मौखिक भाषा विकासाच्या सरावासाठी मुलाखत हे तंत्र विद्यार्थ्यानी कसे वापरावे याबाबत वरील घटकामध्ये मार्गदर्शन केले आहे .
उदहारण म्हणून डॉक्टर यांची मुलाखत घेण्यासाठी खालील प्रश्नावली बघा व एक मुलाखत घ्या .
- नमस्कार ............. साहेब , आपले शुभ नाव काय ?
- आपण डॉक्टर व्हावे असे आपणास का वाटले होते ?
- आपण कोण कोणत्या आजारावर उपचार करत आहात ?
- आपण आपले वैद्यकीय शिक्षण कोणत्या ठिकानावरून पूर्ण केले आहे ?
- रुग्ण सेवा करत असताना तुम्हाला कधी रुग्ण व् त्यांचे नातेवाईक यांच्या कडून आपल्या सेवेच्या कामाबद्दल चांगले अनुभव येत असेल तर ते सांगू शकाल का ?
- आपल्या हॉस्पिटलची वेळ काय आहे ?
आपण आम्हाला जो आपला बहुमोल वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार व आपल्या कार्यास शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा