Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २३ जुलै, २०२०

इयत्ता-पाचवी, मराठी,५- मुंग्यांच्या जगात

          ५- मुंग्यांच्या जगात


प्रश्न. एका वाक्यात उत्तरे लिहा :

 (१) कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते?
उत्तर : मुंगी हा कीटकांमध्ये सर्वांत जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून किटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.

2) मुंग्या गंधकण केव्हा सोडतात?
 उत्तर : अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधकण सोडतात.

३) मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात? उत्तर : स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात.

* (४) मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण कसे करतात?
उत्तर : कडकडून चावा घेऊन, विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट आम्लाचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात
.
 (५) संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या काय करतात?
उत्तर: संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग घासतात.

६) एखाद्या मुंगीला चिरडले; तर काय होते? उत्तर : एखादया मुंगीला चिरडले; तर अधिक प्रमाणात गंधकण सोडले जातात.

प्रश्न 2. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा :
 १) उदयोगी x आळशी
 (२) सजीव× निर्जीव
 (३) शत्रू x मित्र
 (४)यशस्वी× अयशस्वी
 (५) हुशार x मठ्ठ
(६)) प्रिय × अप्रिय
(७)) अधिक x उणे
 (८)नकळत× कळत
(९) सावध बेसावध
(१०) विष x अमृत
(११) प्रश्न X उत्तर
(१२) जीवन x मरण

•प्रश्न 3. 'मुंगी' या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत. ती शोधा व लिहा. याप्रमाणे एखादया शब्दाची (नामाची) वेगवेगळी रूपे लिहा.
 उत्तर : (१) मुंगी : मुंग्या, मुंग्यांच्या, मुंग्यांना मुंगीला मुंगीच्या, मुंगीला, मुंग्यांनी, मुंग्यांचा
 (२) कीटक : कीटकाने, कीटकाला कीटकांनी, कीटकास, कीटकाचा, कीटकांची

 प्रश्न ३. वाक्यांत उपयोग करा:
 (१) माग काढणे.
वाक्य : चोराचा माग काढत पोलीस जंगलात पोहोचले.

(२) सावध करणे.
वाक्य : कड्यावर चढताना सरांनी सगळ्यांना सावध केले

(३) फवारा सोडणे.
वाक्य : लादी धुण्यासाठी आईने लादीवर पाण्याचा फवारा सोडला

(४) तत्पर असणे.
वाक्य : दुसऱ्याला मदत करायला नेहमी तत्पर असावे.

 (५) पळ काढणे.
वाक्य : पोलिसांची चाहूल लागताच चोरांनी पळ काढला.

६) दाह होणे.
 वाक्य : जखमेवर औषध लावताना थोडा दाह होतो.

 (७) हाणून पाडणे.
वाक्य : समुद्रकिनारी सहल काढण्याचा बेत सरांनी हाणून पाडला.

 प्रश्न ४. पुढील वाक्यांतील नामे ओळखा व सांगा
: (१) बंडूची इजार चार बोटे लांब झाली.-बंडू, इजार, बोटे

 (२) आईने इजार एका कोनाड्यात फेकली. -आई, इजार, कोनाडा

(३) माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. - माणूस, मुंग्या

(४) आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. -कविता,भारत, धावपटू

प्रश्न ५. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे घाला:
 1)आई माधवला म्हणाली
 (२) कैऱ्या आंब्याच्या झाडावर
(३) घसरगुंडी खेळायला आम्ही बागेत गेले
(४) मराठी विषय मला खूप आवडतो.
(५) राष्ट्रपतींचे भाषण ऐकून  राजू मंत्र मुग्ध झाला
(६) महागाई वाढल्याने वस्तू महागल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा