प्रश्न ओळखा पाहू :
उत्तरे
(१) आठ खात्यांचे मंडळ - अष्टप्रधान मंडळ
(२) बहिर्जी नाईक या खात्याचे प्रमुख होते - हेर खाते
(३) महाराजांनी बांधलेला मालवणजवळील जलदुर्ग - सिंधुदुर्ग
(४) किल्ल्यावर युद्ध साहित्याची व्यवस्था पाहणारा - कारखानीस
(५) जमीन महसुलाची व्यवस्था पाहणारा अधिकारी - अण्णाजी दत्तो
(६) पायदळ आणि घोडदळाचा प्रमुख - सरनोबत
(७) शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख - मायनाक भंडारी व दौलतखान
(८) शिवरायांनी बांधलेले डोंगरी किल्ले - राजगड, प्रतापगड, पावनगड
शिवरायांची लष्करी व्यवस्था
पायदळ, हवालदार जुमलेदार
घोडदळ, शिलेदार, बारगीर
तक्ता पूर्ण करा
उत्तरे :
प्रधानाचे नाव - पद - काम
1] मोरो त्रिंबक पिंगळे
प्रधान
राज्यकारभार करणे व प्रदेशाची व्यवस्था पाहणे.
2] रामचंद्र नीळकंठ मुजुमदार
अमात्य
राज्याचा जमाखर्च पाहणे.
3] अण्णाजी दत्तो
सचिव
सरकारी आज्ञापत्रे तयार करणे.
4] दत्ताजी त्रिंबक वाकनीस
मंत्री
पत्रव्यवहार सांभाळणे.
5] . हंबीरराव मोहिते
सेनापती
सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे.
6] रामचंद्र त्रिंबक डबीर
सुमंत
परराज्यांशी संबंध ठेवणे.
7] निराजी रावजी
न्यायाधीश
न्यायदान करणे.
8] मोरेश्वर पंडितराव
पंडितराव
धार्मिक व्यवहार पाहणे.
शिवरायांनी व्यापारवाढीस चालना देण्याची कारणे
नवनवीन गरजेच्या वस्तू राज्यात येतात.
राज्याची भरभराट होते.
संपत्तीत भर पडते
वस्तूंची मुबलकता वाढते.
व्यापार वाढतो.
शिवरायांनी बांधलेले जलदुर्ग
सिंधुदुर्ग , पद्मदुर्ग
शिवरायांनी किल्ल्यांवर नेमलेले अधिकारी
कारखानीस
किल्लेदार
सबनीस
महाराजांच्या घोडदळाचे प्रसिद्ध सरनोबत
नेतोजी पालकर
प्रतापराव गुजर
हंबीरराव मोहिते
प्रश्न (थोडक्यात उत्तरे लिहा.)
(१) शिवरायांच्या घोडदळाच्या रचनेविषयी माहिती लिहा.
उत्तर : (१) शिवरायांच्या लष्करात पायदळाबरोबरच घोडदळ हा महत्त्वाचा विभाग होता. (२) घोडदळात अधिकार्यांच्या श्रेणी होत्या. 'सरनोबत' हा घोडदळाचा सर्वोच्च अधिकारी होता. (३) या दलात शिलेदार आणि बारगीर असे दोन प्रकारचे घोडेस्वार होते. (४) शिलेदाराकडे स्वत:चा घोडा व स्वत:ची हत्यारे असत; तर बारगिराला सरकारकडून घोडा व हत्यारे मिळत असत शिलेदारांपेक्षा बारगिरांची संख्या जास्त असे.
(२) मध्ययुगात किल्ल्यांना का महत्त्व होते?
उत्तर : (१) किल्ले उंच डोंगरावर असल्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशांवर लक्ष आणि नियंत्रण ठेवता येत असे. (२) परकीय आक्रमणाच्या वेळी किल्ल्यांच्या आश्रयानेच प्रजेचे रक्षण करता येत असे. (३) किल्ल्यांवर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य आणि दारूगोळा यांचा साठा करता येत असे व आणीबाणीच्या काळात तो उपयोगी पडत असे. म्हणून मध्ययुगात किल्ल्यांना अतिशय महत्त्व असे.
(३) शिवरायांनी किल्ल्यांची व्यवस्था कशी केली होती ?
उत्तर : शिवरायांनी मोठा खर्च करून स्वराज्यातील सुमारे ३०० किल्ल्यांची बांधणी व दुरुस्ती केली होती. धान्याची कोठी आणि युद्धसाहित्य यांची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी नेमला होता. किल्लेदार, सबनीस, कारखानीस असे अधिकारी नेमून किल्ल्यांची चोख व्यवस्था ठेवली होती.
(४) शिवरायांच्या हेर खात्याविषयी माहिती लिहा.
उत्तर : शत्रूच्या हालचाली वेळेत माहीत व्हाव्यात आणि स्वराज्याचे संरक्षण व्हावे; या हेतूने शिवरायांनी हेर खाते सुरू केले. या खात्याचा प्रमुख बहिजी नाईक शत्रूची माहिती काढून आणण्यात पटाईत होता. हे खाते अतिशय कार्यक्षम होते. सुरतेच्या मोहिमेपूर्वी बहिजींनी तेथील खडान्खडा माहिती आणली होती.
का ते सांगा
(१) शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले.
उत्तर : शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, मोठा प्रदेश मिळवला. (१) या विस्तारलेल्या प्रदेशक कारभार सुरळीतपणे चालवण्याची गरज होती. (२) तसेच, स्वराज्यातील लोकांचे कल्याण साधणे आवश्यक होते यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले.
(२) शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले.
उत्तर : (१) भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज, जंजिन्याचे सिद्दी, सुरत व राजापूरचे इग्र] यांचे वर्चस्व यात आणत असत. (२) या अडथळांस पायबंद घालपे आणि या शत्रूंपासून स्वराज्याच्या पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे, या उद्देशाने शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे केले.
(३) शिवकालीन खेडी स्वयंपूर्ण होती.
उत्तर : शेती हा शिवकालीन खेड्यांचा मुख्य व्यवसाय होता शेतीला पूरक असणारे व्यवसाय गावात चालत असत. गावातील कारागीर वस्तूंचे उत्पादन करीत असत. स्थानिक लोकांच्या गरजा गावातच भागवत्या जात असत शेतकरी शेती उत्पन्नातील काही बाटा या कारागिरांना देत असत. अशा रितीने शिवकालीन खेडी स्वयंपूर्ण होती.
(४) बाहेरील प्रदेशातून स्वराज्यात येणार्या मिठावर शिवरायांनी मोठी जकात बसवली.
उत्तर : (१) स्वराज्यातील उदयोगांना संरक्षण देण्याचे महाराजांचे धोरण होते. (२) पोर्तुगीज प्रदेशातून स्वराज्यात मिठाची मोठ्या प्रमाणात आयात होत असल्याने स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होत असे. (३) पो्तुगिजांकडून येणार्या मिठावर मोठी जकात बसदली तर ते मीठ महाग होऊन आयातीत घट होईल व स्थानिक मिठाची विक्री वाढेल. या विचाराने कोकणातील मीठ उदघोगाला संरक्षण देण्यासाठी शिवरायांनी बाहेरील प्रदेशांतून स्वराज्यात येणान्या मिठावर मोटी जकात बसवली
प्रश्न तुमच्या शब्दांत लिहा : (थोडक्यात माहिती लिहा.)
शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण.
उत्तर : शेती हा खेडयातील मुख्य व्यवसाथ असल्याने शिवाजी महाराजांनी शेतक-यांच्या हिताकडे लक्ष देऊन शेतीविषयक पुढील घोरण ठरवले - (१) जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी अण्णाजी दत्तो या अधिकार्याची नेमणूक केली. (२) ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा न करण्याच्या सक्त आज्ञा दिल्या (3) पडीक जमीन लागवडीखाली आणण्यास उत्तेजन दिले (४) अतिवृष्टी, अवर्षण वा प्रदेश उद्ध्यस्त केल्यास शेतसारा व अन्य करांत सूट तसेच अशा परिस्थितीत शेतकरांना बैलजोडया, नांगर आणि पेरणीसाठी चांगले बी-बियाणे पुरवण्याची व्यवस्था केली.
(२) शिवराय : एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते
उत्तर : शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची पूर्णतः काळजी घेतली शिस्तबद्धपणे राज्यकारभार केला शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला परंतु त्या प्रदेशातील लोकांचेही रक्षण केले. प्रजेला स्वातंत्र्य देणे हा त्यांचा उददेश होता. शेतीबरोबरच व्यापार-उदघोगाची भरभराट होईल याकडे लक्ष दिले. प्रजेवर अन्याय करणाच्या अधिकार्यांना शिक्षा दिल्या. संकटकाळात प्रजेला मदत केली. शिवाजीराजे हे केवळ सत्ताधीश नव्हते. तर एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते
(३) शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ.
उत्तर : स्वराज्याचा कारभार सुरीत चालावा म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकप्रसंगी अष्टप्रधान मंडळाची नि केली. राज्यकारभाराची आठ खात्यांनध्ये विभागणी करून प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. गुण व कर्तृत्व पाहन राजांनी अष्टाप्रधानांची नेमणूक केली. या मंत्र्यांना वेतन व जहागिरी न देता रोख पगार दिला. हे मंत्री महाराजांना जबाबदार असत त्यांची नेमणूक आणि पदावरून दूर करण्याचा अधिकार राजांना होता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा