महर्षी धोंडो केशव कर्वे :
हे 'अण्णासाहेब कर्वे' म्हणून ओळखले जात. समाजसुधारणेच्या कामात ते हिरिरीने भाग घेत. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था, एस. एन.डी. टी. महिला विद्यापीठ या संस्था त्यांच्या प्रयत्नांनी नावारूपाला आल्या. त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या गौरवार्थ आपल्या भारत सरकारने त्यांना भारतरत्न' हा किताब दिला.
त्यांचे विचार- 'विद्यार्थी व विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगाव्यात.
(१) गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावे, मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे, की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच तो इतरांनाही आहे. केव्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये. हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आहे. हा तोल सांभाळला
(२) मनाचा समतोलपणा राखावा. नाही, म्हणूनच जगात मोठमोठे अनर्थ घडून आलेले आहेत. मनाचा समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी न जाता, आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच आपले हे स्वराज्य टिकव शकतील.
समतेचे तत्त्व आचरणात आणणारी व भेदाभेद न मानणारी माणसे मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही, अशी माझी ठाम खात्री आहे.'
नामदार गोपाळ कृष्ण गोखले :
हे लोकमान्य टिळकांचे समकालीन उदारमतवादी म्हणून ते प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. त्यांनी 'सर्व्हट्स ऑफ इंडिया सोसायटी' नावाची संस्था स्थापन केली, 'भारत सेवक समाज' या नावाने आता ती परिचित आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी मानत.
त्यांचे विचार-'आज सर्वांत अधिक गरज असेल, तर ती देशाच्या चारी कोपन्यांत ऐक्याची नि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. देशप्रेम इतके पराकोटीला पोहोचायला हवे, की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. आज त्यागाची अधिक जरूर आहे. बोलणे नको, काम हवे! आपण सारे भाऊ भाऊ आहोत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यांत गुरफटून जाऊ नका. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडवू तर भाग्योदय कसा होणार? आपल्या सर्व कामांत शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत.
राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही. त्यासाठी सबंध आयुष्य द्यावे लागते. आपण खत होऊया, भावी पिढी पीक घेईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा