Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

मराठी व्याकरण- 9वी,10 वी- अलंकार

 !!  मराठी !!




व्याकरण व भाषाभ्यास


विद्यार्थी मित्रांनौ आज आपण व्याकरण व भाषाभ्यासातील आपल्याला यावर्षी आपल्याला अभ्यासासाठी दिलेल्या अलंकाकारांचा अभ्यास करुयात....


!!! अलंकार  !!!


• अलंकार म्हणजे दागिने किंवा आभूषणे होत.


• आपली भाषा अधिक सुंदर ,अधिक आकर्षक व परिणामकारक होण्यासाठी लेखक व कवी भाषेला (शब्द व अर्थांच्या ) अलंकारांनी सजवतात . 


•  भाषेचे अलंकार  : ज्या ज्या गुणांमुळे भाषेला शोभा येते , त्या गुणधर्माना भाषेचे अलंकार असे म्हणतात .


> कवितेमध्ये कधी कधी शब्दांच्या नादमधुर रचनेमुळे सौंदर्य निर्माण होते , त्यास शब्दचमत्कृती म्हणतात; ( शब्दांलकार ) तर कधी कधी शब्दांतील वेगवेगळ्या अर्थामुळे सौंदर्य निर्माण होते, त्यास अर्थचमत्कृती  म्हणतात .( अर्थालंकार ) 

म्हणून भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत.


१) शब्दांलकार             २) अर्थालंकार 

यावर्षी आपल्याला पुढील अर्थालंकार  शिकायचे आहे : 


१) रुपक अलंकार          २) व्यतिरेक अलंकार 

३) दृष्टांन्त अलंकार         ४) चेतनगुणोक्ती अलंकार 


!! लक्षात ठेवा !!


• अलंकारामध्ये दोन वस्तूंमधील साम्य किंवा  भेद दाखवलेला असतो.

• ज्या वस्तूचे वर्णन केलेले असते , त्याला उपमेय म्हणतात .

• ज्याची उपमा दिली जाते , त्याला उपमान म्हणतात .

उदा .

१) आईसारखे दैवत साय्रा जगतावर नाही.

वरील उदाहरणात  उपमेय   ->  आई

                          उपमान  ->  देव


पुढचा भाग उद्याच्या तासाला शिकूयात....!!  मराठी !!


व्याकरण व भाषाभ्यास


विद्यार्थी मित्रांनौ आज आपण व्याकरण व भाषाभ्यासातील आपल्याला यावर्षी अभ्यासासाठी दिलेल्या 

१) रुपक अलंकार            २) व्यतीरेक अलंकार  

शिकूयात....


१) रुपक अलंकार 

लक्षणे : जेंव्हा उपमेय व उपमान एकरुप आहेत , ती भिन्न नाहीत ,असे वर्णन येते ,तेथे रुपक अलंकार होतो.

उदा .

१) शाळा म्हणजे दुसरी माताच आहे !


स्पष्टीकरण : वरील वाक्यात शाळा या  उपमेयात व माता या उपमानात भेद नाही.ते एकरुप आहेत. असे दर्शविले आहे ,म्हणून येथे रुपक अलंकार आहे.


• रुपक अलंकाराची वैशिष्ट्ये 

१) उपमेय हेच उपमान होय.

२) उपमेय व उपमान यात एकरुपता .

३) या अलंकारात ' म्हणजे , केवळ , प्रत्यक्ष , साक्षात ,मूर्तिमंत ' यासारखी साधर्म्यवाचक शब्दांचा वापर केला जातो.


२) व्यतिरेक अलंकार 

लक्षणे : जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन येते , तेंव्हा व्यतिरेक अलंकार होतो.

उदा .

१) सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन.


स्पष्टीकरण : वरील चरणात सांज (सायंकाळचा सोनेरी प्रकाश ) हे उपमेय , सोने ह्या उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे, असे वर्णन आले आहे ,म्हणून येथे व्यतिरेक अलंकार होतो..


• व्यतिरेक अलंकाराची वैशिष्ट्ये 

१) उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ 

२)उपमान उपमेयापुढे फिके.


- गृहपाठ -

वरील दोन्ही अलंकारांचे प्रत्येकी पाच उदाहरण शोधून आपल्या वहीत लिहून काढा...


पुढील भाग पुढच्या तासिकेला पाहू....

मराठी !!


व्याकरण व भाषाभ्यास


विद्यार्थी मित्रांनौ आज आपण व्याकरण व भाषाभ्यासातील आपल्याला यावर्षी अभ्यासासाठी दिलेल्या 

३) दृष्टान्त अलंकार       ४) चेतनगुणोक्ती अलंकार  

बघूयात...


३) दृष्टान्त अलंकार 

लक्षणे : एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी जेव्हा त्याच अर्थाचे समर्पक उदाहरण ( दाखला ) दिले जाते , तेव्हा दृष्टान्त अलंकार होतो.

उदा.

१) हरिणीचे पाडस | व्याघ्रे धरियेले |

    मजलागी जाहले | तैसे देवा |

               - संत कान्होपात्रा


• स्पष्टीकरण : या चरणात देवाच्या दर्शनावाचून मनाची अवस्था व्याकुळ झाली आहे . हे पटवून देण्यासाठी हरणाच्या पाडसाचे उदाहरण दिले आहे. वाघाने जर हरणाचे पाडस तोंडी धरले तर त्या पाडसाची जशी विकल अवस्था होते, तशी हे देवा तुझ्यावाचून माझी व्याकूळ अवस्था झाली आहे असे संत कान्होपात्रा म्हणतात .


• दृष्टान्त अलंकाराची वैशिष्ट्ये 

१) तत्त्व समजावून घेणे.

२) समजावताना समर्पक उदाहरण देणे.


४) चेतनगुणोक्ती अलंकार 

लक्षणे  : जेंव्हा निर्जीव  ( अचेतन ) वस्तू ह्या सजिवाप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे वर्णन केले जाते, तेव्हा चेतनगुणोक्ती अलंकार होतो.

उदा .

१) कुटुंबवत्सल इथे फणस हा |

    कटिखांद्यावर घेऊनि बाळे  ||


स्पष्टीकरण : वरील उदाहरणात फणसाच्या झाडाला कुटुंबवत्सल किंवा आई म्हटले आहे. लेकरांना कमरेवर व खांद्यावर घेऊन माता जशी लाड करते तसा फणस आहे, अशी कल्पना केली आहे.म्हणजेच फणसाच्या झाडावर मानवी भावनांचे आरोपण केले आहे.


• चेतनगुणोक्ती अलंकाराची वैशिष्ट्ये 

१) निर्जीव वस्तूंना सजीवत्व बहाल करणे.

२) निर्जीव वस्तूंवर मानवी भावनांचे आरोपण करणे.


 • गृहपाठ

वरील दोन्ही अलंकारांची प्रत्येकी पाच उदाहरणे शोधून आपल्या वहीत लिहून काढा....


पुढचा भाग पुढच्या तासिकेला....

मराठी !!


व्याकरण व भाषाभ्यास  मराठी !!


व्याकरण व भाषाभ्यास


विद्यार्थी मित्रांनौ आज आपण व्याकरण व भाषाभ्यासातील आपल्याला यावर्षी अभ्यासासाठी दिलेल्या 


१) रूपक अलंकार          २) व्यतिरेक अलंकार 

३) दृष्टान्त अलंकार    ४) चेतनगुणोक्ती अलंकार 


या अलंकारावर परिक्षेत येणाय्रा प्रश्नाचे स्वरूप समजून घेऊयात...


१) पुढील वैशिष्ट्यांवरून अलंकार ओळखा व उदाहरण द्या :


• उपमेय व उपमानया दोघात भेद नाही.

• उपमेय हे उपमानच आहे.


१) अलंकाराचे नाव --> ..........................

२) अलंकाराचे उदाहरण --->......................


२) पुढील उदाहरण वाचून कृती सोडवा :


झाड वसतं ध्यानस्थ साधूसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत.


प्रस्तुत ओळीतील 

१) अचेन गोष्ट -- -----------------------------------------

२) दोन मानवी कृती --  १) ----------- २) -------------

३) ( | ) अलंकाराचे नाव ---> -------------------------

     ( || ) अलंकाराचे उदाहरण  ---> -----------------


३) पुढीला उदाहरण वाचून वक्ता पूर्ण करा :


देवाहुन महान आहे माझी आई


उपमेय ----> ------------- उपमान ----> ------------

अलंकार ---> -------------

अलंकाराचे वैशिष्टय ---> -------------------


४) पुढील ओळी वाचून तक्ता भरा :


    (१) ' ऊठ पुरुषोत्तमा | वाट पाही रमा |

          दावि मुखचंद्रमा | सकळिकांसी ||'

    उपमेय             उपमान           अलंकार 

    ----------           ----------          -----------


५) पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा व उदाहरण द्या :


उपमेय  ------>   उपमानापेक्षा ------->  श्रेष्ठ 


अलंकाराचे नाव :   -------------------

उदाहरण  :  ----------------------------


( टीप : वरिल प्रश्नानांमध्ये बॉक्स काढावेत  )


1 टिप्पणी: