लालबहादूर शास्त्री
त्यावेळी गांधीजींची असहकार चळवळ सुरू झाली होती. गांधीजींच्या विचारसरणीने प्रेरित होऊन शास्त्रीजींनी शालेय जीवनातच असहकार चळवळीत भाग घेतला. त्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्णच राहिले. ललितादेवी यांच्याशी १९२७ साली शास्त्रीजींचा विवाह झाला. स्वातंत्र्यासाठी झालेल्या आंदोलनात शास्रीजींनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्याबद्दल त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. एकदा शास्रीजी तुरुंगात होते, घरी त्यांची मुलगी आजारी असल्याचे पत्र त्यांना आले तेव्हा तुरुंगात परत येण्याच्या अटीवर मला सोडावे अशी विनंती शास्त्रीजींनी तुरुंग अधिकाऱ्याला केली.
एक कागद शास्त्रीजींच्या हातात देत तुरुंग अधिकारी म्हणाले, "आपणास पॅरोलवर सोडण्यात येईल, पण कोणत्याच राजकीय कार्यात भाग घेणार नाही, असे या कागदावर लिहून देत असाल तरच." शास्त्रीजींनी तो कागद फाडतच त्या तुरुंग अधिकाऱ्यांना म्हणाले, "देशांतला कायदा पाळणे मला माहिती आहे पण गुलामाप्रमाणे लिहून देऊन सुटका करून घेणे मला मान्य नाही." शास्त्रीजींच्या तत्वनिष्ठेवर विश्वास असल्याने लिहून न घेताच पंधरा दिवसांसाठी घरी जाण्याची परवानगी तुरुंग अधिकाऱ्याने त्यांना दिली. पण दुर्दैवाने शास्त्रीजी घरी जाण्यापूर्वीच त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. शास्त्रीजींनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले व लगेचच तुरुंगात परतले.
एवढा प्रचंड नैतिकतेचा आदर्श शास्त्रीजीच्या जीवनपटातून आपणास मिळतो. १९५२ साली नेहरूंच्या मंत्रीमंडळात ते रेल्वेमंत्री झाले. रेल्वेमंत्री असताना सामान्य प्रवाशांच्या समस्या समजावून घेण्यासाठी ते स्वतः रेल्वेच्या सामान्य डब्यातून प्रवास करत. रेल्वे मंत्री असताना झालेल्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी आपल्या रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला.
लालबहादूर शास्त्रींच्या पंतप्रधानपदाच्या काळातच १९६५ साली पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. तेव्हा राष्ट्रीय नेते म्हणून खंबीरपणे प्रतिकाराचे आदेश त्यांनी दिले. 'जय जवान, जय किसान' अशी प्रेरणादायी घोषणा देऊन संपूर्ण भारतामध्ये देशभक्तीची भावना प्रज्वलित केली. त्या युद्धात भारताने विजयही मिळवला. १० जानेवारी १९६६ मध्ये शांततेच्या करारासाठी ते ताश्कंद येथे गेले असताना शास्त्रीजींचा अनपेक्षित मृत्यू झाला आणि आपला देश एका निस्वार्थी राष्ट्र सेवकाला मुकला.
अखंह आयुष्यभर आपल्या तत्त्वांशी बांधील राहून निस्वार्थी भावनेने राष्ट्राची सेवा करणाऱ्या या 'निष्काम कर्मयोग्या'च्या देदीप्यमान कर्तृत्वापुढे आजही सारा देश नतमस्तक होतो! “थोर तुमच्या चारित्र्याची उंची गर्व तुमच्या तत्वनिष्ठेचा करावा, वर्तमानातल्या नेतृत्वान राजमार्ग त्या पावलांचा धरावा. जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा