Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, २४ मार्च, २०२१

वर्णनात्मक नोंदी, इयत्ता-तिसरी, विषय-गणित

 विषय - गणित 



१.विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो. 

२.विविध प्रकारच्या संख्या लिहितो.

 ३.गणिती स्वाध्याय सोडवतो,

 ४. भौमितिक आकृत्या व नावे अचूक सांगतो,

 ५,परिसरातील भौमितिक आकार सांगतो. 

६.मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो. 

७. संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो. ८.संख्यांची अगदी योग्य तुलना करतो. ९.दैनदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून विचार करतो. १०.संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात. 

११.गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग सांगतो. 

१२.गणिताचे व्यवहारिक जीवनातील महत्व जाणतो. 

१३.प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे है समजून सांगतो.

 १४.दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचूक सोडवतो. 

१५.संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो. 

१६.हिशोब ठेवण्यात सर्वाना मदत करतो. 

१७.संख्यातील प्रत्येक स्थान व किंमत सांगतो.

 १८.विविध आकृत्या जलद गतीने काढतो. 

१९.आकृत्यांची नावे व ओळख आहे. २०.संख्या कशा तयार होतात स्पष्ट करतो. 

२१.सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो. 

२२.सुचविलेले पाढे अचूक व स्पष्टोच्चारात पाढे म्हणतो. २३.सुचविलेल्या उदाहरणाची रीत व क्रम सांगतो, 

२४,पाठ्यांशातील विचारलेले सुत्रे जलद व अचूक सांगतो.

२५.आलेख/चित्र पाहन त्यावर आधारित माहिती सांगतो. 

२६. आलेख/चित्र पाहून अचूक व योग्य माहिती देतो. 

२७.विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडतो. 

२८.विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो व मांडतो. 

२९.दिलेली लोंडी उदाहरणे अतिशय जलद व अचूकपणे 

३०.दिलेली लोंडी उदाहरणे गणन करुन सफाईने व अचूक सोडवतो. सोडवितो. 

३१.उदा. वाचतो व उदाहरणातून कोणते उच्चार काढायचे अचूक सांगतो. 

३२.उदा. पाहतो व त्याच्या प्रत्येक पायन्या योग्य रीतीने स्पष्ट करतो. 

३३.उदा. पाहतो व त्याच्या अचूक जलद गतीने पायर्या सांगतो. 

३४.दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया जलद व अचूक करून उदाहरण सोडवितो, 

३५, दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो. 

३६.सूचना लक्षपुर्वक ऐकून त्या प्रमाणे उदा.अचूक सोडवितो. 

३७. सूचना लक्षपुर्वक ऐकून योग्य व अचूक क्रियीने उदा. सोडवितो.

 ३८.सुचविलेले आलेख/आकृती प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.

 ३९. सुचविलेले आलेख/आकृती प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने काढतो. 

४०.सुचविलेल्या संख्यांचे वाचन लेखन योग्य व स्पष्ट उच्चार करतो. 

४१.सुचविलेल्या संख्यांचे वाचनालेखन स्पष्ट व अचूक आणि जलद करतो

४२,दिलेल्या माहितीच्या आधारे स्वतः योग्य व अचूक उदाहरण तयार करतो. 

४३. दिलेल्या माहितीच्या आधारे समर्पक व सुंदर शब्दात उदाहरण तयार करतो.

 ४४.स्वाध्याय उदाहरणे स्वतःच्या विशिष्ठ शैलीने सोडवितो. 

४५.स्वाध्याय उदाहरणे इतरांच्या मदतीशिवाय परंतु जलद सोडवितो.

४६,संख्यांचे वाचन करता येत नाही. व स्वतःचे उत्तर तपासतो. 

४७. सोडविलेल्या उदाहरणांचा ताळा पड़ताळणी करुन स्वतःच स्वतःचे उत्तरे तपासतो. 

४८.स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा. तयार करतो व सोडवितो.

४९. .स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदाहरणे तयार करतो. 

५०.शाब्दिक उदाहरणे सोडविताना क्रिया समजून घेऊन अचूक व जलद गतीने उदाहरण सोडवितो. 

५१, शाब्दिक उदाहरणे सोडविताना क्रिया समजून घेऊन योग्यरीतीने उदा. सोडवितो.

५२.वस्तू हाताळतात  चित्र पाहतात आकृती रूपातील नाव सांगतात, 

५३. वस्तू हाताळतात / चित्र पाहतात व योग्य व अचूक भौमितिक आकृतीचे नाव सांगतो. 

५४.पाठ्याशातील विचारलेले सुत्रे जलद व अचूक सांगतो. 

५५.सूचविलेल्या उदाहरणाची रीत व कसे सोडविले ते अचूक सांगतो.


अडथळ्याच्या नोंदी - 

१.दैनंदिन व्यवहारात गणन क्रिया चुकवितो. 

२.रुपये पैशाचे साधे व्यवहार करता येत नाहीत.

 ३.संख्या लेखन करता येत नाही. ४.स्वाधय नेहमीच चुकीच्या पद्धतीने सोडवितो

५ गणिती चीन्हाबाबत चुकीची प्रतिकिया देतो.  

६.संख्यांचे वाचन करता येत नाही. व स्वतःचे उत्तर तपासतो.

 ७.गणितीय दृष्टीकोनातून विचार करत नाही.

 ८.गणिताचे महत्व व उपयोग समजत नाही. 

९.साधी सोपी संख्यावरील क्रिया चुकीच्या करतो. 

१०.भौमितिक आकारांची माहिती नाही. 

११.मापनाची परिमाणे व उपयोग समजत नाही. तयार करून सोडवितो व पडताळा घेतो.  

१२.संख्या उलट सुलट क्रमाने सांगतो. 

१३.आकृत्या काढताना खूपच गोंधळतो. 

१४.सूचनेप्रमाणे परंतु चुकीच्या कृती करतो. 

१५,साधै सोपे हिशोब करता येत नाही. 

१६,सुचविलेले पाढे म्हणता येत नाही. 

१७.सुचविलेले पाढे म्हणताना चुकवितो. 

१८.सुचविलेल्या उदाहरणांची रीत सांगता येत नाही. 

१९. सुचविलेल्या उदाहरणांची रीत व क्रम चुकीचा सांगतो. 

२०.पाठ्यांशातील विचारलेले सूत्र व क्रम सांगता येत नाही. 

२१. पाठ्यांशातील विचारलेले सुत्रै सांगताना खूपच गोंधळतो. 

२२.आलेख । चित्रे पाहून माहिती सांगता येत नाही.

 २३. आलेख / चित्रे पाहून निरिक्षन करतो पण माहिती चुकीची सांगतो. 

२४.विविध गणितीय संकल्पना सांगता येत नाही.

२५.विविध गणितीय संकल्पनाचा पूर्णपणे अर्थबोध होत नाही. 

२६,दिलेली तांड़ी उदाहरणे सोडविताना खपच गोंधळतो. 

२७.दिलेली तोंडी उदाहरणे सोडविता येत नाही. 

२८.उदा. वाचतो पण उदाहरणाचा अर्थ सांगता येत नाही. 

२९.उदा. वाचतो पण त्यातून चुकीचा अर्थबोध करुन घेतो

3०.उदा. पाहतो व त्याच्या पायऱ्या सांगत नाही. 

३१. उदा. पाहतो व त्याच्या पायन्या मागे पुढे सांगतो, 

३२.दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया करता येत नाही.

३३. दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया संपूर्णतः चुकीच्या करतो.

3४.सूचना लक्षपुर्वक ऐकत नाही व उत्तर सुचवितो. 

३५.सूचना लक्षपुर्वक ऐकून हि योग्य क्रिया करता येत नाही.

 ३६.सुचविलेले आलेख । आकृती काढता येत नाही. 

३७. सुचविलेले आलेख / आकृती काढतो पण प्रमाणबद्धता जराही ठेवत नाही.

३८.सुचविलेल्या संख्यांचे वाचन / लेखन करता येत नाही. 

३९. सूचविलेल्या संख्यांचे वाचन / लेखन करताना गोन्धुलून जातो.

 ४०.दिलेल्या माहितीच्या चुकीचे उत्तर तयार करतो.

 ४१.दिलेल्या माहितीच्या आधारे उदाहरण तयार करता येत नाही. 

४२.स्वाध्याय उदाहरणे सोडविताना इतरांची उदा. बघण्याचा प्रयत्न करतो.

४३.स्वाध्याय उदाहरणे चुकीची सोडवितो. 

४४.सोइविलेल्या उदाहरणाचा ताळा पड़ताळणी कशासाठी हेच कळत नाही.

४५. सोडविलेल्या उदाहरणाचा ताळा पडताळणी करता येत नाही. 

४६.स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा. तयार करू शकत नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा