छत्रपती संभाजी राजे
दि. १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ महाराणी सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत. सईबाईच्या प्रकृती अस्वस्थ असायची त्यामुळे संभाजी राजांच्या दुधाची हेळसांड होत होती. ही जबाबदारी कापूरहोळच्या गाडे-पाटलांची सून थाराऊ यांनी पार पाडली. जन्मानंतर अवघ्या दोन वर्षातच शंभूराजे मातृत्वाला पोरके झाले होते. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच युद्धकलेचे व बौद्धिक शिक्षण दिले. ज्यामध्ये भाषांचे ज्ञान, युद्धकला, राज्यनीती, अर्थनीती व्यवहार या सर्वांचा समावेश होतो. त्यामुळेच तर केवळ आठ वर्षांचे संभाजी राजे मराठी, संस्कृत, पारशी, हिंदी, इंग्रजी, पोर्तुगीज, कन्नड, तेलगू या भाषा बोलू, लिहू व वाचू शकत होते. विशेषतः संस्कृत भाषेवर त्यांचे अधिक प्रभुत्व होते. अत्यंत स्वाभिमानी संभाजी महाराज महापराक्रमी व कुशल योद्धा होते. छ. शिवरायांनी त्यांना वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी वऱ्हाडप्रांताचे राजे केले. इ. स. १६७० सालापासून सुरू झालेल्या लढाईत शिवरायांनी औरंगजेबासोबत स्वराज्याची निकराची व निर्णायक लढाई सुरू केली त्यावेळेपासून, ते राज्याभिषेकापर्यंत संभाजीराजे शत्रूशी प्राणपणाने लढले. १६७० सालापासून सुरू झालेल्या | लढाईत शिवरायांनी संभाजीराजाकडे दहा हजार सैन्याची तुकडी दिली व १६७१ पासून स्वतंत्र्य राज्यकारभार करण्याविषयी स्वातंत्र्य प्रदान केले. १६७२ साली संभाजी राजांनी खंबायत व गुजरातवर आक्रमण केले, यावेळी यांचे वय होते अवघे १५ वर्षे व त्याचवेळी त्यांनी खंबायत-गुतरात जिंकले. १६७४ सालापर्यंत तहात गमावलेले २३ किल्ले संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली परत मिळविले होते. एकोणवीस वर्षाच्या कालखंडात शंभूराजांनी लहान मोठ्या दीड हजारावर लढाया जिंकल्या होत्या. त्यांच्या कारकीर्दीत स्वराज्याचा खजिना प्रचंड भरलेला होता. शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सवलती शंभूराजांनी दिल्या होत्या. | स्वराज्यात आबादी-आबाद होते. शंभूराजे रयतेवर जिवापाड प्रेम करी होते. ६ जून १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याचवेळी संभाजी राजांनादेखील स्वराज्याचे वासरदास व युवराज म्हणून घोषित केल्या गेले. १६७५ साली शंभूराजांनी आदिलशहावर स्वारी करून गोवळकोंडा, भागानगर (हैद्राबाद) पर्यंत धडक मारली, तसेच हुबळी-रायबाग हा प्रांत जिंकला. ऑक्टोबर १६७६ ते जून १६८० ही चार वर्षे संभाज राजे रायगडावर नव्हते व त्याच कालावधीत जिजाऊ मासाहेबांचे १७ जून १६७४ ला निधन झाले व ३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच | मृत्यु झाला. त्यामुळे १६ जानेवारी १६८१ ला संभाजी राजांनी किल्ले रायगडावर राज्याभिषेक करवून घेतला.
छत्रपती संभाजी महाराजांनी आपले ३२ वर्षांचे अल्पायुष इथल्या भूमीपुत्रांना, शेतकऱ्यांना व बहुजनांना न्यायिक, साहित्यिक, सांस्कृतिक स्वातंत्र देण्याकरिता वेचले, तथापि या समतावादी व्यवस्थेला विरोध करणाऱ्यांनीच फितुरीने संगमेश्वर येथे शंभूराजांना पकडून दिले. परंतु साक्षात मृत्यू समोर असतांनाही संभाजी राजे डगमगले नाहीत. औरंगजेबाने ठार मारण्यापूर्वी दोन प्रश्न विचारले. त्यापैकी स्वराज्याचा खजिना, संपत्तीबाबत माहिती व दूसरा औरंगजेबाच्या गोटातील स्वराज्य प्रेरक व शंभूराजांप्रति निष्ठा असणाऱ्या सरदारांची नावे परंतु स्वाभिमानाने शंभूराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने राजांना हाल हाल करून ठार केले. सर्वप्रथम राजांची जीभ कापण्यात आली, त्यानंतर दोन्ही डोळे काढण्यात आले. त्यांच्या कानात गरम शिसे ओतण्यात येऊन अंगावरची त्वचा सोलून काढून त्यावर मिठाचे गरम पाणी टाकण्यात आले. अशा प्राणांतिक वेदना होत असतानाही राष्ट्रभक्त संभाजी राजांनी शिवराज्यची शिवसूत्रे शत्रूपक्षाच्या हाती लागू दिली नाही. छ. शिवरायांचे खरे पाईक, प्रखर देशभक्त, धाडसी व पराक्रमी, बुद्धिमान व चारित्र्यसंपन्न राजपुत्र आणि प्रतिभावंत लेखक शंभूराजांचे चरित्र महाराष्ट्रातीलच नव्हे तर या देशातील प्रत्येक युवकास प्रेरणादायी असेच आहे. अशा महान योद्धास कोटी कोटी मानाचे मुजरे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा