'यश कसे मिळवावे'
गोष्ट वाचा व तुम्हाला आवडणारी गोष्ट मित्राला सांगा:
: यश मिळवणं ही गोष्ट एखादा पदार्थ तयार करण्यासारखी आहे. प्रत्येक घटक आणि कृती योग्य प्रमाणात असल्याशिवाय पदार्थ चांगला होत नाही. प्रत्येक घटक उत्तम गुणवत्तेचा आणि
तो योग्य प्रमाणात असलाच पाहिजे. तो नेमका शिजला पाहिजे. कमी किंवा जास्त शिजवून चालत नाही, तुम्हाला पदार्थ कसा करायचा ते एकदा चांगल माहीत झालं की चुकतमाकत का होईना तो पदार्थ तुम्ही सहज करू शकता. एखादं काम चिकाटीनं करणं आणि हटवादीपणानं करणं यांत फरक काय? चिकाटीतून 'काम कराययचंच' हा दृढसंकल्प प्रकट होतो, तर हटवादीपणातून एखादी गोष्ट मुद्दाम 'करायची नाहीय' हे व्यक्त होत असतं. तुम्हाला यश कसं मिळवायचं ते माहित झालं. आता या माहितीचा कसा वापर करायचा तो तुमच्या हातात आहे.
यश मिळविण्यासाठी काही उपयुक्त सूचना : जिंकण्यासाठी खेळा, पराभव टाळण्यासाठी खेळू नका. • इतरांच्या चुकांमधून शिका. • चारित्र्यवान माणसांशी संबंध ठेवा. • तुम्हाला जे मिळतं त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती ठेवा. • कोणतीही गोष्ट घेताना तिची किंमत चुकवा. ती आयती मिळावी अशी इच्छा ठेवू नका. • दूरदृष्टीने विचार करा. आपली शक्तिस्थाने ओळखा आणि त्यांच्या भक्कम पायावर आपली इमारत उभी करा. • निर्णय घेताना साकल्याने विचार करा. सचोटीशी कधीही तडजोड करू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा