Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

इयत्ता दहावी, इतिहास व नागरिकशास्त्र, 3.उपयोजित इतिहास


दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा
(१)जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय उत्खनन करताना सापडले.
 (अ) दिल्ली (क) उर (ब) हडप्पा (ड) कोलकाता

 (२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार
(अ) दिल्ली (ब) कोलकाता (क) मुंबई (ड) चेन्नई

 (३) भारतातील या शहरात 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'जनांसाठी इतिहास' या विषयातील संशोधनाचे काम चालते.
(अ) मुंबई (क) चेन्नई (ब) बंगळुरू (ड) कोलकाता

 (४) सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे; या हेतूने या जागतिक संघटनेने दिशादर्शक जाहीर केलेली आहेत.
(अ) राष्ट्रसंघ (ब) संयुक्त राष्ट्रे (क) युनेस्को (ड) विश्वस्त मंडळ

 (५) सातारा जिल्ह्यातील हे पश्चिम घाटरांगांमधील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत समाविष्ट आहे.
(अ) बालाघाटचा डोंगर (ब) मेळघाट (क) मसाईचे पठार (ड) कास पठार
 तत्त्वे

उत्तरे: (१) जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय उर या शहराचे उत्खनन करताना सापडले.
(२) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे.
(३) भारतातील बेंगळुरू या शहरात 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'जनांसाठी इतिहास' या विषयातील संशोधनाचे काम चालते.
(४) सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे; तूने युनेस्को या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत.
(५) सातारा जिल्ह्यातील कास पठार हे पश्चिम घाटरांगांमधील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत समाविष्ट आहे.

पुढील संकल्पना स्पष्ट करा :
 (१) उपयोजित इतिहास (प्रत्येकी २ गुण) उत्तर : (१) एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे 'उपयोजन होय.
 (२) इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे, यालाच 'इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात होते.
 (३) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो
(४) इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात; तसे या विषयांमध्येही इतिहासाचे उपयोजन होते .

(२) अभिलेखागार
 उत्तर : (१) ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात, त्या ठिकाणास 'अभिलेखागार' असे म्हणतात (२) अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची) जुनी कागदपत्रेः)दप्तरे जुने चित्रपट मोजागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. (३) अभिलेखागारांमुळे) मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो तत्कालीन भाषा, लिपी यांचा शोध घेता येतो कालगणना करता येते ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. (४) भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वांत मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वत:चे स्वतंत्र अभिलेखागारही आहे. *

(३) नैसर्गिक वारसा.
उत्तर : (१) सांस्कृतिक वारसा मानवनिर्मित असतो; तर नैसर्गिक वारसा निसर्गाकडून मिळालेला असतो.
 (२) निसर्गातील जैववैविध्याचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत समाविष्ट होतो.
(३) नैसर्गिक वारशात पुढील बाबींचा समावेश होतो - (i) प्राणी (ii) वनस्पतीसृष्टी (iii) प्राणी व वनस्पती यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था (iv) भूरचनात्मक वैशिष्ट्ये.
(४) भारतात सर्वत्र आढळणारी) अभयारण्ये?) उद्घाने अर्वतरांगा, नदयांची खोरी, तलाव क घरणे हा आपल्याला मिळालेला नैसर्गिक वारसा आहे.

टिपा लिहा:
 (१) इंडियन म्युझियम. (प्रत्येकी २ गुण) उत्तर : (१) कोलकाता येथे असणारे इंडियन म्युझियम भारतातील सर्वात मोठे आणि प्राचीन वस्तुसंग्रहालय आहे.
(२) नॅथानिएल वॉलिक या डॅनिश (डेन्मार्क) वनस्पतीशास्त्रज्ञाने १८१४ साली ते एशियाटिक सोसायटीतर्फे स्थापन केले (३) कला, पुरातत्त्व आणि मानवशास्त्र असे या संग्रहालयाच्या व्यवस्थापनाचे प्रमुख तीन विभाग आहेत (४) प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, जतन व संवर्धन, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा अशा विविध विभागांमार्फत म्युझियमचे काम चालते वारशातील हा एक महत्त्वाचा वारसा आहे. भारताच्या सांस्कृतिक (२) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (नॅशनल फिल्म अर्काइव्ह). उत्तर : (१) १९६४ साली राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्थापना झाली (२) भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा 'माध्यम विभाग' म्हणून हे संग्रहालय काम करते. (३) पुणे येथे या संस्थेची मुख्य कचेरी आहे. (४) चित्रपटांच्या वारशाचे जतन करण्याचे आणि आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करते.

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा : (प्रत्येकी )
(१) तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. ३ गुण)
उत्तर : (१) लाखो वर्षांच्या वाटचालीत मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवी कौशल्ये अवगत करीत गेला. (२) दगडांपासून हत्यारे तयार करणे शेतीचे तंत्र अशी वाटचाल करीत तो विज्ञानयुगात आला (३) कृषी उत्पादन) वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये बदल होत गेले. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो

(२) जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. उत्तर : (१) पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा आपला सांस्कृतिक वारसा असतो. हा (२) त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते.
(३) हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते.
 (४) काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होऊ नये आणि त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी 'युनेस्को' या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते.

 (३) तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते.
उत्तर-(१) काल प्रवाह विविध विचारसरणीचा उगम होत असतो.
(२) या विचारसरणीचा समाजावर विविध काळात कमी -जास्त प्रभाव पडलेला असतो.
(३) या विविध विचारसरणीचा ठाम कसा झाला, त्यामाक प्रभाव पडलेला असतो. वैचारिक परंपरा कोणत्या होत्या, यांचा शोध घेण्याची गरज असते.
(४) या विचारसरणीच्या वाटचालींचा, त्यांच्या विकाय, विस्ताराचा किंवा अधोगतीचा इतिहास समजून घेण्यासाठी तत्वज्ञाना इतिहास अभ्यासण्याची गरज असते.

(४) उदयोग-व्यापार यांच्या व्यवस्थापनाचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते.
उत्तर : (१) उदयोगधंदे आणि व्यापार यांचा संबंध सर्व मानी समूहांशी येतो; त्यामुळे मानवी व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. (२) सांस्कृतिक संबंधांचे जाळेही सतत विकसित होत असते.
(३) बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले की मानी व्यवहारातील संबंधही बदलत जातात.
(४) बदलाच्या या प्रवासावर तत्कालीन सांस्कृतिक जडणघडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था यांचाही परिणाम होतो. या सर्व बाबी या उद्योग-व्यापाराच्या व्यवस्थापनाचाच भाग असल्याने उद्योग-व्यापार यांच्या व्यवस्थापनाचा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे असते.

  पुढील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा : (प्रत्येकी ३ गुण)
 (१) जनांसाठी इतिहास' ही संकल्पना स्पष्ट करा.
 उत्तर : (१) इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास' होय.
 (२) इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्यकाळात कसा होईल, याचा विचार 'जनांसाठी इतिहास' या विषयात केला जातो.
(३) वर्तमानकालीन समस्यांवरील उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनांविषयीचे ज्ञान ठपयुक्त ठरू शकते. (४) उपयोजित इतिहास' या संज्ञेला 'जनांसाठी इतिहास' असा पर्यायी शब्दप्रयोग केला जातो.

(२) ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्मात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे?
 उत्तर : संयुक्त राष्ट्रांच्या 'युनेस्को' या आंतरराष्ट्रीय संस्थेने ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात पुढील कार्य केले आहे .
(१) नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन व संवर्धन कसे करावे याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.
(२) जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी ही संघटना वेळोवेळी जाहीर करते.
 (३) अशा यादया जाहीर करून युनेस्को प्राचीन वारसा जपण्यासाठी लोकांचे व राष्ट्राचे लक्ष वेधून घेते.

 (३) सांस्कृतिक वारसास्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती, हे शोधून लिहा.
उत्तर : युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील पुढील ठिकाणांचा समावेश आहे
(१) अजिंठा लेणी.
(२) वेरूळची लेणी व कैलास मंदिर,
 (३) घारापुरीची लेणी.
 (४) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई. या यादीत नसलेले रायगड देवगिरी जंजिरा सिंधुदुर्ग इत्यादी गड किल्ले व जल किल्ले हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा स्थळांत समाविष्ट होतात.

 (४) इतिहासाविषयी लोकांत कोणते गैरसमज असतात?
उत्तर : इतिहासाविषयी लोकांत पुढील गैरसमज असतात
(१) इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो.
 (२) वर्तमानकाळात दैनंदिन जीवनात या विषयाचा काहीच उपयोग नसतो.
(३) इतिहास म्हणजे फक्त राजांची युद्धे व राजकारण यांचीच माहिती होय.
 (४) इतिहासासारखा विषय जोडला जाऊ शकत नाही. आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्रांशी जोडला जाऊ शकतो.

(५) तत्त्वज्ञानाची बीजे कोणत्या विचारांत रुजलेली दिसतात?
उत्तर : (१) विश्वाचा पसारा आणि त्यातील मानवाचे अस्तित्व यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्याच्या प्रयत्नांत जगातील सर्वच मानवी समाज आपली अनुमाने मांडू लागले.
 (२) या प्रयत्नात जगाच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथा रचल्या गेल्या.
(३) सृष्टिचक्र आणि मानवी जीवनासंबंधीची मिथके मांडली गेली.
(४) देव-देवता या संबंधीच्या कल्पना व त्यांना प्रसन्न करण्यासंबंधीचे विधी सांगितले गेले. या तात्त्विक विवेचनात तत्त्वज्ञानाची बीजे रुजलेली दिसतात.

(६) उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील विविध प्रकल्पांमुळे व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध झाल्या आहेत? उत्तर : उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात संग्रहालये, अभिलेखागारे, पर्यटन, मनोरंजन इत्यादी विविध प्रकल्प येतात. या प्रकल्पांमुळे व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध होतात -
(१) पुरातत्त्वज्ञ, कायदेतज्ज्ञ, सचिव, व्यवस्थापक, संचालक, ग्रंथपाल इत्यादी अधिकारपदाच्या संधी.
(२) इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, आयासक, संशोधक, स्थापत्य विशारद असे तज्ज्ञ लोक,
(३) रंगकर्मी, छायाचित्रकार वास्तुरक्षक, प्रयोगशाळा साहाय्यक, छायाचित्रणतज्ज्ञ असे तंत्रकर्मी
(४) पर्यटक मार्गदर्शक, निवास व भोजन व्यवस्था, मनोरंजनाची साधने इत्यादी व्यवसाय करणारे व्यावसायिक

 (७) 'नॅशनल फिल्म अक्काइन्ह' या संस्थेच्या स्थापनेचे उद्देश कोणते होते? उत्तर : 'नॅशनल फिल्म अक्काइव्ह' ही संस्था स्थापन झाली पुढील उद्देशांसाठी (१) दुर्मीळ अशा भारतीय चित्रपटांचा शोध घेऊन ते मिळवणे.
 (२) भविष्यातील पिढ्यांसाठी अशा दुर्मीळ चित्रपटांच्या वारशाचे जतन करणे (३) चित्रपटांशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी करणे व संशोधन करणे.
(४) चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र स्थापित करणे.

(८) उपयोजित इतिहासात कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो?
 उत्तर : उपयोजित इतिहासात पुढील गोष्टींचा विचार आणि नियोजन केले जाते (१) लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन करणे (२) आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती निर्माण करणे (३) समाजजागृतीसाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग करणे, (४) इतिहासाच्या उपयोगाच्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्ये आणि उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ करणे, (९) उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेचा सहभाग स्पष्ट करा. उत्तर : (१) उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात संग्रहालये, प्राचीन वास्तू इत्यादींचा समावेश होतो. ही ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक म्हणून सामान्य जनतेचा उपयोजित इतिहासात समावेश होतो. (२) पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण होते. जतन व संवर्धन केले पाहिजे ही जाणीव त्यांच्यात निर्माण होते (३) आपल्या शहरांतील वा गावांतील प्राचीन स्थानिक स्थळांचे (४) या जाणिवेतून जतनाच्या प्रकल्पांत ते स्वतःहुन सहभागी होतात.

पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:(४ गुण)
(१) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय कोठे सापडले?
व ते कोणी शोधले?
उत्तर : (१) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियातील उर' या शहरात सापडले (२) ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांना उर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला.

 (२) हे संग्रहालय कोणी वांधले होते? उत्तर : मेसोपोटेमिया राज्याची राजकन्या एनिगॉल्डी हिने उर येथील हे संग्रहालय बांधले होते.

(३) या संग्रहालयाचा विशेष कोणता होता? उत्तर : या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तू सोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका (अक्षरे कोरलेल्या मातीच्या पाट्या) होत्या, हा या संग्रहालयाचा विशेष होता.

 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा : (प्रत्येकी ४ गुण) *
(१) पुढील विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती कशी उपयुक्त ठरेल ते स्पष्ट करा : (अ) विज्ञान (व) कला (क) व्यवस्थापनशास्त्र.
 उत्तर : प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारेच प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्वच विषयांतील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. त्यांतील काही विषय
(अ) विज्ञान :मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नांतून अनेक वैज्ञानिक शोध लागतात. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोघांमागील कारणपरंपरा, कालक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते.
 (ब) कला : कोणत्याही कलेचा विकास वैचारिक, भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारेच अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. संबंधित कलाकृती कशी साकार झाली, त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती, प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. (क) व्यवस्थापनशास्त्र : उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ, उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार व विक्री या सर्व ठिकाणी
व्यवस्थापन शास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाहि आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. या व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्था सुलभ करणे यांसाठी भूतकालोन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते.


 (२) उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबं असतो? उत्तर : इतिहास द्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्र होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकर कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जाते उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो (१) भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकाली वाटचाल निश्चित करतो. (२) आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्य मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहरू पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजि इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजिता इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता यें (३) उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांक उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडव करता येते. (४) भूतकालीन अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयक्ते निर्णय घेणे शक्य होते. (५) उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाला यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.


(३) इतिहासाच्या घनांचे जतन व्हावे, यासाठी किमान उपाय सुचवा.
 उत्तर : इतिहासाच्या साधनांत लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगवेगळ्या पद्घतीने जर्- करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढोल उपाययोजना कराव्यात
(१) किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे.
 (२) वास्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे वा कोरणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत.
 (३) ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादो वस्तु सावधतेने हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी प्यावी.
 (४) ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्य संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे.
(५) प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यांपासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यांमुळे बुरशी लागते. म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधांचा वापर करावा.
(६) या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत.
(৩) ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावेत.
(८) या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे.
(९) या साधनांविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे, त्याचे महत्त्व पटवून देऊन त्याविषयी त्यांच्या मनात गोडी निर्माण करावी.
(१०) ऐतिहासिक साधनांच्या जतनात सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामील करून घ्यायला हवे. तसे उपक्रम हाती घ्यायला हवेत.

 (४) भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन कोणाकडून केले जाते?
उत्तर : भारताला लाभलेल्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन वेगवेगळ्या पातळ्यांवर केले जाते.
 (१) प्रामुख्याने भारत सरकारचे पुरातत्त्वखाते हे जतनाचे कार्य करीत असते.
(२) प्रत्येक राज्याची पुरातत्त्व खातीही हे काम करीत असतात.
(३) 'इनटॅक' (इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज) ही स्वयंसेवी संस्था १९८४ पासून हे काम करीत आहे. (४) देशभरातील अनेक सामाजिक संस्था, स्थानिक शासन संस्था आणि इतिहासप्रेमी लोक सांस्कृतिक वारशाचे जतन करताना दिसतात.
 (५) सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन करण्यात त्या त्या विषयातील जाणकार व तज्ज्ञ तसेच स्थानिक लोक यांचेही सहकार्य होत असते.

(4) नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? उत्तर : नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पांतून पुढील गोष्टी साध्य होतात (१) प्रकल्पांतर्गत वारसास्थळाच्या मूळ स्वरूपात बदल न करता जतनाची व संवर्धनाची कामे करणे शक्य होते. (२) स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता कशी आहे, त्यांच्यापुढे वर्तमानात कोणती आव्हाने आहेत तसेच स्थानिक लोकांच्या अपेक्षा काय आहेत यांचा आढावा घेता येतो.
(३) सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करीत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत; यासाठी उपाययोजनांचे नियोजन करता येते.
(४) नियोजित प्रकल्पाच्या कामात स्थानिक लोकांना सहभागी करून घेता येते.
(५) स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील, अशा उद्योग-व्यवसायांना चालना मिळावी, यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होते.

1 टिप्पणी: