वसंतहृदय चैत्र
महत्त्वाचे मुद्दे
या पाठात चैत्र महिन्याचे सौंदर्य विशेष लेखिकांनी आस्वादक भाषेत सादर केले आहे. फाल्गुन, चैत्र व वैशाख या तीन महिन्यांत वसंताचे अस्तित्व जाणवत असले, तरीही वसंत ऋतूचे मनोहारी दर्शन चैत्रातच घडते. विविध वृक्षांच्या आधारे लेखिकांनी चैत्राचे सौंदर्यमाहात्म्य वर्णिले आहे. १. पिंपळाचे झाड : याला फुटणारी पालवी गहिऱ्या गुलाबी रंगाची असते. सर्व पाने आल्यावर गुलाबी रंग तांबूस गुलाबी बनतो. उन्हात झळाळतो. मधुमालतीच्या वेलीची नवीन पालवी गुलाबी रंगाची असते. पिंपळाला बिलगलेल्या मधुमालतीची पाने आणि पिंपळाची पाने यांच्या एकत्र दर्शनाने गुलाबी व तांबूस गुलाबी या रंगांचे लावण्य नजरेस पडते.२. घाणेरी : घाणेरीची फुले रंगीबेरंगी असतात. विविध रंगांचा उत्सव झाडावर साजरा होत असतो. गुजरात-राजस्थान यांसारख्या रखरखीत प्रदेशात घाणेरी रंगांचा उत्सव मांडते. ३. माडाचे झाड : बारमहा हिरवे राहणारे आणि बारमहा फळ देणारे झाड. याची फुले बिनवासाची असतात. टणक असतात. पण स्पर्श मात्र सुखावणारा असतो. ४. कडुनिंबाचे झाड : फुलांचे निळसर तुरे येतात. याचा सुगंध सामान्यतः रात्री जाणवतो. ५. करंजाचे झाड : याचा गंध कडवट व उग्र असतो. फूल मात्र अलौकिक असते. करंजीच्या आकाराची पांढऱ्या हिरव्या रंगाची कळी नखाएवढी असते. फुललेल्या फुलात नाजूक, सुंदर, निळीजांभळी कळी असते. तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळाकार पांढरी टोपी असते. ६. आंब्याचे झाड : पौष महिना संपता संपता आंब्याला मोहर येतो. चैत्रात कैऱ्या आकाराला येतात. कैऱ्या जून होऊ लागल्या की पाने झडू लागतात. पण त्याच वेळी नवीन पालवीसुद्धा फुटते. वसंताच्या उत्तर काळात आंबे पिकू लागतात. ७. फणस : सदोदित टवटवीत असणारे झाड. या झाडाच्या अंगभर फळे लटकत असतात. या झाडाला फुले येत नाहीत. हिरवे कोके येतात. त्यातून पुढे फणसाचे फळ आकाराला येते. अशा प्रकारे चैत्र रूपरसगंधांनी भरलेला व भारलेला असतो. याचा सर्व प्राणी-सृष्टीवर आनंददायी प्रभाव पडतो. पक्ष्यांची घरटी याच काळात उभी राहतात. पक्षी अंडी घालतात. पिल्ले जन्माला येतात. सर्वत्र नवनिर्मिती चालू असते. सर्व वातावण मोहक असते. भारून टाकते. हे सर्व कोठून येते? कसे निर्माण होते? याचे रहस्य मानवी बुद्धीला समजून येणे अशक्य असते. निसर्गाच्या मुळापर्यंत जाणे त्याच्या सामर्थ्याच्या पलीकडची गोष्ट आहे. आपण फक्त निसर्गाच्या सहवासाचा आनंद घ्यावा.
वसंतहृदय पाठावरील चाचणी सोडवण्यासाठी येथे क्लिक करा
उतारा क्र-१
फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात
मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी
सुंदर रीतीने वर्णन केले आहे :
जैसे ऋतुपतीचे द्वार । वनश्री निरंतर
वोळगे फळभार लावण्येसी ।।
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन
तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्यतर आहेच; पण फळांचेही रूप
दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो.
चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर; पण ही पिंपळाची
झाडे पाहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत
उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून
शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती; पण सारी
नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने
चमकतात, तेव्हा जणूकाही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले
आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार
हलत नाही; पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात
आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे, ते तर फारच बहारीचे
दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. चारी
बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली
आहे. आता फुलायला आणखी जागा नाही, अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे आणि
नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदीफांदीला ओळीने चिकटून बसली आहेत.
सर्व फुलांत अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी, किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या
गुच्छांनी ती भरली आहे. गुलाबी फुलांत एखादे पिवळे, पिवळ्यांत एखादे गुलाबी, शेंदरी व पिवळा, पिवळा आणि
जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंदरी आणि जांभळा, किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या
रंगांचे वर्णन करावे? वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत; पण
निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत, उलट एकमेकांची शोभा
वाढवतात. गुजरातेत बऱ्याच भागांत वृक्षवनस्पतींचा दुष्काळ. तिथे या झाडाला
भलतेच महत्त्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या
अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून पुढे जातो; पण गुजरातीत ‘चुनडी’ असे सुंदर व
यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेले आहे आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर
काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचे रहस्य मला उमगले.
भडक विशाेभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगाची
मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी
शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरुचीचे
मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते
कृती-१
वसंत ऋतुतिल महीने कोणते?
फाल्गुन, चैत्र ,वैशाख
चैत्राला दिलेली दोन नावे कोणती?
१)वसंतात्मा २) मधुमास
१)पिंपळ व मधुमालती यांचे मनोहारी दर्शन
पिंपळाला अर्ध्यापर्यंत वेढून करणाऱ्या मधुमालतीच्या गुलाबी गेंदांनी आणि पिंपळाच्या तांबूस पानांनी वनश्री डवरलेली होती.
२)मधुमालती व पिंपळ यांची हिरवी फळे दाटीवाटीने फांदयांना लगडलेली होती.
घाणेरिची कोणतीही दोन वैशिष्ट्ये
१)उग्र गंध
२)दोन रंगाची फुले
(२)-रिकाम्या चौकटी पूर्ण करा
(i) वसंत ऋतूचा आत्मा असलेला महिना-चैत्र
(ii) गच्च फुलापानांनी डवरलेली व मधुरसाने भरलेल्या फळांनी लगडलेल्या वनश्रीचा महिना -चैत्र
(ii) गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवणारे झाड-पिंपळ
(iv) गडद गुलाबी गेंदांनी खच्चून भरलेली वेल चैत्र चैत्र पिंपळ -मधुमालती
(३) वसंत हा ऋतुचक्रातील पहिला ऋतू. निसर्गातील सर्व जन्मांची, निर्मितीची, सर्जनाची सुरुवात या ऋतू पासून होते. त्यामुळेच सणासुदीला नटूनथटून तयार व्हावे, तसा निसर्ग आनंदोत्सवासाठी सिद्ध होतो. वृक्षवेलींवर नवनवी, कोवळी, टवटवीत पालवी पसरते. हिरव्या रंगाच्या असंख्य छटा पानापानांतून वाहत असतात. असंख्य फुले आपल्या अंगाखांद्यावर अनेक रंग लेवून सादर होतात. मधुर फळे झाडाझाडांवर डोलत असतात. मधुर रसाचा सुगंध वातावरणात भरून राहतो. वसंताच्या या उत्सवाची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये हा उत्सव टिपेला पोहोचतो आणि वैशाखात वसंत पायउतार होत असतो. म्हणजे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण, उत्कट दर्शन चैत्रात होते. म्हणून चैत्र वसंतात्मा व मधुमास आहे.
कृती-2
१)साम्यभेद लिहा
पिंपळ
(i) पिंपळ हे झाड आहे.
(ii) पानांचा रंग गडद गुलाबी व तांबूस गुलाबी असतो.
(iii) लालगुलाबी पानांनी पिंपळ डवरलेला असतो.
(iv) गोल, लहान, हिरवी फळे येतात.
मधुमालती:
(i) मधुमालती ही वेल आहे.
(ii) पानांचा रंग गुलाबी असतो.
(ii) गुलाबी पाने वेलीवर खच्चून भरलेली असतात.
(iv) गोल, लहान, हिरवी फळे येतात.
(२) निसर्गातील भडक रंगांबाबतचे लेखिकांचे मत लिहा.
उत्तर- एरवी भडक व विसंगत वाटणारे रंग निसर्गाच्या दुनियेत विशोभित दिसत नाहीत. ते एकमेकांची शोभा वाढवतात.
(३) लेखिकांच्या मते, भारतीय रंगाभिरुचीचे मूळ कुठे आहे, ते लिहा.
उत्तर- गुजरात-राजस्थानात घाणेरी मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने तेथील लोकांच्या वस्त्रप्रावरणात गडद रंगांचा प्रभाव जाणवतो.
(४) उताऱ्याच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडांची नावे लिहा:
(i) गुलाबी गेंद -मधुमालती
(ii) तांबूस रंगाची कोवळी पालवी :पिंपळ
(iii) दुरंगी फुले -घाणेरी
कृती-३(व्याकरण कृती)
संधी सोडवा
(i) रंगाभिरुची=रंग+अभिरुचि
(ii) नामाभिधान =नाम+अभिधान
(iii) वसंतात्मा रंग = वसंत + आत्मा
(२) (i) कु - कुकर्म, के वचन
(ii) सु - सुभाषित, सुवास.
वाक्यात उपयोग करा
(i) आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाल्याची पताका नाचवतच मानसी घरात शिरली.
(ii) नगरसेवक झाल्यानंतर पहिल्याच वर्षात त्याने कमावलेली संपत्ती सर्वांच्याच डोळ्यात भरत होती.
(iii) गांधीजींचे आवाहन शिरोधार्य मानून दुर्गा भागवत यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत उडी घेतली.
कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती) • राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या त ने भडक रंगाचे लेखिकांना उमगलेले रहस्य तुमच्या शब्दांत समजावून सांगा. उत्तर : राजपुताना हा प्रदेश म्हणजे रखरखीत वाळवंटच. नजर जाईल तिथपर्यंत हिरवागार, डेरेदार वृक्ष दिसतच नाही. असलीच तर कुठे कुठे खुरटी झुडपे असतात. त्यामुळे या परिसरातील माणसे निसर्गाच्या सुंदर रूपांच्या दर्शनासाठी तहानलेली असतात. अशा स्थितीत या प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतात ती घाणेरीची झाडे. अनेक गडद रंगांच्या फुलांनी ही झाडे डवरलेली असतात. सुंदर निसर्गरूपांसाठी आसावलेल्या मनांना या रंगांनी आकर्षित केले नसते तरच नवल. म्हणून या परिसरातील माणसांच्या वस्त्रप्रावरणात, विविध प्रकारच्या सुशोभनात भडक रंगाचा आढळ मोठ्या प्रमाणात होतो. खरेतर, निसर्गाच्या सान्निध्यात सतत वावरणाऱ्यांना विविध रंगांची ओढ असतेच. शहरी भागात राहणारी माणसे मुक्त निसर्ग दर्शनाला मुकतात. ती बहुतांशी कृत्रिम वातावरणात राहतात. म्हणून त्यांच्या वस्त्रप्रावरणात, सुशोभनात फिक्या रंगांचा प्रभाव असतो. ही माणसे या फिक्या रंगांच्या निवडीला उच्च अभिरुची समजतात. थोडक्यात, माणसांच्या रंगांविषयीच्या अभिरुचीमध्ये त्यांच्या अवतीभोवतीच्या निसर्गाच्या रूपाचा प्रभाव खूप असतो.
उतारा-2
तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पाहा. माडाची झाडे बारमहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात.
पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा; पण फाल्गुन लागला,
की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे
वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या
वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून
वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत
या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक; पण
झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून चार-दोन फुले उचलून
घेऊन जरा निरखून पाहा. त्यांचा तो टणकपणा तुम्हांला बोचणार
नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात. तीन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुले. आत तशाच
रंगांच्या केसरांची दाटी. तीन पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून, त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज
राहणार नाही. प्रचंड नारळाचे हे नखाएवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते!
शेजारचे कडुनिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेले आहे. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम
वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही सबंध फुलले आहे. करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक
असते. अगदी नखाएवढी कळी; करंजीच्याच आकाराची, पांढरी, हिरवी; पण फूल उमलले की किती निराळे दिसते. आत
एक निळी-जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी. जणूकाही टोपडे घातलेला
बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे. रस्त्यावर पडलेला या फुलांचा खच फार रमणीय दिसतो.
कृती-१
प्रश्न. पुढील उतारा सूचनांनुसार कृती करा : वाचा कृती १ : (आकलन कृती) * (१) उताऱ्याच्या आधारे दिलेल्या वैशिष्ट्यांवरून झाडाचे नाव लिहा :
(i) निळसर फुलांचे तुरे -कडुनिंबाचे झाड
(ii) कडवट उग्र वास-करंजाचे झाड
(iii) तीन पाकळ्यांचे फूल- माडाचे झाड
योग्य जोड्या जुळवा
(i) भुरभुरणारे जावळ - माडाच्या लोंब्या (ii) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी - करंजाची कळी
कृती-2
नावे लिहा
(i) बारमहा फळे धरणारे झाड : माड (ii) रात्रीच्या वेळी मनोरम सुगंध देणारे झाड : कडुनिंब
(२) पुढे काही झाडांची वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यांतील चुका दुरुस्त करून योग्य वैशिष्ट्ये लिहा :
(i) कडुनिंबाचे झाड : निळसर फुलांचे तुरे. कडवट उग्र वास. पांढरी-हिरवी कळी करंजीच्या आकाराची.
(ii) करंजाचे झाड : माथ्यावर फिक्या रंगाचे जावळ भुरभुरत असते. फुललेल्या फुलाच्या आत एक नाजूक सुंदर कळी असते. तिचा रंग निळा-जांभळा असतो. तिच्या डोक्यावर वर्तुळाकार लाल टोपी असते.
(ii) माडाचे झाड : बारमहा हिरवेगार असते. वसंतऋतूत फळे धरतात. नारळाची फुले सुगंधी व मुलायम असतात. ही फुले कधी तीन पाकळ्यांची सुद्धा असतात.
ऊत्तर- (i) कडुनिंबाचे झाड : निळसर फुलांचे तुरे त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी मनाला खूप सुखावणारा असतो.
(ii) करंजाचे झाड : फुललेल्या फुलाच्या आत एक नाजूक सुंदर कळी असते. तिचा रंग निळाजांभळा असतो. तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळाकार पांढरी टोपी असते.
(iii) माडाचे झाड : बारमहा हिरवेगार असते. बारमहा फळे धरतात. नारळाच्या फुलांना गंध नसतो. ती टणक असतात. या फुलांना तीन पाकळ्या असतात.
कृती-३ (व्यकरण कृती)
१)चतुर+य=चातुर्य असे आणखी दोन शब्द लिहा.
(१) सुंदर + य = सौंदर्य
(२)समान+य=सामान्य
पिवळा+सर=पिवळसर असे आणखी दोन शब्द लिहा.
(१ )काळा + सर = काळसर
(२)लाल+सर= लालसर
कृती-४ स्वमत (अभिव्यक्ति)
कती ४ । (१ / अभिन्यती) (१) तुम्ही अनुभवलेला 'चेन्र' तुमच्या शब्दात वर्णन करा. जाता । वेगवेगळे वात आणि त्यामची वेगवेगळी रूपे, त्यांचे विग शहरात कपी दिसत नाहीत, शहरातील वातावरण तसे निरंगी, फिकत व अनुभवायचा असेल, तर गावीच गेले पाहिजे. आम्ही अनेकदा सहलीला गेलो आहोत, पण गावी गेल्यावर निसर्गाचा जो सहवास लागतो, त्याचा आनंद अवर्णनीय असतो. सुदैवाने माझे काका आमच्या गावी राहतात. यामुळे वसंत ऋतूत गावी जाण्याचे भाय आ्हाला लाभते, तिथे गेल्यावर मन मोहित होऊन जाते. जे कपीही जाणवलेले नसते, ते सौंदर्य तिथे दिसते. कोणीही समजावून न सांगता दिसते. आता हे चापयाचे झाड पाहा. खास्तविक, त्या झाडाच्या रूपात आकर्षक म्हणावा असा एकही घटक नाही. पण तोच पांढरा चाफा फुलांनी डवरल्यावर पाहा, मन लोभावतेच, आपण नकळत वाकून जमिनीवर पडलेले फूल चालतो. पाकळ्यांवर हात फिरवतो. आतडोकावून पाहतो चिमूटभर हळद पूड अलगद सोडलेली असावी, तसा पिवळा रंग तिथे शोभून दिसतो गडद पिवळ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांनी डवरलेली सारंगी तर पाहतच राहावी सूर्याचा प्रकाश पड़ताच, ती फुले पूर्ण उमलतात. सारे रान सुगंधाने भरून जाते जिकडे पाहावे तिकडे कोवळी कोवळी हिरव्या रंगांची पाने आणि शेकडो रंगछटा लेवून बसलेली फुले! निसर्ग या विविध रंगांनीच आच्छादलेला असतो हे मला आमच्या गावी कोकणात पाहायला मिळते. मी तर ठरवलेच आहे. मोठा झालो की कोकणातच कायम राहायचे.
(२) वसंतत्रतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा. उत्तर : आम्ही एकदा आमच्या गावी गेलों होतो. वसंतऋतूच होता तो. त्या काळात रानातून नुसता फेरफटका मारणे म्हणजे फक्त आनंद आणि आनंदच असतो. काही खायला नको किंवा काही प्यायला नको. फक्त डोळे भरून निसर्गाचे दर्शन घ्यायचे असेच फिरत असताना आम्रफुलांचा सुगंध आला. आमचे जवळच्याच आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेले झाड मोहराने भरलेले होते. अनेक फांदयांवर टरटरून फुगलेल्या टवटवीत कैऱ्या दिसल्या. आमच्या तोंडाला पाणी सुटले. नकळत आमच्या हातात दगड आलेच. ते भराभर झाडावर मारू लागलो. बाजूने जाणारा एकजण कळवळला. त्याने आम्हांला थांबले. स्वत: झाडावर चढला. आम्हांला कैऱ्या काढून दिल्या. लगोलग घरी गेलो. आईने मीठ- मसाल्याची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना लावले. आणि काय सांगू? हे लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्या दिवसाची ती कैरीची चव मी अजूनही विसरलेलो नाही. अजूनही वसंतऋतू म्हटला की मला ती कैरी आठवतेच.
उतारा -३
चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या-फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. वसंताशी पौषाअखेरीपासूनच
मोहोरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड. लांबलचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत
असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागल्या आहेत की
नाहीत ते पाहण्याकरिता त्यांना चोचींनी प्रहार करतात, तेव्हा मोठी मौज
दिसते. गावाबाहेरच्या झाडांतून कोकिळांचे कूजनही बहुधा याच झाडांवर
चालत असते. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झडत
असतात; पण झाड रूक्ष असे कधीच दिसत नाही. चैत्रात याही झाडाला
पालवीचे घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात.
माघातले मोहोरांच्या झुबक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर
की आताचे,हे सांगणे कठीण आहे.
कृती-१
प्रश्न. पुढील सूचनांनुसार कृती करा : कृती १ : (आकलन कृती)
(१) रिकाम्या चौकटी भरा :
(i) आंब्याला मोहोर येण्याचा सुरुवातीचा काळ-पौषअखेर
(ii) फणसाला कोके येतात ते महिने-पौष व माघ
(iii) आंब्याचे झाड मोहोरांच्या झुबक्याने भरून जाते तो महिना - काळाकबरा
(iv) पायापासून डोकीपर्यंत फळे लादली जातात ते झाड -फणस
(२) जोड्या लावा
(i)फुलाऐवजी कोके येतात ते झाड- फणस
(ii) कोकिळाचे कूजन चालते ते झाड-आंबा
(iii) चैत्राची रूपरसगंधमय शोभा पूर्णत्वाला नेणारी-पक्ष्यांची घरटी
(iv) पक्ष्यांच्या घरट्यांचा रंग -काळाकबरा
(v) लांबलचक देठ -कैऱ्याचे गोळे
कृती २ : (आकलन कृती) *(१) पुढील वाक्यांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :
(i) काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.
(१) (i) चित्रलिपी ही खूप बारीक बारीक कलाकुसर असलेले सुंदर चित्र वाटते. मात्र, ही लिपी थोडीशी कळते, पण खूपशी कळतच नाही. अवतीभोवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्ग दृश्य म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय. निसर्ग थोडासा कळतो आणि न कळलेला भाग विराट असतो. विविध सुंदर आकारातील पक्ष्यांची घरटी निसर्गाच्या या चित्रलिपीचा भाग बनतात. निसर्ग न्याहाळता न्याहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते. पुढे सरकावे असे वाटतच नाही. इथे आपण जणू विराम घेतो. म्हणून लेखिकांना ही घरटी निसर्गाच्या चित्रलिपीतील विरामचिन्हे वाटतात.
(ii) माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो.
(ii) निसर्गाचे विराट रूप आपल्या चिमुकल्या मनात मावतच नाही. तरीही ते विराट रूप न्याहाळण्याची मनाची ओढ नष्ट होत नाही. निसर्गाच्या या अफाट पसाऱ्यातला आपणही एक घटक असतोच. म्हणून एखादे लोभसवाणे दृश्य, ते चिमुकले असले तरी, मनाला खिळवून ठेवते. त्या चिमुकल्या रूपातही विराट निसर्गाचे, अल्पस्वरूप का होईना, दर्शन घडते. हे अल्पस्वरूप दर्शन म्हणजे माधुर्याचा एक थेंब असतो. तो अफाट निसर्गाच्या दर्शनाचा आनंद देऊन जातो.
(२) चूक की बरोबर ते लिहा :
(i) चैत्रात फणस फुलांनी डवरतो. -चूक
(ii) फणसाला चैत्रात नव्या पालवीचे घोसच्या घोस येतात. -चूक
(iii) निसर्गाचा विराट आविष्कार डोळ्यात न मावणारा असतो.-बरोबर
(iv) चिमुकल्या निसर्गदृश्यात निसर्गाच्या विराट आविष्काराचे दर्शन घडते.- बरोबर
कृती-३
कृती ४ : (स्वमत / अभिव्यक्ती)
(१) 'निसर्गाचे प्रतिबिंब साठवण्यास मानवी बुद्धीचे चिमुकले विश्व असमर्थ असते', या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत असल्यास त्याचे स्पष्टीकरण करा.
उत्तर : या विराट निसर्गापुढे माणूस टिंबाएवढासुद्धा नाही.आपली सूर्यमालिका, तिच्याभोवती फिरणारे पहा सगळी अंतरे आपल्याला ठाऊक आहेत. आपल्या सूर्या पिकाचे दया पन्ना लाख पटींनी मोठ्या आकाराचे तारे आपल्या आकाशगंगेत आहेत. आपल्या आकाशगंगेत असे लहानमोठे अब्जावधी सारे आहेत आणि अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत. आपल्यापासून सर्वात जवळची आकाशगंगा आणि तिच्यातील सर्वात जवळचा तारा आपल्यापासून पाचशे कोटी प्रकाशवर्षे अंतरावर आहे. ही गोष्ट झाली सर्वात जवळच्या आकाशगंगेची. त्याहीपुढे अब्जावधी आकाशगंगा आहेत. किंबहुना किती आकाशगंगा त्यापुढे आहेत, हे सांगता येणे अशक्य आहे. कारण हे विश्व अमर्याद आहे. त्याला अंत नाही. म्हणून माणूस कधीही हे संपूर्ण विश्व ओलांडू शकणार नाही. संपूर्ण विश्व पाहिलेच नाही, तर त्याचे स्वरूप कळणार कसे? म्हणजे हे विश्व माणसाच्या आवाक्यात कदापिही येणार नाही. माणसाला माहीत झालेल्या विश्वाच्या पलीकडे अनंतापर्यंत हे विश्व पसरले आहे. माणूस स्वतः निसर्गापुढे क्षुद्र आहेच, पण त्याला ज्ञात झालेले विश्व सुद्धा या अनंत पसरलेल्या विश्वापुढे क्षुद्रच आहे. म्हणूनच निसर्गाचे प्रतिबिंब साठवण्यास माणसाच्या बुद्धी चिमुकले विश्व असमर्थ असते, हे मला मनोमन पटते.
(२) चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा. उत्तर : चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या, विविध रंगांच्या फुलांनी ड वरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंतऋतूच आहे. वसंत ऋतूची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये वसंत ऋतु ऐन भरात आला असता वसंत ऋतूचे उत्फुल्ल दर्शन चैत्रामध्ये घडते त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडणे टाकली हिरव्या-पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात, पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते, तसतशी ही गहिन्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत, असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ती पिंपळाची किंबहुना पिंपळपानांच्या सळसळीवरूनच 'झाडांच्या पानांची सळसळ' हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हदयंगम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषण चित्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील.
(३) चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून उत्तर : चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्य न्हाऊन निघते. अनेक रंगाचे विविध आकार फुलांच्या रूपांत डोळ्यांचे पारणे फेडतात.
सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो. या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यांत. पक्ष्यांची घरटीसुद्धा कशी, अनेक लोभस आकारांत निर्मिलेली. काही कबरी घरटी लक्ष वेधून काही लोंबत्या आकारांची, काही वाटोळ्या आकारांची, काही पसरट गोल, अशी विविध रूपांतील असतात. ही घरटी घरातील रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपी वाटते. राज्यनिर्मितीचे रहस्य शोधत बसण्यापेक्षा या चित्रलिपी चे वाचन करण्यातच लेखिकांचे मन रममाण होताना दिसते. आपण वाचन करताना विरामचिन्हांच्या जागी क्षणभर थबकतो. तसेच इथे प्रत्येक घरटे पाहताना विस्मयचकित होतो. निसर्गाचा चमत्कार पाहून अचंबित होतो. निसर्गाच्या इतक्या विलक्षण निर्मितीचे दर्शनघडल्यामुळे आपण आनंदाने मोहरून जातो. आपली नजर पुढे जातच नाही, मन तिथेच काही क्षण रेंगाळत राहते. लेखिकांना ही घरटी म्हणजे विरामचिन्हे वाटतात. चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते, ते जणू निसर्गाचे साहित्य होय. हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगाळतो. ही घरटी निसर्गाचे रहस्य कळण्याचा आनंद देतात. अशी ही घरटी आपल्याला गुंगवून ठेवतात. आपल्या मनाचा पूर्ण ताबा घेतात, म्हणून ती विरामचिन्हे ठरतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा