2 भारताची संसद
सरावासाठी प्रश्न :-
प्रश्न :- संसद म्हणजे काय ?
उत्तर :- राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रिय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला 'संसद' असे म्हणतात.
प्रश्न :- संसदेत कुणाकुणाचा समावेश होतो ?
उत्तर :- संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा
प्रश्न :- संसदेच्या दोन सभागृहांना काय म्हटले जाते ?
उत्तर :- लोकसभा व राज्यसभा
प्रश्न :- लोकसभा म्हणजे काय ?
उत्तर :- संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा
प्रश्न :- लोकसभेच्या मुदतीचा कालावधी किती असतो ?
उत्तर :- ५ वर्षे
प्रश्न :- मध्यावधी निवडणूका म्हणजे काय ?
उत्तर :- काही वेळेस पाच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित होणे
प्रश्न :- संविधानानुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते
उत्तर :- ५५२
प्रश्न :- लोकसभेला पहिले सभागृह का म्हणतात ?
उत्तर :- लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे म्हणून
प्रश्न :- राज्यसभा म्हणजे काय ?
उत्तर :- भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह
प्रश्न :- राज्यसभा कोणकोणत्या प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते ?
उत्तर :- भारतीय संघराज्यातील २९ घटकराज्ये आणि ७ संघशासित प्रदेशांचे
प्रश्न :- राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती असते ?
उत्तर :- २५०
प्रश्न :- लोकसभेच्या व राज्यसभेच्या सदस्यांना काय म्हणतात ?
उत्तर :- खासदार
प्रश्न :- राज्यसभेतील २५० सदस्यांपैकी किती सदस्यांची निवडणूक राष्ट्रपती करतात ?
उत्तर :- १२ सदस्य
प्रश्न :- महाराष्ट्र राज्याला लोकसमेत किती जागा आहेत ?
उत्तर :- ४८ जागा
प्रश्न :- राज्यसभेचे दुसरे नाव काय ?
उत्तर :- द्वितीय सभागृह
प्रश्न :- लोकसभेवर कोणत्या पद्धतीने उमेदवार निवडून पाठवले जातात ?
उत्तर :- भौगोलिक मतदार संघ पद्धतीने
प्रश्न :- लोकतमेचे कामकाज कोणाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते ?
उत्तर :- लोकसभा अध्यक्षांच्या
प्रश्न :- भारतीय जनतेचे प्रतिनिधीत्व कोण करते ?
उत्तर :- लोकसभा
प्रश्न :- राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात ?
उत्तर :- उपराष्ट्रपती
प्रश्न :- विधेयकाचे पहिले वाचन म्हणजे काय ?
उत्तर :- संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करणे
प्रश्न :- दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत कोण सादर करतो ?
उत्तर :- अर्थमंत्री
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा