५. सामजिक व धार्मिक प्रबोधन
सरावासाठी प्रश्न :
प्रश्न :- राजा राममोहन रॉय यांनी बंगाल प्रांतात कोणत्या समाजाची स्थापना केली ?
उत्तर :- ब्राम्हो समाज
प्रश्न :- राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या पद्धतीचा विरोध केला ?
उत्तर :- सती प्रथा, बालविवाह
प्रश्न :- दादोबा पांडूरंग तर्खडकर यांनी कोणत्या सभेची स्थापना केली ?
उत्तर :- परमहंस सभेची
प्रश्न :- दादोबा पांडूरंग तर्खडकर यांनी कोणत्या साली परमहंससमेची स्थापना केली ?
उत्तर :- इ.स. १८४८ साली
प्रश्न :- प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर :- डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर
प्रश्न :- महात्मा जोतीराव फुले यांनी इ.स. १८७३ मध्ये कोणत्या समाजाची स्थापना केली
उत्तर :- सत्यशोधक समाज
प्रश्न :- डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- विठ्ठल रामजी शिंदे
प्रश्न :- स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली ?
उत्तर :- आर्य समाज
प्रश्न :- स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना साली केली ?
उत्तर :- इ.स. १८७५ साली
प्रश्न :- स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांवर भाष्य करणारा कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर :- सत्यार्थ प्रकाश
प्रश्न :- आर्य समाजाचे ब्रीदवाक्य कोणते होते ?
उत्तर :- वेदांकडे परत चला
प्रश्न :- रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोण ?
उत्तर :- स्वामी विवेकानंद
प्रश्न :- स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या साली रामकृष्ण मिशनची स्थापना केली ?
उत्तर :- इ.स. १८९७
प्रश्न :- गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय ?'
उत्तर :- लोकहितवादी
प्रश्न :- म. फुले यांनी पहिली मुलींची शाळा कोठे व कधी व स्थापन केली ?
उत्तर :- इ.स. १८४८ साली भिडेचा वाडा, पुणे येथे
प्रश्न :- स्वामी विवेकानंद यांनी इ.स. १८९३ मध्ये कोठे विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व केले ?
उत्तर :- अमेरिकेतील शिकागो येथे
प्रश्न :- शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती समा स्थापन झाली ?
उत्तर :- सिंगसभा
प्रश्न :- कोणत्या चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली ?
उत्तर :- अकाली
प्रश्न :- स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी स्थापन केले ?
उत्तर :- महात्मा फुले
प्रश्न :- विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले
उत्तर :- पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णूशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू
प्रश्न :- गोपाळ गणेश आगरकर यांचे पत्र कोणते ?
उत्तर :- सुधारक
प्रश्न :- गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या पत्रातून कोणत्या कायद्यावर परखड मते मांडली ?
उत्तर :- बालविवाह संमतीविषयीचा कायदा
प्रश्न :- भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- म. कर्वे
प्रश्न :- ताराबाई शिंदे यांनी कोणत्या ग्रंथातून स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला ?
उत्तर :- स्त्री-पुरुष तुलना
प्रश्न :- महर्षी धोडो केशव कर्वे यांनी पुण्यात कोणते आश्रम सुरु केले ?
उत्तर :- अनाथ बालिकाश्रम
प्रश्न :- पंडिता रमाबाईनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
उत्तर :- शारदाश्रम
प्रश्न :- रमाबाई रानडे यांनी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरु केला ?
उत्तर :- सेवासदन
प्रश्न :- अब्दुल लतीफ यांनी बंगाल प्रांतात कोणत्या संस्थेची स्थापना केली ?
उत्तर :- द मोहम्मदन लिटररी सोसायटी
प्रश्न :- पं. मदन मोहन मालवीय यांनी कोणत्या विद्यापीठाची पायाभरणी केली ?
उत्तर :- मोहम्मदन अंग्लो ओरिएंटल कॉलेज
प्रश्न :- राष्ट्रीय स्वयंसेवी संघाची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- डॉ. केशव बळीराम हेडगेवार
प्रश्न :- राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या वृत्तपत्राव्दारे जनजागृती केली ?
उत्तर :- संवाद कौमिदी
प्रश्न :- वि. दा. सावरकर यांनी कोणत्या मंदिराची उभारणी केली ?
उत्तर :- पतितपावन मंदिर (रत्नागिरी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा