१.नैसर्गिक संसाधने-हवा ,पाणी आणि जमीन
प्रश्न१. एका वाक्यात उत्तरे लिहा
(१) पृथ्वीचा किती भाग पाण्याने व किती भाग जमिनीने व्यापला आहे?
उत्तर-पृथ्वीचा ७१% भाग पाण्याने व २९% भाग जमिनीने व्यापला आहे.
(२) स्थितांबरात वायूंचे प्रमाण किती असते?
उत्तर : स्थितांबरात वायूंचे प्रमाण १९% असते.
(३) पाण्याला 'वैश्विक विद्रावक' का म्हणतात?
उत्तर : अनेक पदार्थ पाण्यात सहज विरघळतात; म्हणून पाण्याला 'वैश्विक विद्रावक' म्हणतात.
(४) पाणी कसे निर्माण होते?
उत्तर : हायड्रोजन वायूचे हवेत ज्वलन झाल्यास, त्याचा ऑक्सिजनबरोबर संयोग होऊन पाण्याची निर्मिती आहे.
(५) खनिज तेलापासून कोणकोणते उपयुक्त पदार्थ मिळतात?
उत्तर : पेट्रोल, डिझेल, रॉकेल, पॅराफिन ही इंधने आणि डांबर, मेण यांसारखे उपयुक्त पदार्थ खनिज तेलापासून मिळतात.
असे का म्हणतात?
(१) ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे.
उत्तर : सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांना ओझोन वायूचा थर शोषून घेतो. त्यामुळे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत पृथ्वीवरच्या सर्व सजीवांचे त्यामुळे संरक्षण होते. म्हणून ओझोन हे अतिनील थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे, असे म्हणतात .
(२) पाणी हे जीवन आहे.
उत्तर : सर्व सजीव जगण्यासाठी पाण्यावर अवलंबन असतात वनस्पतींतील रसद्रव्ये आणि प्राण्याच यांतही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते पाण्याशिवाय सजीव जगू शकणार नाहीत, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात.
(३) समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे. किंवा समुद्र, महासागराचे पाणी खारट असूनसुद्धा उपयुक्त कसे आहे?
उत्तर : (१) समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात. यापैकी काही मासे, शिंपले, कालवं, कोळंबी, शेवंड, खेकडे-असे जलचर हे अन्न म्हणून खाल्ले जातात (२) मासेमारी करणाऱ्या लोकांचे समुद्र हे उपजीविका करण्याचे साधन आहे. (३) समुद्राच्या पाण्यापासून मीठ, आयोडीन व इतर काही खनिजेही मिळवली जातात. (४) समुद्रातील प्राण्यांपासून प्रवाळ आणि मोती ही रत्ने मिळतात. (५) समुद्रमार्गान दळणवळण आणि मालसामानाची वाहतूक होते. (६) समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पाऊस पडतो. मोसमी पाऊस, हवामान आणि संपूर्ण पृथ्वीवरचे ऋतुचक्र समुद्रावर अवलंबून असते. (७) काही देशांत आता समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य आणि वापरास उपयुक्त असे पाणी निर्माण करणे चालू झाले आहे. म्हणूनच समुद्र, महासागराचे पाणी खारट असूनसुद्धा उपयुक्त आहे.
पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा
१) पृथ्वीचा सुमारे ७१% भूभाग पाण्याने व्यापलेला असूनदेखील पाण्याची कमतरता का भासते?
उत्तर : पृथ्वीवरचा सुमारे ७१% भूभाग जरी पाण्याने व्यापलेला असला, तरी त्यातले ९७% पाणी खारट समुद्रजल असते. पिण्यासाठी किंवा शेतीसाठी आणि दैनंदिन वापरासाठी हे पाणी उपयुक्त नाही. तसेच गेल्या काही दशकांत लोकसंख्येच्या भरमसाट वाढीमुळे पाण्याची गरजही वाढली आहे. जागतिक तापमानवाढीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व कारणांमुळे, पृथ्वीचा सुमारे ७१% भूभाग पाण्याने व्यापलेला असूनदेखील पाण्याची कमतरता भासते.
(३) हवेतील विविध घटक कोणते? त्यांचे उपयोग लिहा.
उत्तर : 1) हवेतील विविध घटक :
(१) नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायॉक्साइड हे वायू.
(२) अरगॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन हे निष्क्रिय वायू. (३) बाष्प, धूर, धुके, धुरके असे घटक. (II) हवेतील घटकांचा उपयोग : (१) नायट्रोजन : सजीवांना आवश्यक असणारी प्रथिने नायट्रोजनपासून तयार होतात. अमोनियानिर्मितीसाठी नायट्रोजन आवश्यक असतो. खादयपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजनचा वापर करतात. (२) ऑक्सिजन : सर्व सजीवांच्या श्वसनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. ऑक्सिजनशिवाय ज्वलन होऊ शकत नाही. (३) कार्बन डायॉक्साइड : प्रकाश-संश्लेषण प्रक्रियेसाठी वनस्पती कार्बन डायॉक्साइडचा वापर करतात. (४) अरगॉन : विजेच्या बल्बमध्ये वापर होतो.
(५) हेलिअम : विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये कमी तापमान मिळवण्यासाठी हेलिअम वापरतात.
(६) निऑन : जाहिरातींच्या आणि रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.
(७) क्रिप्टॉन : फ्लुरोसेन्ट पाइप्समध्ये वापर केला जातो.
(८) झेनॉन : फ्लॅश फोटोग्राफीमध्ये वापर होतो.
(४) हवा, पाणी, जमीन ही 'बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत?
उत्तर : हवा, पाणी व जमीन या तिन्हींकडून पृथ्वीवरील सजीव जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात. सजीव सृष्टीच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकण्यासाठी याच घटकांची आवश्यकता असते. हवा, पाणी आणि जमिनीकडून हे घटक नैसर्गिकरीत्या मिळतात. म्हणूनच त्यांना 'बहुमोल नैसर्गिक संसाधने' असे म्हणतात.
(५) हवा प्रदूषणाची माहिती लिहा.
उत्तर : वाहने आणि कारखान्यांतील प्रक्रिया यांमुळे मोठ्या प्रमाणावर इंधनांचे ज्वलन होते तसेच लाकूड व कोळसा यांच्या ज्वलनानेही विषारी वायू हवेत सोडले जातात. त्यामध्ये नायट्रोजन डायॉक्साइड, सल्फर डायॉक्साइड, कार्बन डायॉक्साइड, कार्बन मोनॉक्साइड - असे घातक वायू असतात. धूर, धुरके व काजळीनेही हवा प्रदूषित होते. प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते व मानवाचे आरोग्य धोक्यात येते.
(६) पाण्याचा वापर करताना कोणत्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात?
उत्तर : (१) पाण्याचा वापर योग्य रितीने व काटकसरीने करावा. (२) पाणी भूगर्भात मुरावे यासाठी पाणी अडवा-पाणी जिरवा' अशा योजनांची आखणी करावी. (३) पाणी साठवून ठेवावे. विशेषतः पावसाचे पाणी निव्वळ वाहून जाऊ देऊ नये. (४) पाणी कधीही शिळे होत नाही, त्याचा पुनर्वापर करावा.
(७) जमिनीत कोणकोणते थर दिसतात?-त्यांची माहिती लिहा?
उत्तर : (१) जमिनीत वरच्या बाजूस परिपक्व मृदेचा थर असतो. या परिपक्व मृदेत सर्वांत वर कुथित मृदा असते. वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून कुथित मृदा बनलेली असते. (२) त्याच्या खालच्या जमिनीत वाळू, माती, बारीक खडे, कृमी-कीटक इत्यादींनी समृद्ध असलेला थर असतो. या थराला 'मृदा' असे म्हणतात. (३) याच्या खाली अपरिपक्व मृदा असते. त्यात माती आणि मूळ खडकांचे तुकडे आढळतात. (४) या खडकांतील खनिजांमुळे मातीला विशिष्ट रंग प्राप्त होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा