धरतीची आम्ही लेकरं
अर्थ - शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची आम्ही मुले आहोत. ज्या जमिनीपुळे आपण आहोत, जी जमीन आपल्याला अन्न, धान्य देते. त्या धरतीची आम्ही मुले आहोत आणि आम्ही फार भाग्यवान आहोत.
(२) शेतावर,.......... रानपाखरं ।।१।।
अर्थ - मुले म्हणतात सकाळ होताच आम्ही शेतावर जाणार आहोत रानावनातील रान पाखरांसोबत गोड गाणी गाणार आहोत.
(३) मेहनत,........ डुले शिवार ॥२॥
अर्थ - वर्षभर शेतात आम्ही कष्ट करतो. त्या श्रमाचे फळ आज मिळाले आहे. शेता पिके डोलत आहेत.
(४) शाळु, जुंधळा....... खाऊ भाकर
अर्थ - शेताता, मोत्यांप्रमाणे जोंधळा चमकत आहे. चमकणाऱ्या या शाळु व जोंधळयाची भाकरी आम्ही वर्षभर खाऊ.
(५) स्थापू समानता .. .....नाही चाकर ।।४।।
अर्थ - धरतीची आम्ही लेकरे एक आहोत. इथे कोणी मालक नाही आणि कोणी नोकर नाही. ही आमची एकता, अखंड टिकणारी, पोलादी आहे. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही समानता स्थापन करणार आहोत.
६)धरतीची.......... आम्ही लेकरं।।
अर्थ या मातीत जन्मलेली आम्ही धरतीची लेकरे आहोत, नेहमी या धरतीच्या सहवासात राहणारी आम्ही मुले खूप भाग्यवान आहोत.
शब्दार्थ -
धरती जमीन,
लेकरं - मुले,
सदा - नेहमी,
भाग्यवान-नशीबवान,
शेत - शिवार; वावर,
रानीवनी रानात-वनात,
मेहनत -श्रम
जुंधळा - जोंधळा,
चमकत्याती-चमकत आहे
स्थापू-स्थापणार
ऐक्यता-एकता,
धनी-मालक,
श्रम, कष्ट,
चाकर- नोकर.
तोंडी प्रश्न :
(अ) (१) मुले कोणाची लेकरे आहेत ?
(२) लेकरं कशी आहेत ?
(३) मुले कोणासोबत गाणी गाणार आहेत ?
(४) मुलांनी मेहनत किती दिवस केली आहे ?
(५) एकता कशी राहणार आहे?
उत्तर - (१) धरतीची (२) भाग्यवान (३) रानपाखरांसोबत (४) वर्षभर (५) पोलादी.
रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द भरा
प्रश्न १ रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द भरा. (१) रानीवनी . ....जशी रानपाखरं ।।
२) जमिनीवर। केली वरील भरी ।
३).........जुंधळा मोती। चमचम चमकत्या ती
(४) धरतीची आम्ही लेकरं .........।
उत्तर (१) गाती, (२) मेहनत, (३) शाळु, (४) भाग्यवान.
प्रश्न २ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) धरतीची मुलं कशी आहेत ?
उत्तर धरतीची मुलं भाग्यवान आहेत.
(२) रानपाखरे कुठे आहेत ?
उत्तर रानपाखरे रानावनात आहेत.
(३) मुले काय स्थापणार आहेत. ?
उत्तर - मुले समानता स्थापणार आहेत.
(४) मुले भाकरी कशाच्या खाणार आहेत ?
उत्तर मुले शाळु आणि जोंधळ्याची भाकरी खाणार आहेत.
प्रश्न ३ खालील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा.
(१) धरतीची मुले भाग्यवान कशी आहेत.? उत्तर - धरतीची मुले सकाळी रानावनात जाऊन रानपाखरा सोबत गायी गातात वर्षभर मेहनत करून शेतात पिके पिकवतात. वर्षभर मोत्याप्रमाणे चमकणाऱ्या शत जोंधळ्याची भाकरी खातात. तेथे कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही अशी समानते स्थापन करतात. अशी पोलादी एकता ते निर्माण करतात. म्हणून ते भाग्यवान आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा