!!! मराठी !!!
विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासाला आपण मराठी व्याकरण व भाषाभ्यासातील समास हा भाग शिकत होतो.
आपल्याला यावर्षी समासातील...
१)अव्ययीभाव समास
२)विभक्ती तत्पुरुष समास
३)कर्मधारेय समास
४)द्विगू समास
अभ्यासायचा आहे...
१)अव्ययीभाव समास -
ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असून बहुधा ते उपसर्ग असते व जो सामासिक शब्द क्रियाविषेषण अव्ययाचे कार्य करतो,त्या समासाला अव्ययीभाव समासम्हणतात.
उदा.
१) दररोज
पहिले पद 'दर ' + दुसरे पद "रोज ' यात महत्त्वाचे पद 'दर '(पहिले पद) हे उपसर्ग आहे -> दररोज (क्रियाविषेषण अव्यय)
१)गैरहजर
पहिले पद 'गैर ' + दुसरे पद "हजर ' यात महत्त्वाचे पद 'गैर '(पहिले पद) हे उपसर्ग आहे -> गैरहजर (क्रियाविषेषण अव्यय)
!! आपल्याला परीक्षेत येणाय्रा प्रश्नाचे स्वरुप !!!
१) दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह करुन प्रकार सांगा :
उदा.
सामासिक शब्द विग्रह प्रकार
दररोज प्रत्येक दिवशी अव्ययीभाव
आजन्म जन्मापासून अव्ययीभाव
बिनचूक चुकीशिवाय अव्ययीभाव
यथाक्रम क्रमाप्रमाणे अव्ययीभाव
बेपर्वा पर्वा न करता अव्ययीभाव
दारोदार प्रत्येक दारात अव्ययीभाव
२)पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
उदा.
सामासिक शब्द विग्रह
आमरण मरणापर्यंत
हरघडी प्रत्येक घडीला (क्षणाला)
३)पुढील विग्रहांवरुन सामासिक शब्द ओळखा :
उदा.
प्रत्येक गावी --------------
भान न बाळगता ---------------
४)पुढील तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्द विग्रह प्रकार
यथानेम ----------- ------------
------------- प्रत्येक महिन्याला ------------
याच प्रमाणे सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा, विग्रहावरुन सामासिक शब्द लिहा, सामासिक शब्दांवरुन समास ओळखा , सामासिक शब्दांचा विग्रह करा यासारखे प्रश्न येऊ शकतात.....
!!! गृहपाठ !!!
अव्ययीभाव समासाचे पन्नास सामासिक शब्द शोधून त्याचा विग्रह करुन समासाचे प्रकार लिहा..
अनु.क्र. सामासिक शब्द विग्रह प्रकार
१)
२)
या प्रमाणे .......
!!! मराठी !!!
- व्याकरण व भाषाभ्यास -
विद्यार्थी मित्रांनौ मागच्या तासाला आपण मराठी व्याकरण व भाषाभ्यासातील अव्ययीभाव समास हा भाग शिकलो.
आता पुढील समास शिकूयात....
२) विभक्ती तत्पुरुष समास
हा समास समजून घेण्यापूर्वी तो, ज्या तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे तो समजून घेऊयात..
!! तत्पुरुष समास !!
ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते , त्या समासाला तत्पुरुष समासम्हणतात.
उदा.
१) तोंडपाठ
पहिले पद ' तोंड '' + दुसरे पद "पाठ ' यात महत्त्वाचे पद 'पाठ '(दुसरे पद)
२)क्रीडांगण
पहिले पद 'क्रीडा ' + दुसरे पद "अंगण ' यात महत्त्वाचे पद 'अंगण '(दुसरे पद)
!! विभक्ती तत्पुरुष समास !!
- ज्या तत्पुरुष समासामधील सामासिक शब्दातील विभक्ती प्रत्यय लोपपावलेले (गाळलेले) असतात , व विग्रह करतांना तो घालावा ( वापरावा ) लागतो त्या तत्पुरुष समासाला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात .
( यात विग्रह करतांना ज्या विभक्तीचे प्रत्यय घालावे लागते त्या विभक्तीचे नाव त्या समासाला द्यावे. )
!! आपल्याला परीक्षेत येणाय्रा प्रश्नाचे स्वरुप !!!
१) दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह करुन प्रकार सांगा :
उदा.
सामासिक शब्द विग्रह प्रकार
तोंडपाठ तोंडाने पाठ तृतीया वि.तत्पुरुष
क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण चतुर्थी वि.तत्पुरुष
भयमुक्त भयापासून मुक्त पंचमी वि.तत्पुरुष
दीनानाथृ दिनांचा नाथ षष्टी वि.तत्पुरुष
घरकाम घरातील काम सप्तमी वि.तत्पुरुष
२)पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
उदा.
सामासिक शब्द विग्रह
मतिमंद मतीने मंदतृतीया
देवघर देवासाठी घर
३)पुढील विग्रहांवरुन सामासिक शब्द ओळखा :
उदा.
बंधमुक्त --------------
कार्यक्रम ---------------
४)पुढील तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्द विग्रह प्रकार
वनमाला ----------- ------------
------------- गुनाने हीध ------------
याचप्रमाणे सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा, विग्रहावरुन सामासिक शब्द लिहा, सामासिक शब्दांवरुन समास ओळखा , सामासिक शब्दांचा विग्रह करा यासारखे प्रश्न येऊ शकतात....
!!! गृहपाठ !!!
विभक्ती तत्पुरुष समासाचे पन्नास सामासिक शब्द शोधून त्याचा विग्रह करुन समासाचे प्रकार लिहा..
अनु.क्र. सामासिक शब्द विग्रह प्रकार
१)
२)
या प्रमाणे .......
३)कर्मधारय समास
• कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच उपप्रकार आहे.
- ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते , त्यास कर्मधारय समास म्हणतात .
उदा.
१) नीलकमल
पहिले पद 'नील ' + दुसरे पद "कमळ ' यात नील हे विशेषण व , कमल हे नाम आहे.
२)मातृभूमी
पहिले पद 'मातृ ' + दुसरे पद ' भूमी ' यात मातृ हे विशेषण व , भूमी हे नाम आहे.
!! आपल्याला परीक्षेत येणाय्रा प्रश्नाचे स्वरुप !!!
१) दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह करुन प्रकार सांगा :
उदा.
सामासिक शब्द विग्रह प्रकार
महाकाव्य महान असे काव्य कर्मधारय
अमृतवाणी अमृतासारखी वाणी कर्मधारय
२)पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
उदा.
सामासिक शब्द विग्रह
गुणिजन गुणी असे जन
तपोधन तप हेच धन
३)पुढील विग्रहांवरुन सामासिक शब्द ओळखा :
उदा
दु: (वाईट ) असा काळ --------------
बहु असे जन ---------------
४)पुढील तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्द विग्रह प्रकार
भूतकाळ ----------- ------------
------------- महान असा पंडित ------------
याचप्रमाणे सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा, विग्रहावरुन सामासिक शब्द लिहा, सामासिक शब्दांवरुन समास ओळखा , सामासिक शब्दांचा विग्रह करा यासारखे प्रश्न येऊ शकतात.....
!!! गृहपाठ !!!
कर्मधारय समासाचे पन्नास सामासिक शब्द शोधून त्याचा विग्रह करुन समासाचे प्रकार लिहा..
अनु.क्र. सामासिक शब्द विग्रह प्रकार
१)
२)
या प्रमाणे ....
!!! मराठी !!!
- व्याकरण व भाषाभ्यास -
विद्यार्थी मित्रांनौ मागच्या तासाला आपण मराठी व्याकरण व भाषाभ्यासातील अव्ययीभाव समास , विभक्ती तत्पुरुष व कर्मधारय समास शिकलो.
आता पुढील समास शिकूयात....
४) द्विगू समास
• हा समास तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे .
- ज्या तत्पुरुष समासामासातील पहिले पद संख्याविशेषण असून दुसरे पद नाम असते, त्या त्या तत्पुरुष समासाला द्विगू समास म्हणतात .
उदा.
१) त्रीकोण
पहिले पद ' त्रि '' (संख्याविशेषण ) + दुसरे पद "कोण ' ( नाम)
विग्रह - तीन कोनांचा समूह
२)नवरात्र
पहिले पद 'नऊ ' (संख्याविशेषण) + दुसरे पद " रात्र ' (नाम)
विग्रह - नऊ रात्रींचा समूह
!! आपल्याला परीक्षेत येणाय्रा प्रश्नाचे स्वरुप !!!
१) दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह करुन प्रकार सांगा :
उदा.
सामासिक शब्द विग्रह प्रकार
द्विदल दोन दलांचा समूह द्विगू समास
षडानन सहा आननांचा समूह द्विगू समास
२)पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
उदा.
सामासिक शब्द विग्रह
पंचमुखा पाच मुखांचा समूह
पंजाब पाच दुआबांचा समुह
३)पुढील विग्रहांवरुन सामासिक शब्द ओळखा :
उदा.
षटकोण --------------
सप्तर्षी ---------------
४)पुढील तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्द विग्रह प्रकार
नवसागर ----------- ------------
------------- दहा दिशांचा समूह ------------
याचप्रमाणे सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा, विग्रहावरुन सामासिक शब्द लिहा, सामासिक शब्दांवरुन समास ओळखा , सामासिक शब्दांचा विग्रह करा यासारखे प्रश्न येऊ शकतात....
!!! गृहपाठ !!!
द्विगू समासाचे पन्नास सामासिक शब्द शोधून त्याचा विग्रह करुन समासाचे प्रकार लिहा..
अनु.क्र. सामासिक शब्द विग्रह प्रकार
१)
२)
या प्रमाणे .......
५) द्वंद्व समास
- ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची असतात, त्याला द्वंद्व समास म्हणतात .
उदा.
१) आईवडील
पहिले पद 'आई ' + दुसरे पद "वडील '
यात दोन्ही पदे महत्त्वाची आहेत
२)भेदाभेद
पहिले पद 'भेद ' + दुसरे पद ' अभेद '
यात दोन्ही पदे महत्त्वाची आहेत.
• द्वंद्व समासातील सामासिक शब्दांवरुन विग्रहाच्या पद्धतीवरुन द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार पडतात.
१)इतरेतर द्वंद्व समास
- जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ' आणि, व 'या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात , तेंव्हा त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात .
उदा .
१) अजरामर अजर आणि अमर इतरेतर द्वंद्व समास
२)इंद्रादी इंद्र आणि इतर देव इतरेतर द्वंद्व समास
२) वैकल्पिक द्वंद्व समास
- जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करतांना ' किंवा ,अथवा , वा ' या उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात व दोन्ही पदे परस्परविरोधी असतात , तेव्हा त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात .
उदा .
१) सुखदु:ख सुख किंवा दु:ख वैकल्पिक द्वंद्व समास
२) भेदाभेद भेद अथवा अभेद वैकल्पिक द्वंद्व समास
३) समहार द्वंद्व समास
- जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांत इतर अनेक गोष्टींचा समावेश असतो व ज्यांचा विग्रह करतांना ' वगैरे , इतर , इत्यादी ' या शब्दांचा वापर होतो, तेंव्हा त्याला समहार द्वंद्व समास म्हणतात.
उदा.
१) गप्पागोष्टी गप्पा , गोष्टी वगैरे समहार द्वंद्व समास
३) गुरेवासरे गुरे, वासरे वगैरे समहार द्वंद्व समास
!! आपल्याला परीक्षेत येणाय्रा प्रश्नाचे स्वरुप !!!
१) दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह करुन प्रकार सांगा :
उदा.
सामासिक शब्द विग्रह प्रकार
ऊनपाऊस ऊन आणि पाऊस इतरेतर द्वंद्व
एकदोन एक किंवा दोन वैकल्पिक द्वंद्व
चूकभूल चूक भूल वगैरे समहार द्वंद्व
२)पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
उदा.
सामासिक शब्द विग्रह
नेआण ने आणि आण
मागेपुढे मागे किंवा पुढे
हालअपेष्टा हाल, अपेष्टा वगैरे
३)पुढील विग्रहांवरुन सामासिक शब्द ओळखा :
उदा
हाव, भाव वगैरे --------------
राव किंवा रंक ---------------
शर्ट आणि पॕन्ट ----------------
४)पुढील तक्ता पूर्ण करा :
सामासिक शब्द विग्रह प्रकार
चंद्रसूर्य ----------- ------------
------------- बरे किंवा वाईट ------------
हालचाल -------------- -------------
याचप्रमाणे सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा, विग्रहावरुन सामासिक शब्द लिहा, सामासिक शब्दांवरुन समास ओळखा , सामासिक शब्दांचा विग्रह करा यासारखे प्रश्न येऊ शकतात.....
!!! गृहपाठ !!!
द्वंद्व समासातील इतरेतर द्वंद्व , वैकल्पिक द्वंद्व , समहार द्वंद्व या तीनही समासाचे प्रत्येकी १५ सामासिक शब्द शोधून त्याचा विग्रह करुन समासाचे प्रकार लिहा..
अनु.क्र. सामासिक शब्द विग्रह प्रकार
१)
२)
या प्रमाणे .......
येथे आपला समास हा भाग संपतो...
पदन्यास या शब्दाचा विग्रह करून समास
उत्तर द्याहटवा