सजीव सृष्टी व सुक्ष्मजीवांचे वर्गीकरण
पुढील प्रश्नांची एक किंवा दोन वाक्यांत उत्तरे लिहा:
(1) जीवन पद्धतीप्रमाणे सजीवांचे प्रकार कोणते?
उत्तर : उत्पादक, भक्षक आणि विघटक हे जीवन पद्धतीप्रमाणे सजीवांचे प्रकार आहेत.
(2) आदिकेंद्रकी पेशीची लक्षणे कोणती? उत्तर : पटलबद्ध केंद्रक नसणे आणि पेशी अंगके नसणे ही आदिकेंद्रकी पेशीची लक्षणे आहेत.
(3) कवकांचे पोषण कसे होते?
उत्तर : बहुसंख्य कवकांतील पोषणपद्धती मृतोपजीवी आहे. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर कवके जगतात. कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करून त्यांचे पोषण होते.
(4) विषाणू यजमान पेशींचा नाश कधी करतात? उत्तर : स्वत:ची प्रथिने बनवून स्वत:च्या प्रतिकृती तयार केल्यानंतर विषाणू यजमान पेशींचा नाश करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा