‘संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र'
मोती हा धनाजी शेतकऱ्याचा पाळीव कुत्रा. पण धनाजीच्या दृष्टीने तो कुत्रा नव्हताच. तर तो त्याच्या प्राणाचा तुकडा होता. धनाजीचे त्याच्यावर विलक्षण प्रेम होते आणि मोतीचेही धनाजीवर तसेच निस्सिम प्रेम होते. जेथे धनाजी तेथे मोती. मालकाची जणू तो सावली झाला होता. एवढेच नाही तर आपल्या धन्याची धनदौलत सांभाळण्यासही तो चांगली मदत करी. धनार्जीच्या मेंढ्या चरावयास गेल्या की मोती पुढे असे. मेंढ्या दाट जंगलांत शिरल्या की मोतीही त्यांच्या मागे शिरे. अशा वेळी धनाजी मोतीच्या जिवावर आपल्या शेतात काम करत असे. मोतीला तो आपला मित्रच समजत असे. अशी सुखाची काही वर्षे लोटली आणि मोतीला म्हातारपण आले. त्याच्यात पूर्वीचा चपळपणा राहिला नाही. एका जागी बसून राहावे. असेच त्याला वाटे. आता तो फारसा जंगलातही जात नसे. त्यामुळे मालकाने एक नवा कुत्रा आणला होता. मालकाच्या मनात मोतीला आता काही एक स्थान उरले नव्हते. तो मोतीला सारखे हाइ हाइ करीत असे व त्याला पोटभर खाण्यासाही देत नसे, त्यामुळे मोती अधिक थकत चालला होता. तेव्हा त्या कृतज्ञ धन्याने आपल्या त्या जुन्या मित्राला एक-दोनदा घरापासून दूर नेऊन सोडला. पण, त्या घरात आता त्याला स्थान नव्हते. धनाजी तर आपल्या या जुन्या दोस्ताला आता पूर्णपणे कंटाळला होता. त्याच्या कटकटीतून सुटण्यासाठी त्याला ठार करण्याचा निश्चय धनाजीने केला. वृध्द मोतीच्या कानावर हे शब्द गेले तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. एके दिवशी धनाजीची नात जुई नाहीशी झाली. सर्व जण घाबरेघुबरे झाले. इतक्यात कोपऱ्यातला मोती उठला व सगळी शक्ती पायात आणून तो धावत रानात गेला. मग सर्व जण मोतीमागे धावले. जंगलात कोल्ह्याजवळ जुई होती. कोल्ह्याला गोळी मारली तर ती जुईला लागण्याची भीती होती. | मोती कोल्ह्यावर तुटून पडला. जागोजागी तो जखमी झाला पण त्याने कोल्ह्याचा पराभव केला. कोल्हा रानात पळून गेला, तेव्हा मोतीने जुईला तिच्या आईच्या स्वाधीन केले. आता सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. धनाजीने मोतीला परत प्रेमाने जवळ घेतले आणि तो म्हणाला, “संकटाला उपयोगी पडतो तोच खरा मित्र. मोतीच माझा खरा मित्र आहे." आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा