डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
त्यानंतर कलकत्ता विद्यापीठामधे अध्यापनासाठी त्यांना सन्मानपूर्वक बोलविण्यात आले. अशा तऱ्हेने उत्तम प्राध्यापक, थोर विचारवंत, तत्वज्ञ, उत्कृष्ट वक्ते म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली होती. यांचा भारताबरोबरच परदेशातही या तत्वज्ञाची महती पोहोचली होती आणि म्हणूनच 'ऑक्सफर्ड सारख्या अनेक प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांतून त्यांना व्याख्यानाची व अध्यापनासाठीची निमंत्रणे येऊ लागली. विविध विषयांवर परदेशात व्याख्याने देत असताना, भारतीय तत्वज्ञानावरील समर्पक विश्लेषणाने त्यांनी पाश्चात्यांची मने जिंकली.
स्वामी विवेकानंदाच्या नंतर भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार सातासमुद्रापलीकडे नेण्याचे काम या ऋषितुल्य शिक्षकाने केले. भारतीय तत्वज्ञान', 'महात्मा गांधी', 'गौतम बुद्ध', 'भारत आणि चीन"यासारख्या अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. १९३१ साली ते आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यानंतर बनारस विद्यापीठाचे कुलगुरु व दिल्ली विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांना शासकीय प्रवाहात आणण्याचे काम पंडित नेहरूंनी केले.
राधाकृष्णन यांच्यासारखे कुशाग्र बुद्धिवंत. थोर विचारवंत, ज्ञानसंपन्न तत्वज्ञ शासनात राहिल्यास भारताच्या राजकीय व्यवहाराला तात्विक अधिष्ठान प्राप्त होईल अशी नेहरूंची धारणा होती. १९५२ साली ते भारताचे उपराष्ट्रपती झाले व १९६२ मध्ये भारतातील सर्वोच्च स्थानी 'राष्ट्रपती' म्हणून विराजमान झाले.
उच्चविद्याविभूषित तत्त्वज्ञ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अध्यापक, उत्कृष्ट प्रशासक, द्रष्टे विचारवंत, देशाचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती यांसारख्या अनेक सन्माननीय पदांवर काम करूनही शिक्षण क्षेत्र हे त्यांच्या आवडीचे क्षेत्र राहिले आणि अगदी शेवटपर्यंत त्यांच्यातील शिक्षक सदैव जागा राहिला. म्हणूनच आपण त्यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करतो. अशा या गुरुच्याही 'महागुरु पुढे नतमस्तक होणे हे आपल्यासारख्या ज्ञानसाधकाचे परमकर्तव्यच आहे.
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा