Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, ७ जुलै, २०२०

लोभी कुत्रा,इयत्ता दुसरी ,चित्रावरुन गोष्ट पूर्ण करा

                       लोभी कुत्रा
     


               चित्रे बघ ,गोष्टीच्या शेवटी काय घडले असेल त्याचा विचार कर आणि गोष्ट पूर्ण करून सांग.


हा मोती कुत्रा आहे. तो एकदा फिरायला बाहेर पडला.


मोतीला रस्त्यात एक भाकरीचा तुकडा दिसला त्याने तो उचलला.


मोतीने भाकरी तोंडात धरली व तो आनंदाने पळू लागला.


वाटेत नदी लागली.नदीवर लाकडी पूल होता. मोती पुलावरुन जाऊ लागला.

मोतीने पाण्यात डोकावून पहिले. त्याला पाण्यात तोंडात भाकरी असलेला दूसरा कुत्रा दिसला.


पाण्यातील कुत्र्याच्या तोंडातील भाकरी पाहून मोतीला लोभ सुटला. दूसरी भाकरी मिळावी म्हणून त्याने भूंकायला सुरुवात केली. इतक्यात त्याच्या तोंडातील भाकरी पाण्यात पडली.
मोतीच्या हावरटपणामुळे जवळ असलेली भाकरी सुद्धा त्याने गमावली.

प्रश्नोत्तरे-
(पाठ्यपुस्तक पृ.क्र.६ वरील चित्र पाहा
(१) चित्रात किती कुत्रे आहेत ?
 (२) कुत्र्याच्या तोंडात काय आहे ?
(३) कुत्रा कशावरून चालला आहे ?
 उत्तर - (१) एक, (२) पोळीचा तुकडा, (३) पुलावरून.

प्रश्न १ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
 (१) कुत्र्याला रस्त्यात काय सापडले ? उत्तर -कुत्र्याला रस्त्यात पोळीचा तुकडा सापडला.
(२) कुत्रा कुठे निघून गेला ?
उत्तर कुत्रा नदीवर निघून गेला.
(३) पाण्यात कुत्र्याला काय दिसले ?
उत्तर- पाण्यात कुत्र्याला स्वतःचीच सावली दिसली.
 (४) कुत्र्याने नदीत उडी का मारली? 
उत्तर - सावलीच्या तोंडातील पोळी खेचण्याच्या नादात कुत्र्याने भुंकून नदीत उडी मारली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा