!! वाक्प्रचार !!
विद्यार्थी मित्रांनौ आज आपण व्याकरण व भाषाभ्यासातील वाक्प्रचार हा भाग पाहणार आहोत. हा भाग आपल्याला परीक्षेत २ गुणासाठी आहे.
• वाक्प्रचार म्हणजे काय ?
• भाषेमध्ये काही शब्द किंवा शब्दसमूह असे असतात की , त्यांचा नेहमीचा प्रचलित अर्थ न राहाता , त्यांना वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो, त्यांना वाक्प्रचार म्हणतात .
उदाहरणार्थ
१) पाण्यात पहाणे -
प्रचलित अर्थ - शापाण्यात डोकावून पाहणे.
वेगळा अर्थ - द्वेष करणे
२) कान पिळणे -
प्रचलित अर्थ - ' कान ' हा अवयव पिळणे
वेगळा अर्थ - शिक्षा करणे, अद्दल घडवणे.
!! आपल्याला माहीत असणे गरजेचे असे. !!
• वाक्प्रचाराचा अर्थ सांगून त्याचा ( वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करावा , त्याच्या अर्थाचा नाही. ) वाक्यात उपयोग करणे.
• काही वाक्प्रचार , त्याचे अर्थ व वाक्यात उपयोग अभ्यासा :
१) आकाश ठेंगणे वाटणे - खूप आनंद होणे .
स्काँलरशिप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्यामुळे समिर ला आकाश ठेंगणे वाटले.
२)उमेदीने जगणे - जिद्दीने जगणे.
ऐन गरिबीतही रामू उमेदीने जगला.
( आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधारे यादी वाढवा. )
• आपल्याला परीक्षेत येणाय्रा प्रश्नाचे स्वरूप :
१) पुढील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा :
वाक्प्रचार उत्तरे अर्थ
(१) खांद्याला खांदा लावणे - ......... (अ) निरुपयोगी असणे.
(२) कंठस्नान घालणे - .......... (आ)खूप कष्ट उपसणे.
(३) माश्या मारणे - .......... (इ) सहकार्य करणे.
(४) खस्ता खाणे - .......... (ई) ठार मारणे.
२) वाक्प्रचार - वाक्प्रचारांचे योग्य अर्थ शोधून लिहा :
(१) शिरोधार्य मानणे -
(अ) डोक्यावर घेणे (आ) महत्त्व देणे (इ) डोके खाजवणे
(२) पारख करणे -
(अ) तपासणी करणे (आ) परीक्षण करणे (इ)निरीक्षण करणे
३) पुढील तक्ता पूर्ण करा :
वाक्प्रचार अर्थ
चाहूल लागणे ------------------------
------------------------ लक्षपूर्वक ऐकणे
आगीत उडी घेणे ------------------------
------------------------ खूप राग येणे
• अशाप्रकारे - पुढील अर्थासाठी योग्य वाक्प्रचार निवडा, योग्य अर्थ निवडा, बरोबर जोडी निवडा ( वाक्प्रचार व अर्थाची) , पुढील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून लिहा, दिलेल्या वाक्यात कंसातील वाक्प्रचारांचा वापर करुन वाक्येपुन्हा लिहा, असे प्रश्न परिक्षेत येऊ शकतात...
• आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ वाचून , त्यातील वाक्प्रचार शोधा व त्यांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. ( एकूण पन्नास वाक्प्रचार )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा