शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
एक घनदाट जंगल होतं. या जंगलात बरेच प्राणी राहात होते. चपळाईन धावणारी सुरेख हरण *होती. कोल्हे होते. लांडगे होते, अस्वल होते, हत्ती होते, वाघ, सिंहसुध्दा त्या जंगलात होते. त्या जंगलात एक नदी होती. मोठ होत तिंच पात्र. अगदी दुथडी भरून वहात असायची ती नदी. जंगलातली सगळी जनावरे या नदीवर पाणी प्यायला यायची. त्यांच्या वेळा अर्थ वेगवेगळ्या असत. त्या नदीमुळे जंगलाचे दोन भागच झाले होते. इकडच्या जनावरांना पलीकडे जाता यायचं नाही तर तिकडच्या जनावरांना इकडे येता यायचं नाही. दोघांनाही खूप वाटायचं पलिकडे काय आहे ते बघावं, तिकडच्या प्राण्यांना भेटावं, पण कसं शक्य होतं ते? मधे पाण्याने भरलेली नदी होती ना ? आता ज्या प्राण्यांना पोहता येत होतं ना, ते जात असत पाण्यातून पलिकडे. तिकडून परत आल्यावर ते अशी काही वर्णन करायचे तिकडच्या जंगलाची की ऐकणारे दंग होऊन जात. त्यांना वाटे आपल्याला कधी जायला मिळेल बरं तिकडे! प्राण्यांचा हा प्रश्न एकदा निसर्गानेच सोडवला. झालं काय की खूप मोठ वादळ आलं. अगदी सोसाट्याचा वारा सुटला. मुसळधार पाऊस कोसळू लागला. टपोऱ्या गारा पडू लागल्या. निसर्गाचे तांडव सुरू झाले. झाडे वेली डोलू लागल्या. वाऱ्याचा वेग इतका वाढला की मोठमोठ्या वृक्षांना तो गदागदा हलवू लागला. कितीतरी भले मोठे वृक्ष मुळापासून उन्मळून पडले. नदीकाठच्या भल्या मोठ्या वृक्षालाही वाऱ्याने गदगदा हलवले. बराच जुना असूनही तो वृक्ष वायापुढे टिकाव धरू शकला नाही. थोड्याच वेळात तो आडवा झाला. पण आडवा झाला तो एकदम नदीवर. त्या नदीचे दोन्ही किनारे त्या वृक्षाने साधले. त्या नदीवर जणू
काही पूल बांधला गेला. प्राण्यांना आता इकडून तिकडे जाणे सोपे झाले. सर्वच जण त्या वृक्षावरून चालत पलीकडे जात. एकदा गंमतच झाली. दोन रानडुकर दोन्ही बाजूंनी त्या वृक्षावरून चालत, मध्यभागी आली. त्या वृक्षाची जाडी एवढी होती की एकावेळी एकच जनावर त्यावर चालू शकत असे. कोणाला तरी एकाला मागे हटणे भाग होते, पण मागे हटणे हा त्या दोघांनाही अपमान वाटत होता. “पाहिलीय का माझी शक्ती" एक जण गर्वाने म्हणाला. "मुकाट्याने मागे जा. मला आधी जाऊ दे , नाहीतर दाखवतो तुला.' जा तूच. नाहीतर दाखवतो तुला.' ." "अरे जा-जा मोठा आलाय शक्तीवाला. गमजा नको गाऊस. परत " कोणीच मागे हटेना, दोघांनी तेथेच रेटारेटीला सुरुवात केली अन तोल जाऊन दोघेही नदीत पडले. थोड्या वेळानं दोन ससे आले. तिथे दोघांनाही पलीकडे जायचं? होतं दोघंही मध्यावर आले अन् थांबले 'अरेच्या ! आता कसं करायचं?' ते विचार करू लागले. दोघे ही शहाणे होते. समजूतदार. त्यांनी थोडा विचार केला. मग एक जण म्हणाला, 'आपण असं करू या, मी खाली बसतो अगदी या झाडाला चिपकून. तू माझ्या अंगावरून पलीकडे जा कसं? 'अगदी बरोबर' दुसरा म्हणाला. अन् त्याच्या अंगावरून हलकेच पलीकडे गेला. पहिलाही मग इकडे आला. दोन्ही किनाऱ्यावरून दोघांनी एकमेकांना पाहिले. शेपट्या हलवल्या अन् तुरुतुरू पळाले. झाडावर असलेला पक्षी हे सगळं पहात होता. तो आपल्या मित्रांना म्हणाला, बघा, शक्तीपेक्षा युक्तीचं श्रेष्ठ. युक्तीनं आपलं काम करून घ्यावं. उगाच भांडण करण्यात काय अर्थ ? त्याने आपलंच नुकसान होतं. सगळ्यांना त्याचं म्हणणं पटलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा