Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शनिवार, ८ मे, २०२१

बोधकथा-नेपोलियन बोनापार्ट

                 नेपोलियन बोनापार्ट 



- फ्रान्सचा जगप्रसिद्ध सम्राट. एक असामान्य सेनानी व कार्यक्षम प्रशासक, नेपोलियनचा जन्म १५ ऑगस्ट १७६९ ला एका गरीब कुटुंबात कार्सिका बेटावर (फ्रान्स) झाला. त्यांच्या वडिलाचे नाव कार्लो तर आईचे नाव मारीआ लेतीत्सा रामोलीनो होते. ब्रीएनच्या लष्करी विद्यालयात पाच वर्षासाठी तो दाखल झाला. ब्रीएन येथील लष्करी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पॅरिसच्या इकॉल मिलितेअर अकादमीत तोफखान्याचे शिक्षण घेण्यासाठी त्याने नाव टाकले. रणनीती : जगाच्या इतिहासात एक असामान्य लष्करी सेनापती म्हणून नेपोलियनचे नाव जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या लष्करी जीवनाला १७९३ साली । सुरुवात झाली आणि वॉटलू ही नेपोलियनच्या बावीस वर्षाच्या लष्करी जीवनातील अखेरची लढाई ठरली. या काळात त्यांनी सुमारे साठ लढायांत फ्रेंच सेनेचे नेतृत्व केले व वॉटलू खेरीज (१८१५) अन्य बहुतेक ते विजयी झाले. शालेय जीवनात त्याने जगाबद्दल माहिती मिळविली होती तसेच अनेक लढायांचा अभ्यास केला. आपल्या आईपासून नेपोलियनने शिस्त व नेतृत्व यांचे धडे गिरवले. त्यांच्या रणनीतीचे मर्म सैनिकांची मने आणि अंतःकरणे जिंकण्यात होते. नेपोलियनची केवळ उपस्थिती ही त्यांच्या सैन्याची स्फूर्ती होती. म्हणून वेलिंग्टनने म्हटले आहे की, “नेपोलियनचे रणांगणावरील अस्तित्व म्हणजे ४०,००० सैनिका बरोबर होते.” त्यांच्या रणनीतीचे दुसरे महत्त्वाचे गमक म्हणजे त्यांचे युद्धकाळातील जाहीरनामे. आपल्या सैनिकांना स्फूर्ती मिळेल आणि त्यांचे नीतिधैर्य वाढेल, असे जाहीरनामे ते काढीत. प्रत्यक्ष लढाईच्या वेळेस त्यांची शिस्त फार कडक असे. वेळेचे मोल तर त्यांच्या इतके कोणीच ओळखले नाही. अपयशाची त्यांना कधीही शंका वाटत नसे आणि त्यांचा आत्मविश्वासही मोठा विलक्षण होता. योग्यता : नेपोलियनचे चरित्र आणि चारित्र्य रोमांचकारी घटनांनी भरलेले आहे. त्यांच्या अंगी सेनापतीस योग्य असे धैर्य व धाडस होते आणि त्यांची बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती विलक्षण होती. नेपोलियनची आकृती सेनापतीला न शोभेल अशी ढेंगू (५ फूट एक इंच); एक ऐटदार व आकर्षक होती. ते दुसऱ्यावर तात्काळ छाप पाडत. नेपोलियनचा पिंड भावनाप्रधान, वृत्ती रसिक, भोगप्रवण, स्वभाव आक्रमक, बुद्धी शोधक व सर्वस्पर्शी होती. नट, गायक, चित्रकार, कवी, तत्त्वेते, शास्त्रज्ञ वगैरे बुद्धिवंतांची संगत त्यांना फार प्रिय असे. सत्तीधीश किंवा युद्धनेता हा सतत कर्तव्यदक्ष असला पाहिले. या उक्तीपासून ते कधीही ढळले नाहीत. त्यांना आपले सेनापती अक्षरश: शून्यातून निर्माण केले आणि पडत्या काळातही अनेक अधिकाऱ्यांनी त्यांना आपल्या मर्दुमकीने साथ दिली. म्हणून एमर्सनने म्हटले आहे. 'त्याने आपली युद्धे बुद्धीने जिंकली. 'नेपोलियनने आपल्या आठवणी अखेरीस तुरुंगात असताना लिहिल्या त्या विलक्षण उद्बोधक असून त्यांच्या मनोवृत्तीचे तसेच यशापयशाचे स्वयं मूल्यमापन त्यातून प्रभावीपणे प्रकट झाले आहे. यांची असंख्य पत्रे आतापर्यंत उपलब्ध झाली असून त्यापैकी सुमारे, ४१,००० पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. नेपोलियनचे चरित्र व लढाया यावर गेल्या दीडशे वर्षात जवळ-जवळ दोन लाखांहून अधिक ग्रंथ लिहिले गेले. अद्यापि त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास अनेक पाश्चात्य विद्यापीठात चालू आहे. कर्करोगाने वयाच्या बावन्नाव्या वर्षी ५ मे १८२१ ला मरण पावले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा