'गुरुदेव रवीद्रनाथ टागोर '
: (जन्म ६ मे १८६१ - मृत्यू ७ ऑगस्ट १९४१ ) विश्वविख्यात कवीं, तत्वचिंतक व साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळविणारे रविंद्रनाथ टागोर (ठाकूर) यांचा जन्म कलकत्त्यातील एका धनवंत व विद्यावत कुटुंबात झालागी वडील देवेंद्रनाथ व माता शारदादेवी यांना जी एकूण १५ अपत्ये झाली, त्यात रवींद्रनाथाचा १४ वा क्रमांक होता. ते १४ वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली. शाळेतल्या कडक शिस्तीचा तिटकारा वाटत असल्याने त्यांचे बंगाली, इंग्रजी व संस्कृत भाषाचे तसेच इतर विषयांचे शिक्षण घरीच करून घेण्यात आले. त्यांच्या वडिलांना प्रवासाची आवड असल्याने १८७७ साली ते इंग्लंडला जायला निघताच रवींद्रनाथही त्यांच्यासंगे शिक्षणासाठी म्हणून गेले व वाचन, चिंतन, कवितालेखन यांच्यामुळे ब्राइटन स्कूल व युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेऊनही पदवी पदरात पाडून न घेताच कलकत्त्यास परतले. १८८३ साली त्यांचा मृणालिनीदेवींशी विवाह झाला. सन १८९० मध्ये पुन्हा कायद्याच्या अभ्यास करण्यासाठी म्हणून सुखाचा → कथाकथन - ते इंग्लंडला गेले. पण त्या शुष्क अभ्यासात बुध्दी खर्च करण्याऐवजी इंग्लिश वाङ्मयाचा अभ्यास त्यांनी केला आणि पुन्हा परतीचा मार्ग घरला. ते कलकत्यास आल्यावर ते शेतीच्या गावी प्रत्यक्ष वनराईत असलेल्या आपल्या बंगल्यात जाऊन राहिले. तिथल्या निसर्गरम्य वातावरणात ते चित्रकला, गायनकला, चांगल्या पुस्तकांचे वाचन आणि रानावनात भ्रमंती यात वेळ घालवू लागले. कविता करण्याचा त्यांना लहानपणापासूनच छंद होता. वयाच्या १४ व्या वर्षापासूनच त्यांच्या कविता बंगाली मासिकांतून प्रसिध्द होत होत्या. आता त्यांची प्रतिभा फुलली व कवितांची वेगाने निर्मिती होऊन गीतांजली, नैवैद्य, चैताली अशांसारखे अनेक कवितासंग्रह प्रसिध्द होऊ लागले. सन १९१२ पर्यंत त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिध्द झाले. त्यातील वेचक बंगाली कवितांचा त्यांनी गीताजंली या नावानेच एक नवा कवितासंग्रह संपादित केला व त्या साली ते इंग्लंडला गेले असता यीट्स, बूक आदि इंग्लिश कवींना त्या कविता इंग्लिशमध्ये भाषांतरित करून वाचायला दिल्या. त्यांना त्या कमालीच्या आवडल्या. त्या छापायला इंग्लिश प्रकाशक मिळाला, आयरिश महाकवी यीट्स याने त्या इंग्रजी आवृत्तीला प्रस्तावना लिहिली आणि ती इंग्लिश आवृत्ती पाश्चात्य रसिकांनी डोक्यावर घेतली. १९१३ सालचे साहित्यातले नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले. मग बंगालीच नव्हे, तर सर्व भारतीय त्यांचा उदोउदो करू लागले. त्यांनी युरोप व आशियातील देशात एकूण सतत सात वेळा दौरा केला. पुढे 'शांतीनिकेतन' व 'विश्वभारती विद्यापीठाची' स्थापना केली. त्यांचे काव्यसंग्रह, नाटके, कथासंग्रह, कांदबऱ्या असे बरेच वाङ्मय प्रसिध्द झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा