Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

वर्णनात्मक नोंदी- इयत्ता चौथी मराठी

                       विषय मराठी

*


१. स्वतःच्या भावना योग्य हावभावासह प्रकट करते. 

२. शब्द व वाक्य अगदी स्पष्ट आवाजात म्हणते. 

३. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो. 

४. बोलीभाषेत प्रमाण भाषेचा वापर करते.

 ५. भाषण करतांना अगदी सहजपणे बोलतो .

६. स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगते.

 ७. बोलण्याची भाषा,लाघवी सुंदर आहे 

८. प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देते. 

९. उदाहरणे पटवून देतांना म्हणीचा वापर करतो. 

१०. मोठांशी बोलतांना फार नमतेने बोलतो.

 ११. स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगते.

१२. संवाद लक्षपूर्वक ऐकतो. 

१३. कथा लक्षपूर्वक ऐकतो. 

१४. परिचित व्यक्तींशी उत्तम संवाद साधतो. 

१५. इतरांचे न पटलेले मत,सौम्य भाषेत सांगतो. 

१६. सुचविलेले गीत अनादी तालासुरात म्हणतो. 

१७. सुचविलेली कथा योग्य व सुंदर भाषेत सांगतो.

१८. टिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.

१९.चित्र पाहून प्रश्न तयार करतो व लिहितो.

 २०, चित्र पाहून अनुरूप प्रश्न तयार करतो.

२१. सुचविलेल्या शब्दांसाठी योग्य नवीन शब्द सांगतो. 

२२. दिलेले चित्र पाहन त्यावरुन चित्राचे अचूक वर्णन लिहितो. 

२३. दिलेल्या सूचना एकूण सूचनेप्रमाणे कृती करतो. 

२४. स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करते. 

२५.स्वतःच्या कथा सुंदर रीतीने सांगते. 

२६. संवाद साधण्याधे कौशल्य उत्तम आहे.

 २७. बोलताना शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो. 

२८. इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करते.

 २९. अपरिधित व्यक्तीशी उत्तम संवाद साधतो. 

३०. कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो. 

३१. सूचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो. 

३२. मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो. 

३३. सूचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरात लिहितो 

३४. शब्द वाक्य अगदी जसेच्या तसेच म्हणतो.

३५, गाणे लक्षपूर्वक ऐकतो.

३६, मजकूर लक्षपूर्वक ऐकतो. 

३७.कवितेचे कडवे ऐकतो व संपूर्ण कविता म्हणतो. 

३८. सुचविलेला प्रसंग अतिशय सुंदर रीतीने सांगतो. 

३९.सुचविलेला भाग अतिशय सुंदर रीतीने सांगतो.

४०. सुचविलेल्या गीताचे साभिनय कृतीसह सादरीकरण करतो. 

४१. सुचविलेल्या विषय अनुषंगाने प्रश्न तयार करतो. 

४२. सुचविलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगतो.

 ४३. सुचविलेल्या शब्दांसाठी विरुद्धार्थी शब्द सांगतो. 

४४. सुचविलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो,

 ४५. भाषा वापरताना व्याकरणीय नियम सहजपणे पाळतो. 

४६, प्रश्नाची अचूक उत्तरे देतो. 

४७. संवाद लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून उत्तरे देतो .

४८. संवादाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो.

 ४९. संवादाचे योग्य कृती व हावभाव युक्त सादरीकरण करतो.

 ५०, सुचविलेल्या मुद्दयांच्या आधारे कथा तयार करून सांगतो. 

५१, दिलेल्या घटनांचे योग्य क्रमवार लावून दाखवतो.

 ५२. प्रसंगाचे योग्य अभिनयासह सादरीकरण करतो. 

५३. कवितेचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो. 

५४. सुचविलेल्या कडव्याचे अर्थ सांगतो. 

५५. कथा अतिशय सुंदर रीतीने सांगतो.


अडथळ्याच्या नोंदी

 १. इतरांचे बोलणे एकूण घेत नाही.

 २. स्वतः खूपच अशुद्ध भाषा बोलतो. 

३. सहजपणे भाषण करता येत नाही. 

४. शब्द व वाक्य चुकीचे म्हणतो. 

५. बौलण्याची भाषा राकट आहे.

 ६, बोलीभाषेत प्रमाण भाषा तापरीत नाही. 

७. प्रश्न तयार करता येत नाही.

 ८. प्रश्न कसे तयार करावे समाजत नाही.

 ९. कविता पाठाप्रमाणे रटाळवाणे म्हणतो.

१० सुचविलेला भाग वाचन करतांना अडखळतो. 

 ११. प्रश्नांची चुकीच्या पद्धतीने उत्तरे देतो. 

१२. बोलताना उगाचच अंगविक्षेप करतो. 

१३. इतरांशी संवाद साधू शकत नाही. 

१४. वर्णन सांगता येते पण लिहिता येत नाही.

 १५. स्वतःच्या भावना व्यक्त करता येत नाही. 

१६. भाषेच्या वापरत व्याकरणिक खूप चुका करतो. 

१७. सुचविलेले प्रसंग चुकीच्या पद्धतीने सांगतो. 

१८. इतरांशी बौलतांना चुकीचे संबोधन वापरतो. 

१९. योग्य भाषेत कारणे सांगता येत नाही. 

२०.कवितेचे कडवे ऐकतो परंतु पूर्ण करत येत नाही.

२१, दिलेल्या सूचनांचा अर्थ समजून घेता येत नाही. 

२२. दिलेल्या सूचना ऐकतो पण पालन करीत नाही. 

२३. सुचविलेली कथा ऐकतो परंतु पूर्ण करता येत नाही. 

२४. शब्द व वाक्य यांचा उच्चार चुकीचा करतो.

२५. सर्व शब्द लक्षपूर्वक चुकीचे लिहितो.

 २६, सूचविलेल्या कवितेचे कृती करतांना लाजतो. 

२७. सुचविलेल्या गीताचे कृती करलांना लाजतो.

 २८. दिलेले चित्र पाहन वर्णन लेखन करता येत नाही. 

२९. दिलेले चित्र पाहून फक्त एक दोन शब्दच लिहितो. 

३०. सूचविलेल्या कडव्याचे अर्थ माहित असून सांगता येत नाही. 

३१. सुचविलेला कथा स्वतःच्या शब्दात सांगता येत नाही .

३२. कुठे,केव्हा कोणाला काय बोलाव हे कळत नाही. 

३३. कथा ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देता येत नाही. 

३४. गाणे ऐकतो पण प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा