४.शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
१ प्रश्नोत्तरे
प्रश्न १. शोधून लिहा
(१) कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक -सिददी
(२) अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार-संत ज्ञानेश्वर
(३) संत तुकारामांचे गाव-देहू
(४) भारुडाचे रचनाकार -संत एकनाथ
(६) स्त्री-संताची नावे -संत सोयराबाई संत निर्मळाबाई सत मुक्ताबाई संत जनाबाई संत कान्होपात्रा संत बहिणाबाई सिऊरकर
प्रश्न २ योग्य पर्याय निवडा:
(१) भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा व वसईत यानी राज्य स्थापन केले होते (अ) इंग्रजांनी (ब) इंचांनी (क) पोर्तुगीजांनी (ड) फ्रेंचानी
(२) सर्वांत लहान परगणा कोणता होता? (अ) पुणे (ब) इंदापूर क) चाकण (ड) शिरवळ
(३) महाराष्ट्रात या साली मोठा दुष्काळ पडला होता (अ) इ स १६०० (ब) इ स १६३० (क) इ स १६१० (ड) इ स १६४० (४) महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र हे होते (अ) देहू (ब) आळदी (क) पैठण (ड) पंढरपूर
(५) समर्थ संप्रदायाची स्थापना कोणी केली? (अ) संत ज्ञानेश्वरांनी (ब) संत एकनाथांनी (क) रामदास स्वामींनी (ड) संत नामदेवानी
उत्तरे : (१) पोर्तुगिजानी (२) शिरवळ (३) इ. स १६३० (४) पंढरपूर
प्रश्न 3रा. पुढील काव्यपंक्ती कोणाच्या ते ओळखा : (9) 'जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले
(२) 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी'
(३) 'मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा'
(४) 'कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी
(५) संस्कृत वाणी देवे केली। तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली?'
(६) जोडोनिया धन उत्तम व्यवहारे। उदास विचारे वेच करी'
प्रश्न 4-म्हणजे काय? (१) बुद्रुक परगण्यांची नावे उत्तर : मूळ गावाला 'बुद्रुक' असे म्हणतात (२) बलुतं. शिरवळ उत्तर : गावातील कारागीर शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित जी सेवा देतात, त्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून त्याना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो, त्याला 'बलुतं' असे म्हणतात (३) वतन. उत्तर : वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे 'वतन' होय (४) टोपकर. उत्तर : व्यापाराच्या उद्देशाने भारतात आलेल्या पोर्तुगीज, इग्रज, डच व फ्रेंच या युरोपियनाना त्याच्या शिरस्त्राणांवरून 'टोपकर' असे म्हणत (५) खुर्द. उत्तर : मूळ गावाच्या जवळ नवीन गाव वसल्यास दोन्ही गावे स्वतंत्र आहेत, हे दर्शवण्यासाठी नवीन गावाला खुर्द असे म्हणतात.
न ७. पुढील अधिकारी व्यक्तींची कामे कोणती होती, ते लिहा : (१) पाटील. उत्तर : (१) गावचा प्रमुख या नात्याने गावातील तटे सोडवणे (२) गावात शांतता निर्माण करणे ) लोकांना जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहित करणे (२) कुलकर्णी. उत्तर : (१) पाटलाच्या कामात मदत करणे (२) जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे (३) शेटे-महाजन. उत्तर : (१) गावात पेठ वसवण्याचे काम करणे (२) पेठेचा हिशेब ठेवण्याचे काम महाजन करीत असत (४) देशमुख. उत्तर : (१) परगण्यातील पाटलाचा प्रमुख (२) परगण्यातील तटे सोडवून शांतता प्रस्थापित करणे (३) परगण्यातील शेतीचे उत्पन्न वाढवणे (४) परचक्र, दुष्काळ अशा अडचणीत रयतेचे म्हणणे सरकारकडे माडणे (५) देशपांडे. उत्तर : (१) परगण्यातील कुलकर्त्यांचा प्रमुख (२) परगण्यातील जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे (३) रयत व सरकार यांच्यातील दुव्याचे काम करणे
प्रश्न 5-. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा : * (৭) दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते ? उत्तर : (१) दुष्काळात शेतीत पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे मुश्कील होत असे (२) अशा वेळी अन्नधान्याचे भाव वाढत. (३) पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे (४) गावात राहणे कठीण होऊन लोकाना परागदा व्हावे लागे या त्रासामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत असे.
१६३० साली महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाचे प्रजेवर कोणते परिणाम झाले? उत्तर : इ. स. १६३० मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाचे प्रजेवर पुढील परिणाम झाले - (१) धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने कुटुः उद्ध्वस्त झाली. (२) गुरे-ढोरे मेली. (३) शेती-व्यवसाय आणि उद्योगधंदे बुडाल्याने लोकांचे आर्थिक व्यवहार बट पडले (४) लोक देशोधडीला लागले (३) संतांनी समाजाला कोणती शिकवण दिली? उत्तर : सतांनी समाजाला पुढील शिकवण दिली - (१) परमेश्वरापुढे सर्व समान आहेत, हा समतेचा संदेश दिला (२) लोकाना माणुसकी व मानवताधर्माची शिकवण दिली (३) सर्वांवर प्रेम करावे, एकत्र येऊन एकजुटीने राहावे (४) वर्ण व जातीचा अहकार बाजूस सारून सर्व माणसे 'परमेश्वराची लेकरे' या स्वरूपात पाहण्याची शिकवण दिली (४) संतांनी केलेले कार्य लिहा. उत्तर : संतांनी पुढील कार्य केले - (१) समाजात लोकजागृती घडून आली. (२) संकटाच्या काळी कसे वागावे या संतांच्या उपदेशामुळे लोकाना मोठा मानसिक आधार मिळून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. (३) समाजात झालेल्या धर्माच्या अवनत अवस्थेत धर्माचा खरा अर्थ सांगून संतानी लोकांचे रक्षण केले. (४) सर्वसामान्याच्या भाषेत लोकांना उपदेश करून समाजाचे नैतिक आचरण सुधारले.
प्रश्न 6. लिहिते व्हा : (कारणे लिहा.)
(१) सतराव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती.
उत्तर : (१) सतराव्या शतकाच्या प्रारभी महाराष्ट्रात निजामशाह, आदिलशाह व मुघल यांनी मोठा सत्ताविस्तार केला होता. (२) कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले सिद्दी वसाहत करून होते. (३) युरोपातील फ्रेंच, डच, ब्रिटिश व पोर्तुगीज यांच्यात बाजारपेठा काबीज करण्याची स्पर्धा चालू होती. (४) या सर्व सत्तात वर्चस्वासाठी सतत आ संघर्ष चालू असे, त्यामुळे महाराष्ट्रात अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली होती
2)वतनदारांमुळे प्रजा त्रासली जात असे
उत्तर : (१) परगण्यातील महसूल गोळा करण्याचे काम करणारे वतनदार रयतेकडून अधिक रक्कम गोळ (२) वतनदारांमुळे प्रजा त्रासली जात असे. करीत असत. (२) आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून सरकारकडे कमी महसूल देत किंवा देण्यास विलंब करीत असत. (३) परचक्र, दुष्काळ अशा परिस्थितीत रयतेच्या तक्रारी सरकारकडे मांडण्याचे काम योग्य रितीने करीत नसत, यामुळे वतनदारांमुळे प्रजा त्रासली जात असे.
३-संत तुकारामांच्या अभंगांच्या वह्या नदीत बुडवल्या गेल्या
उत्तर : (१) संत तुकारामांनी लोकांना भक्तीची शिकवण देतानाच समाजातील दांभिकतेवर आणि अधश्रद्धावः कडक शब्दात टीकाही केली. (२) त्यानी भक्तीला नीतीची - आचरणाचीही जोड दिली (३) ते करीत असलेल्या लोकजागृतीस समाजातील कर्मठ लोकांनी विरोध केला (४) तुकारामांना मुळात अभग रचण्याचा अधिकारच नाही प्रश्न, आ नशिबावर वाईट लो साधू-स अशा स (३) संत तुकारामांच्या अभंगांच्या वह्या नदीत बुडवल्या गेल्या . असा दावा करून त्याच्या अभगाच्या वया या कर्मठ लोकानी इंद्रायणी नदीत बुडवल्या.
प्रश्न 7-. तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा :
(१) संत नामदेव.
उत्तर : वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि कुशल संघटक असणारे संत नामदेव उत्तम कीर्तनकार होते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती-जमातींच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समतेची भावना निर्माण केली जगात ज्ञानरूपी दीप लावण्याचा त्यांचा ध्यास होता. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवला. पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारासमोर त्यांनी चोखोबांची समाधी बांधली. त्यांची विपुल अभंगरचना प्रसिद्ध आहे त्यांची काही पदे 'गुरुग्रंथसाहिब' या शिखांच्या पवित्र ग्रंथातही समाविष्ट आहेत.
*(२) संत ज्ञानेश्वर. उत्तर : संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली सामान्याना आचरता येईल, असा आचारधर्म सागितला. त्यानी 'भगवद्गीता' या सस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा 'भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ, तसेच. 'अमृतानुभव' या ग्रथाची रचना केली लोकानी त्रास देऊनही त्याबद्दल कटुता न बाळगता त्यांनी परमेश्वराकडे सर्वांसाठी 'पसायदान" मागितले
(३) संत एकनाथ.
उत्तर : महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ यानी अभग, भारुडे, गौळणी अशी विविध प्रकारची साहित्यनिर्मिती केली त्यानी 'भावार्थ रामायणात' लोकजीवनाचे चित्रण केले भागवत या संस्कृत ग्रंथातील भक्तीविषयक भागाचा मराठीत अनुवाद केला मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही, असे ते सांगत परमेश्वरप्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्वत च्या आचरणाने दाखवून दिले. इतर धर्मांचा तिरस्कार करणाऱ्यांवर त्यांनी कडक टीका केली आहे ते खऱ्या अर्थनि लोकशिक्षक होते .
(४) संत तुकाराम.
उत्तर : संत तुकारामांची विपुल अभगरचना त्यांच्या 'गाथे'त संग्रहित केलेली आहे. त्यांचे अभग समजायला अतिशय सोपे आहेत. समाजातील दांभिकतेवर आणि अधश्रद्धावर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्त्व दिले. दीनदुबळ्यामध्ये देवत्व शोधण्यास सांगितले त्यांनी अभंगांद्वारे लोकजागृती केली कर्मठ लोकाच्या विरोधाला धैर्यने तोंड दिले त्यांच्या शिष्य आणि सहकाऱ्यांत विविध जाती-जमातीच्या लोकांचा समावेश होता
(५) रामदास स्वामी.
उत्तर : रामदासांनी 'दासबोध', 'मनाचे श्लोक', 'करुणाष्टके' असे विपुल साहित्यलेखन केले. साहित्याच्या माध्यमातून त्यानी लोकजागृती आणि समाजसंघटन केले समर्थ संप्रदाय स्थापन करून रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. लोकांना बलोपासनेचे महत्त्व पटवून देऊन लोकचळवळीचे व लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले.
बरोबर
उत्तर द्याहटवाThank u😊😊
हटवा