Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

इयत्ता पाचवी, मराठी,७.अरण्यलिपी

                  अरण्यलिपी
 अरण्यलिपी पाठवरिल चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
 https://forms.gle/tMdRgTH8q8TwwiEKA



प्रश्न १. एका वाक्यात उत्तरे लिहा :
 (१) 'अरण्यलिपी' म्हणजे काय?
उत्तर : जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खाणाखुणांना ' अरण्यलिपी' म्हणतात.

 (२) वाघांची गणती कशावरून केली जाते?
 उत्तर : वाघांच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते.

 (३) जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात?
 उत्तर : जंगलात हरीण, सांबर, काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात.

 (४) पाणवठ्यावरील ओल्या मातीत काय आढळते?
उत्तर : पाणवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पशुपक्ष्यांच्या पाऊलखुणा  आढळतात.

(५) कोणत्या प्राण्याचा ठसा सुबक दिसतो?
उत्तर : जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो.

* प्रश्न २ पुढील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा :
(१) 'वाघाचे क्षेत्र' कशावरून ओळखता येते?
उत्तर : आपल्या पावलांचा आवाज होऊ नये, म्हणून वाघ पालापाचोळ्यांतून चालत नाही तो पाऊलवाटेवरून किंवा नदीनाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो. अशा पाऊलवाटा किंवा नदीनाल्यातली ओली वाळू तपासावी. त्या मातीत वाघाचे रेखीव पाऊलठसे आढळतात. त्यावरून वाघाचे क्षेत्र कोणते ते ओळखता येते.

(२) वाघ-वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो?
उत्तर : वाघ-वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात. पण त्यांच्या मागच्या पंजांत  बराच फरक असतो. वाघाचे मागचे पंजे चौकोनी असतात, तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात.

(३) शिकार झालेला प्राणी कोणता आहे, हे कशावरून ओळखता येते?
 उत्तर ; काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस, नखे व आढळतात. या न पचलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेला प्राणी कोणता होता, हे ओळखता येते.

प्रश्न ३. कंसांतील योग्य शब्द गाळलेल्या जागी भरा :
(१) पाणवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या
 (खाणाखुणा/पाऊलखुणा)
(२) वाघाच्या पायाचा अंगठा पंजाच्या बाजूस असतो. (खालच्या/वरच्या)
(३) वाघिणीच्या पायाचा तळवा असतो. (आयताकृती/चौकोनी)
(४)...... असलेल्या प्राण्यांचे ठसेही पाणवठ्यावर मातीत पाहायला मिळतात. (तळवे/खुरे)
उत्तर-१)पाऊलखुणा २)वरच्या ३) आयता कृती ४)खुरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा