मुग्धा लिहू लागली
स्वाध्याय
प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा
(१) मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता?
उत्तर : मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता.
(२) समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते
उत्तर : समारंभाला प्रसिद्ध लेखक प्रमुख पाहुणे म्हणून आले होते.
(३) बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते?
उत्तर : बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी (रोजनिशी) दिली होती.
(४) मुग्धाला आपली चूक का कळू लागली?
उत्तर : एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की मुग्धा ती कागदावर लिहू लागल्यामुळे तिला तिची चूक कळू लागली.
(५) मुग्धाने कोणत्या स्पर्धेत पहिल्या नंबरचे बक्षीस पटकावले?
उत्तर : मुग्धाने चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचे बक्षीस पटकावले.
(६) मुग्धाचा स्वभाव कसा होता?
उत्तर : मुग्धा अबोल होती किंवा मुग्धाचा स्वभाव अबोल होता.
(७) प्रमुख पाहुण्यांना कोणता छंद लागला होता?
उत्तर : दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून रोज रात्री वहीत लिहून काढण्याचा छंद प्रमुद्ध पाहुण्यांना लागला होता.
(८) प्रमुख पाहुण्यांमध्ये कशामुळे परिवर्तन घडले होते?
उत्तर : बोलण्याने, लिहिण्याने व वाचन केल्याने प्रमुख पाहुण्यांमध्ये परिवर्तन घडले होते.
(९) मुग्धाने कोणता संकल्प केला?
उत्तर : मुग्धाने रोज काहीतरी लिहिण्याचा संकल्प केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा