तापमान
प्रश्न १. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :
(१) समुद्रकिनारी भागात तापमान सम असते.
उत्तर : (१) समुद्रकिनारी भागात बाष्पाचे प्रमाण अधिक असते. (२) बाष्प हवेतील तापमान साठवू शकते. (३) त्यामुळे समुद्रकिनारी भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होत नाही. त्यामुळे समुद्रकिनारी भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होत नाही. म्हणून समुद्रकिनारी भागात तापमान सम असते.
(२) खंडांतर्गत भागात तापमान विषम असते.
उत्तर : (१) खंडांतर्गत भागात बाष्पाचे प्रमाण कमी असते. म्हणजेच तेथे हवा कोरडी राहते. (२) त्यामुळे खंडांतर्गत भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होतो. म्हणून खंडांतर्गत भागात तापमान विषम असते.
(३) उत्तर गोलार्धात समताप रेषांमधील अंतर कमी-जास्त झालेले आढळते.
उत्तर : (१) उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. (२) उत्तर गोलार्धात अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्ही घटकांचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होतो. म्हणून उत्तर गोलार्धात समताप रेषांमधील अंतर कमी-जास्त झालेले आढळते.
(४) उष्ण व शीत सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात; त्या भागात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.
उत्तर : (१) उष्ण व शीत सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात; त्या भागात प्लवंक हे माशांचे खाद्य मोठ्या प्रमाणात वाढते. (२) त्यामुळे अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात. म्हणून उष्ण व शीत सागरी प्रवाह जेथे एकत्र येतात; त्या भागात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.
(५) पृथ्वीचे तापमान वाढत आहे.
उत्तर : (१) वातावरणातील अॅरगॉन, कार्बन डायऑक्साइड इत्यादी वायू हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वत:मध्ये सामावून ठेवू शकतात. (२) या वायूंना 'हरितगृह वायू' म्हणतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. (३) वाढते नागरीकीकरण व औद्योगिकीकरण व कमी होणारे वनाच्छादन यांमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. म्हणून वाढत आहे पृथ्वीचे तापमान.
Soham chogale
उत्तर द्याहटवा