Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

इयत्ता सातवी, इतिहास व ना शास्त्र,५.स्वराज्यस्थापना

             ५.स्वराज्यस्थापना



महत्वाचे मुद्दे:
१, शहाजीराजे :
(१) शहाजीराजे भोसले हे निजामशाहीतील एक मातम्यर सरदार होते. 
(२) पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ असणारे शहाजीराजे तलवार व भाला चालवण्यात पटाईत होते.

 २.निजामशाहीचा पाडाव:
 (१) निजामशाही जिंकण्यासाठी मुघलांनी हाती घेतलेल्या मोहिमेला विजापूरच्या आदिलशहाने सहकार्य केले. 
(२) मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये, या भावनेने शहाजीराजांनी मुघलांना प्रखर विरोध करूनही ते त्यात अपयशी ठरले. (३) इ. १६३६ मध्ये निजामशाहीचा पाडाव झाला

 ३, आदिलशाहीत सामील
 (१) निजामशाही संपुष्टात आल्यावर शहाजीराजे आदिलशाहीत सामील झाले. (२) पुणे, सुपे, इंदापूर व चाकण हे परगणे हा मूळ जहागिरीचा मुलूख आदिलशाहाने शहाजीराजांकडेच ठेवला, 
(३) कर्नाटकातील बंगळूरू व त्याच्या आसपासचा प्रदेशही त्यांना जहागीर म्हणून मिळाला
 (४) शहाजीराजांनी महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू येथील मोठा प्रदेश मिळवून आपला दरारा निर्माण केला. 
४. शिवरायांचा जन्म 
(१) शके १५५१, फाल्गुन वद्ध तृतीया म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवरायांचा जन्म झाला.
 (२) पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला 

५. स्वराज्य संकल्पक :
 (१) परकीय सत्ता नष्ट करून स्वराज्य स्थापन करावे, ही शहाजीराजांची तीव्र इच्छा होती.
(२) शिवरायांना उत्तम राजा बनण्यासाठी सर्व प्रकारचे शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी बंगळूरू येथे केली होती
 (३) म्हणूनच शहाजीराजांना 'स्वराज्य संकल्पक' असे म्हणतात.

६. वीरमाता जिजाबाई
(१) सिंदखेडराजा येथील सरदार लखुजीराजे जाधव यांच्या कन्या जिजाबाई कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीति होत्या, (२) विविध विद्यांबरोबरच लष्करी शिक्षण त्यांना लहानपणीच मिळाले होते.
 (३) प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या न्यायनिवाडेही करीत असत.

 ७.शिवरायांवर संस्कार
 (१) जिजाबाईंनी शिवरायांना स्वराज्यस्थापनेच्या कार्यात मार्गदर्शन केले (२) उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली. (३) चारित्र्य, सत्यप्रियता, धैर्य, निर्भयता, स्वराज्याचे स्वप्न इत्यादी गुणांचे संस्कार केले.

८. मावळप्रांती स्वराज्यस्थापनेला सुरुवात :
(१) शिवरायांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या डोंगररांगेतील प्रदेश म्हणजेच 'बारा मावळचे खोरे' होय
(२) हा प्रदेश डोंगराळ, दयाखोऱ्यांचा आणि दुर्गम होता. (३) अशा अवघड प्रदेशाचा कौशल्याने उपयोग करून शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेला सुरुवात केली.

९.शिवरायांचे सवंगडी
(१) शिवरायांनी लोकांत विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केली.
(२) त्यांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात येसाजी कंक, जिवा महाला, नन्हेकर देशपांडे बाजीप्रभू देशपांडे अशा अनेक सवंगड्यांनी सहकार्य केले.

१०. स्वराज्याची राजमुद्रा
(१) स्वराज्याचे ध्येय स्पष्ट करणारे वचन कोरलेली संस्कृत भाषेतील राजमुद्रा तयार (२) 'शहाजींचा पुत्र शिवाजी याची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी ही मुद्रा लोककल्याणासाठी आधिराज्य गाजवते असा या वचनाचा अर्थ आहे
 (३) या वचनातून शिवरायांची वडिलांबाबतची कृतज्ञता, हे स्वराज्य निश्चितपणे वाढत  राहण्याचा विश्वास स्वराज्याला सर्वांचा आदर मिळण्याची खात्री आणि लोककल्याण हा हेतू या गोष्टी प्रकट होतात .

११. किल्ल्यांचे महत्त्व
 (१) किल्ल्यांमुळे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असल्याने, शिवकाळात किल्ल्यांना विशेष महल होते (२) शिवरायांच्या जहागिरीतील किल्ले आदिलशाहाच्या ताब्यात असल्याने ते मिळवण्याचे धोरण निश्चित झाले (
३) शिवरायांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली
 (४) मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बाधणी करून त्याचे नाव 'राजगड' ठेवण्यात आले. हीच स्वराज्याची पहिनी राजधानी झाली.

१२ विरोधकांचा बंदोबस्त
 (१) जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत अशा काही आदिलशाही सरदारांचा स्वराज्यस्थापनेस विरोध होता
(२) या विरोधकांचा शिवरायांनी पुरता बंदोबस्त केला.
(३) १६५६ मध्ये शिवरायांनी जावळीवर स्वारी करून हा प्रदेश व रायगड किल्ला जिंकला.
(४) जावळीच्या खोऱ्यात त्यांनी प्रतापगड किल्ला बांधला.

 १३ आरमार उभारणी
(१) शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी जिकली
(२) पश्चिम किनारपट्टीवर सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांची ठाणी होती
 (३) या सत्तांशी टक्कर दयायची असेल तर प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची जाणीव होऊन शिवरायानी आरमार उभारणीकडे लक्ष दिले

१४ अफजलखानाचे पारिपत्य:
 (१) शिवरायांनी आपले अनेक किल्ले जिंकल्याने आदिलशाहीचा कारभार पाहणारी बड़ी साहेबीण अस्वस्थ झाली होती
 (२) तिने शिवरायाचे पारिपत्य करण्यासाठी अफजलखानास पाठवले
 (३) १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या भेटीत अफजलखानाने दगाफटका केल्याने शिवाजी महाराजांनी त्याला ठार केले.

 १५ सिद्दी जोहरची स्वारी:
 (१) अफजलखानाच्या पारिपत्यानंतर शिवरायांनी आदिलशाहीचे वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकू घेतले (२) खेळणा या किल्ल्यास राजानी 'विशाळगड' असे नाव दिले
(३) आदिलशाहाने शिवरायांचा बदोबस्त करण्यासाठी सिद्दी जौहर या कर्नुल प्रांताच्या सरदारास पाठवले.
४)सिद्दीबरोबर रुस्तुम-इ-जमान बाजी घोरपडे आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान हे सरदार होत
(५) सिद्दी आदिलशाह ने सलाबत खान हा किताब दिला .

१६ पन्हाळाचा वेळा :
(१) शिवराय पन्हाळ्यावर होते सिद्दीने पन्हाळ्याला वेढा घातला
(२) पाच महिने झाले तरी वेढा उठत नव्हता नेतोजी पालकरने सिद्दीच्या सैन्यावर बाहेरून हल्ला केला पण तो अयशस्वी ठरला
(३) शिवरायांनी सिद्दीशी बोलणी सुरू कैल्यामुळे येठ्यामध्ये शिथिलता आली (४) याचा फायदा घेऊन वेढ्यातून सुटण्याची योजना राजानी तयार केली.

 १७. वेश्यातून सुटका :
(१) शिवा काशिद या शिवरायासारख्या दिसणाऱ्या तरुणाने राजाधी वेशभूषा करून तो पालखीत बसला
(२) त्याची पालखी राज्दिडी दरवाजातून बाहेर पडली त्याच वेळी शिवराय व त्यांधे निवडक सैन्य अवघड वाटेने गडाखाली उतरले.

 १८. बाजीप्रभूचे बलिदान:
 (१) वेढ्यातून सुटून शिवराय विशाळगडाकडे निघाले
 (२) सिद्दीच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केल्यामुळे त्याला रोखण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपाडे याच्यावर सोपवली
(३) गजापूरजवळील धोडखिडीत बाजीप्रभूने सिद्दीच्या सैन्यास रोखून पराक्रमाची शर्थ केली
(४) या संघर्षात बाजीप्रभूला वीरमरण आले पण शिवाजीराजे विशाळगडावर सुखरूप पोहोचले .

१९ आदिलशाहीशी तह:
(१) मुघल बादशाहा औरंगजेब याने शास्ताखानास दक्षिण स्वारीवर पाठवले (२) शायिस्ताखानाने पुणे प्रांतावर स्वारी केली
(३) शिवरायाचा आदिलशाहीशी संघर्ष चालू होता
(४) एकाच येळी दोन बलाढ्य शत्रूशी लढणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशाहीशी तह केला
 (५) या तहानुसार त्यांना पन्हाळा किल्ला आदिलशाहास परत दयावा लागला




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा