Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

असा बालगंधर्व आता न होणे

  असा बालगंधर्व आता न होणे 


माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात गौरीशंकर गाठणारे युगपुरुष अनेक आहेत. आपल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व ही नावे जादूच्या मंत्रासारखी आहेत. या नावाच्या नुसत्या उच्चाराने आपलं मन फुलून येतं! लोकोत्तर पुरुषांविषयी बोलताना आपण कधी कंटाळत नाही. आता आपलंच पाहा- २६ जून बालगंधर्व जन्मशताब्दीपासून बालगंधर्वाविषयी आपण सारखे पाहत आहोत, वाचत आहोत आणि बोलत आहोत.


 जशा जन्मती तेज घेऊनी तारा 


जसा मोर घेऊन येतो पिसारा 


तसा येई कंठात घेऊन गाणे 


असा बालगंधर्व आता न होणे! 


ग.दि.मां.च्या या ओळी किती सार्थ आहेत! पण म्हणून बालगंधर्व आपल्याला पूर्ण समजले असे आपण म्हणूनच शकत नाही. वेरूळ, अजिंठ्याची शिल्पं, चित्र जशी गतकाळातील सौंदर्याचे, संपत्नेचे आणि संस्कृतीचे संदर्भग्रंथ आहेत, तसे बालगंधर्व हा रसिक मराठी मनाला गवसलेला, जीवन समृद्ध करणारा एक सुंदर संदर्भ आहे. बालगंधर्वांचे खरे नाव नारायण राजहंस, बालगंधर्व ही पदवी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी लोकमान्य टिळकांनी त्यांना दिली १९०५ पासून बालगंध्वानी रंगभूमीवर किर्लोस्कर नाटक मंडळीतफे शारदा, मालिनी, शकुंतला अशा विविध भूमिका गायन आणि अभिनयातून साकार केल्या, परंतु खऱ्या गंधर्व युगाला सुरुवात झाली, ती १९११ पासून, भरजरी उंची वसं, त-हेत हेची सोन्या-मोत्यांची आभूषणे ल्यालेले गंधर्व अत्तराच्या घमघमाटात प्रवेश करीत, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होई! 'पाहताव अवयव सगळे नयनी जमले,' अशी प्रेक्षकांची अवस्था होई. बालगंधर्वाच्या गाण्याबद्दल म्या पामराने काय बोलावे! उपवर रुक्मिणीचे स्वयंवर डोळ्यांनी पाहायला गेलेले प्रेक्षक रुक्मिणीकडे आपल्या कानांनी पाहत आणि डोळ्यांना जरा गप्प बसा म्हणत! त्यांचं गाणं, लय, सूर, ताल यांचा अद्भुत त्रिवेणीं संगम असे. कुठल्यातरी अज्ञात शक्तीची बोटं गंधर्वाच्या गळ्यावर फिरून गाणं उमटवत आहेत असं ऐकणाऱ्याला वाटून जात असे. त्यांच्या नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या तिकिटाच्या प्रत्येक रुपयातील चौसष्टच्या चौसष्ट पैसे केवळ बालगंधर्वांना पाहण्यासाठीच असत. असे त्यांचे सहकारी सांगत. नाटककाराच्या मनातील रुक्मिणी, भामिनी किंवा सिंधू 'ती मीच या भावनेनेच ते रंगमंचावर वावरत. या कलावंताने नाट्यदेवतेला 'देह जावो अथवा राहो' या भावनेनंच आपलं आयुष्य वाहिलं. ज्यांना अन्नदाते मायबाप म्हटलं, त्या त्या प्रेक्षकांपुढे एखाद्या देवतेची मूर्ती मखरात ठेवावी अशा श्रद्धेनं एक एक नाट्यकृती सजीव करून ठेवली. एका पुरुषाला सिंधू, रुक्मिणी, सुभद्रा, मेनका, रेवती... अशा स्रीवेशात येऊन, 





ना दिली १९०५ पासून बालगंध्वानी रंगभूमीवर किर्लोस्कर नाटक मंडळीतफे शारदा, मालिनी, शकुंतला अशा विविध भूमिका गायन आणि अभिनयातून साकार केल्या, परंतु खऱ्या गंधर्व युगाला सुरुवात झाली, ती १९११ पासून, भरजरी उंची वसं, त-हेत हेची सोन्या-मोत्यांची आभूषणे ल्यालेले गंधर्व अत्तराच्या घमघमाटात प्रवेश करीत, तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होई! 'पाहताव अवयव सगळे नयनी जमले,' अशी प्रेक्षकांची अवस्था होई. बालगंधर्वाच्या गाण्याबद्दल म्या पामराने काय बोलावे! उपवर रुक्मिणीचे स्वयंवर डोळ्यांनी पाहायला गेलेले प्रेक्षक रुक्मिणीकडे आपल्या कानांनी पाहत आणि डोळ्यांना जरा गप्प बसा म्हणत! त्यांचं गाणं, लय, सूर, ताल यांचा अद्भुत त्रिवेणीं संगम असे. कुठल्यातरी अज्ञात शक्तीची बोटं गंधर्वाच्या गळ्यावर फिरून गाणं उमटवत आहेत असं ऐकणाऱ्याला वाटून जात असे. त्यांच्या नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांच्या तिकिटाच्या प्रत्येक रुपयातील चौसष्टच्या चौसष्ट पैसे केवळ बालगंधर्वांना पाहण्यासाठीच असत. असे त्यांचे सहकारी सांगत. नाटककाराच्या मनातील रुक्मिणी, भामिनी किंवा सिंधू 'ती मीच या भावनेनेच ते रंगमंचावर वावरत. या कलावंताने नाट्यदेवतेला 'देह जावो अथवा राहो' या भावनेनंच आपलं आयुष्य वाहिलं. ज्यांना अन्नदाते मायबाप म्हटलं, त्या त्या प्रेक्षकांपुढे एखाद्या देवतेची मूर्ती मखरात ठेवावी अशाB श्रद्धेनं एक एक नाट्यकृती सजीव करून ठेवली. एका पुरुषाला सिंधू, रुक्मिणी, सुभद्रा, मेनका, रेवती... अशा स्रीवेशात येऊन,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा