Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास, 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ

      3 केंद्रीय कार्यकारी मंडळ



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- शासनव्यवस्थेच्या तीन शाखा कोणत्या ?
उत्तर :- कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ


प्रश्न :- भारताचा संविधानात्मक प्रमुख कोण ?
उत्तर :- राष्ट्रपती


प्रश्न :- राष्ट्रपती होण्यासाठी किती वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे ?
उत्तर :- ३५


प्रश्न :- राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
उत्तर :- संसद


प्रश्न :- राष्ट्रपतीला पदावर दूर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
उत्तर :- महाभियोग


प्रश्न :- विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याच्या प्रक्रियेस अंतिम स्वाक्षरी कोण करतो ?
उत्तर :- राष्ट्रपती


प्रश्न :- मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो ?
उत्तर :- राष्ट्रपती


प्रश्न :- सरंक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात ?
उत्तर :- राष्ट्रपती


प्रश्न :- राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांचे कामे कोण पार पाडतात ?
उत्तर :- उपराष्ट्रपती


प्रश्न :- कोणाची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून होते ?
उत्तर :- उपराष्ट्रपती


प्रश्न :- कोण खऱ्या अर्थाने राज्यकारभार करत असते ?
उत्तर :- पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ


प्रश्न :- मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करते ?
उत्तर :- पंतप्रधान


प्रश्न :- मंत्रीमंडळाची स्थापना कोण करतो ?
उत्तर :- पंतप्रधान


प्रश्न :- अधिवेशन काळातील दुपारी १२ चा काळ हा काय म्हणून ओळखला जातो ?
उत्तर :- शून्य प्रहर


प्रश्न :- भारताच्या केंद्रिय कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होतो ?
उत्तर :- राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ


प्रश्न :- राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
उत्तर :- ५ वर्षे


प्रश्न :- भारतातील कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?
उत्तर :- राष्ट्रपती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा