विद्यार्थी मित्रांनो
आजपासून आपण मराठी विषयाचे व्याकरण व भाषाआभ्यास हा भाग सुरू करत आहोत. सर्व विद्यार्थांनी दिलेला अभ्यास पूर्ण करुन, त्याची नोंद आपल्या गृहपाठाच्या वहीत करावयाची आहे...
!! मराठी व्याकरण !!
!! समास !!
* समास *
- एकपेक्षा अधिक शब्दांचा संक्षेप करुन जो नवीन जोडशब्द तयार होतो , त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात .
यात
- काही जागी शब्द गाळला जातो.
उदा.भाऊ आणि बहीण = भाऊबहीण
- काही जागी दोन्ही शब्दांचा संक्षेप केला जातो.
उदा. प्रत्येक दिवसी = दररोज
- काही जागी प्रत्यय गाळला जातो
उदा.विद्येच्या आलयात = विद्यालयात (च्या )
- काही जागी माहीती गाळली जाते.
उदा.निळा आहे कंठ असा जो तो = नीळकंठ
अशा प्रकारे
---------------
१)समास - शब्दांचा संक्षेप करुन जो नवीन जोडशब्द तयार होतो,त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात .
२)नवीन जोडशब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात
३)या सामासिक शब्दाची फोड करुन दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात .
!! समासाचे प्रक्रार !!
- समासात कमीत कमी दोन शब्द असतात.
- समासातील शब्दांना ' पद ' असे म्हणतात .
पहिला शब्द - > पहिले पद
दुसरा शब्द -> दुसरे पद
* समासातील कोणते पद महत्त्वाचे म्हणजेच प्रधान आहे,यावरुन समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.
महत्त्वाचे पद म्हणजे = प्रधान पद
कमी महत्त्वाचे पद म्हणजे =गौण पद
!! समासांचे मुख्य चार प्रकार !!
१)पहिले पद प्रधान व दुसरे पद गौण असेल तर - अव्ययीभाव समास
२)पहिले पद गौण व दुसरे प्रधान असेल तर - तत्पुरुष समास
३)दोन्ही पदे प्रधान असेल तर - द्वंद्व समास
४)दोन्ही पदे गौण असेल तर - बहुव्रीही समास ( येथे दोन्ही पदे महत्त्वाचे नसुन तिसराच बोध होतो.)
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा