २०२०

इयत्ता-चौथी, परिसर अभ्यास भाग-१,६-अन्नातील विविधता

           अन्नातील विविधता


पुढील वाक्यांत रिकाम्या जागी कंसांतील योग्य शब्द लिहा:

 १) कोकणात प्रामुख्याने....... पीक मोठ्या प्रमाणावर होते. (गव्हाचे ज्वारीचे तांदळाचे)

2).......भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. (पूर्व उत्तर दक्षिण)

3)भारतातील लोकांचा ......हा मुख्य व्यवसाय आहे. (मासेमारी/पशुपालन शेती)

उत्तरे-
१) कोकणात प्रामुख्याने तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते.

२) उत्तर भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते.

३) भारतातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.

विविध फळे

२. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा :

(१) कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात प्रामुख्याने स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर होते.-चूक

 (२) तांदळाच्या पिकास भरपूर पाऊस आवश्यक असतो.-बरोबर

 (३) उन्हाळ्यात आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. -बरोबर

(४) कोल्हापूर जिल्ह्यातील तांबडा-पांढरा मटण रस्सा प्रसिद्ध आहे.-बरोबर

 (५) गोव्यातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने ढोकळ्याचा व ठेपल्यांचा समावेश होतो. -चूक

प्रश्न ३, नावे लिहा:
 (१) विविध खाद्यान्ने : तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, मका इत्यादी

२) विविध भाज्या : बटाटे, वांगी, भेंडी, तोंडली, पडवळ, कोबी, भोपळा इत्यादी.

३) विविध फळे : आंबा, फणस, चिकू, पेरू, केळे, कलिंगड, सीताफळ, चेरी, द्राक्षे, सं स्ट्रबेरी, टरबूज, पपई, डाळिंब, जांभूळ इत्यादी. )

 4)महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात ज्वारीपासून बनवले जाणारे खाद्यपदार्थ : हुरडा भाकरी, घुग्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे इत्यादी.

अन्नातील विविधता या पाठावरील चाचणी सोडण्यासाठी येथे क्लिक करा.

प्रश्न3-पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उतरे लिहा

(१) पीक चांगले येण्यासाठी कोणकोणते घटक आवश्यक असतात
उत्तर -पीक चांगले येण्यासाठी चांगले बियाणे सुपीक जमीन पुरेसा सूर्यप्रकाश आणि आवश्यक तेवढे पाणी हे घटक आवश्यक असतात.

(२) जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात?
 उत्तर-जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ नारळ, नाचणी, वर्ग इत्यादी पिके घेतली जातत.

 (३) मध्यम पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात?
 उत्तर : मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तुर, सोयाबीन इत्यादी पिके घेतली जातात.

 (४) कमी पावसाच्या प्रदेशात कोणती पिके घेतली जातात?
 उत्तर: कमी पावसाच्या प्रदेशात चारी, बाजरी, मटकी इत्यादी पिके घेतली जातात.

 (५) समुद्राकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात कोणत्या पदार्थाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला
उत्तर : समुद्रकिनान्यालगतच्या प्रदेशात तांदळ, नारळ य खोबरेल तेल या पदार्थाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

प्रश्न4-सांगा पाहू:
 *पाठ्यपुस्तकातील प पान क्रमांक ३७ वरील (भारत प्रमुख खादयान्न पिके) नकाशाचे लक्षपूर्वक निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :
भारत प्रमुख खादयान्न पिके

(१) उत्तर भारतात कोणकोणती खादयान पिके होतात? उत्तरे : उत्तर भारतात प्रामुख्याने गहू व ज्वारी ही खादयान्न पिके होतात

(२) देशाच्या मध्यवर्ती भागात कोणते मुख्य खादयान पीक घेतले जाते?
उत्तर : देशाच्या मध्यवर्ती भागात गहू हे मुख्य खादयान्न पीके घेतले जाते.

 (३) भारताच्या दक्षिण भागात कोणते पीक मोठ्या प्रमाणावर होते? उत्तर : भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते

(४) भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. यामागचे कारण काय असावे?
उत्तर : १)तांदळाच्या पिकास उष्ण व दमट हवामान व भरपूर पर्जन्यमान लागते.
 (२) भारताच्या दक्षिण पानातील किनारपट्टीच्या भागात उष्ण व दमट हवामान असते व तेथे भरपूर पाऊस पडतो या अनुकूल कामुळे भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते.

प्रश्न५- सांगा पाहू:  पाठयपुस्तकातील पान क्रमांक ३९ वरील (महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खादयपदार्थ) नकाशाचे लक्षपूर्वक निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :
१) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात तांदळाची भाकरी बनवली जाते?
जाले
उत्तर- महाराष्ट्रात प्रामुख्याने ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत तांदळाची भाकरी बनवली जाते.

(२) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्हयांत ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवली
उत्तर : महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला, यवतमाळ जालना, बीड, परभणी, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांत ज्वारीची व बाजरीची भाकरी बनवली जाते.

 (३) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत संत्र्याची बर्फी मोठ्या प्रमाणात बनवली जाते?
उत्तर : महाराष्ट्रातील नागपूर व वर्धा या जिल्ह्यांत संत्र्याची बर्फी मोठ्या प्रमाणावर बनवली जाते

 (४) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांत सावजीचे मटण बनवले जाते?
उत्तर : महाराष्ट्रातील चंद्रपूर, भंडारा, नागपूर वर्धा या जिल्ह्यांत सावजीचे मटण बनवले जाते

 (५) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्हयांत मांडे बनवले जातात? उत्तर : महाराष्ट्रात प्रामुख्याने नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांत मांडे बनवले जातात.

(६) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांत धपाटे बनवले जातात?
उत्तर : महाराष्ट्रात प्रामुख्याने नांदेड, यवतमाळ, लातूर, उस्मानाबाद, बीड इत्यादी जिल्ह्यांत धपाटे बनवले जातात.

प्रश्न ६वा-सांगा पाहू: (पाठ्यपुस्तक पान क्र. ३९) पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक ३९ वरील (महाराष्ट्र व शेजारील राज्यांतील प्रसिद्ध खादयपदार्थ) नकाशाचे लक्षपूर्वक निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची केवळ शब्दांत उत्तरे लिहा

महाराष्ट्र व शेजारील राज्यांतील प्रसिद्ध खादयपदार्थ

 (१) गुजरातमधील प्रसिद्ध खादयपदार्थ : ढोकळा, ठेपला.
(२) गोव्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ : भात, कोळंबीचा रस्सा
(३) मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध खादयपदार्थ : बाफला, लापशी.
(४) छत्तीसगड मधील प्रसिद्ध खादयपदार्थ : दाल बाफौरी
 (५) आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध खादयपदार्थ कोरीकुरा, बिर्याणी, मिरची सालन.
(६) कर्नाटकमधील प्रसिद्ध खादयपदार्थ : मैसूरपाक, इडली, डोसा, अप्पे.

प्रश्न ७वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा : •
(१) गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात?
उत्तर : (१) गव्हापासून, गव्हाच्या पिठापासून व गव्हाच्या चिकापासून विविध अन्नपदार्थ बनवले जातात. (२) गव्हापासून लापशी, खीर, शिरा इत्यादी गोड पदार्थ बनवले जातात. (३) गव्हाच्या पिठापासून पोळी, फुलका, पुरी, पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात. (४) गव्हाच्या चिकापासून पापड, कुरडई इत्यादी वाळवून तळण्याचे पदार्थ बनवले जातात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा