Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १० जानेवारी, २०२२

आठवी इतिहास,८. सविनय कायदेभंग चळवळ

        ८. सविनय कायदेभंग चळवळ



सरावासाठी प्रश्न :-

प्रश्न :- गांधीजी दांडी या ठिकाणी साबरमती आश्रमातून कधी निघाले ?
उत्तर :- 12 मार्च 1930 (78 सहकारी)


प्रश्न :- साबरमती ते दांडी एकूण अंतर ?
उत्तर :- अंतर 385 किमी.


प्रश्न :- दांडी या ठिकाणी गांधीजींचे आगमन कधी झाले ?
उत्तर :- 6 एप्रिल 1930


प्रश्न :- सविनय कायदेभंगाच्या चळवळीस सुरवात ?
उत्तर :- 7 एप्रिल 1930


प्रश्न :- सरहद गांधी कोणास म्हणतात ?
उत्तर :- खान अब्दुल गफारखान


प्रश्न :- खुदा-इ-खिदमतगार संघटनेची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- सरहद गांधी


प्रश्न :- गढ़वाल फलटणीचे अधिकारी कोण ?
उत्तर :- चंद्रसिंग ठाकूर


प्रश्न :- 6 मे 1930 रोजी कोठे गिरणी कामगारांनी हरताळ पाळला ?
उत्तर :- सोलापूर


प्रश्न :- सोलापूर सत्याग्रहावेळी फाशी दिले गेलेले सत्याग्रही ?
उत्तर :- मल्लाप्पा धनशेटी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे


प्रश्न :- गुजरात येथील धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व ?
उत्तर :- सरोजिनी नायडू


प्रश्न :- जंगल सत्याग्रह कोठे करण्यात आला ?
उत्तर :- संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद इ.


प्रश्न :- पहिल्या गोलमेज परिषदेतील सहभागी लोक

उत्तर :- डॉ. आंबेडकर, सर तेजवहादूर सप्रू, बॅरिस्टर जीना


प्रश्न :- भारताला जबाबदार राज्यपढीचा स्विकार करण्याची हमी कशामुळे मिळाली ?

उत्तर :- गांधी आयर्विन करार


प्रश्न :- कितव्या गोलमेज परिषदेला म. गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते ?

उत्तर :- दुसऱ्या (1931)


प्रश्न :- पुणे करार कधी व कोणी, कोणात झाला ?

उत्तर :- म. गांधी व डॉ. आंबेडकर (1932)


प्रश्न :- तिसरी गोलमेज परिषद ?

उत्तर :- नोव्हेंबर 1932


प्रश्न :- सविनय कायदेभंगाची चळवळ म. गांधीनी कधी मागे घेतली ?

उत्तर :- एप्रिल 1934 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा