१० सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
सरावासाठी प्रश्न :-
प्रश्न :- महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला ?
उत्तर :- वासुदेव बळवंत फडके
प्रश्न :- वासुदेव फडके यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण कोणाकडे घेतले ?
उत्तर :- वस्ताद लहुजी साळवे
प्रश्न :- ब्रिटिश सरकारने वासुदेव बळवंत फडके यांची रवानगी कोठे केली ?
उत्तर :- एडनच्या कारागृहात
प्रश्न :- वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यु कोणत्या साली झाला ?
उत्तर :- इ.स. १८८३
प्रश्न :- रँडचा वध कोणी केला ?
उत्तर :- दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूनी
प्रश्न :- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणती संघटना स्थापना केली ?
उत्तर :- मित्रमेळा
प्रश्न :- १९०४ साली मित्रमेळा या संघटनेला कोणते नाव देण्यात आले ?
उत्तर :- अभिनव भारत
प्रश्न :- १८५७ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर :- स्वातंत्र्यसमर
प्रश्न :- कलेक्टर जॅक्सन याचा वध कोणी केला ?
उत्तर :- लक्ष्मण कान्हेरे
प्रश्न :- बंगालमध्ये क्रांतिकारी कोणती संघटना कार्यरत होती ?
उत्तर :- अनुशीलन समिती
प्रश्न :- अनुशीलन समितीच्या किती शाखा होत्या ?
उत्तर :- पाचशेच्यावर शाखा
प्रश्न :- अनुशीलन संघटनेचे प्रमुख कोण होते ?
उत्तर :- बारीद्रकुमार घोष आणि अरविंदकुमार घोष
प्रश्न :- १८५७ ला बाँब तयार करण्याचे केंद्र कोठे होते ?
उत्तर :- कोलकत्त्याजवळील माणिकताळ
प्रश्न :- किंग्जफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना कोणी आखली ?
उत्तर :- खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी
प्रश्न :- इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून कोणी स्वत:ला गोळी झाडून घेतली ?
उत्तर :- प्रफुल्ल चाकी
प्रश्न :- क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगालबाहेर कोणी विस्तारले ?
उत्तर :- रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ संन्याल
प्रश्न :- वांची अय्यर याने कोणाला ठार केले ?
उत्तर :- अॅश या ब्रिटीश अधिकाऱ्याला
प्रश्न :- इंडिया हाऊस कोठे आहे ?
उत्तर :- लंडन
प्रश्न :- इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- पं. श्यामजी कृष्ण वर्मा
प्रश्न :- मदनलाल धिंग्रा याने कोणाला ठार केले ?
उत्तर :- कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला
प्रश्न :- गदर ही संघटना कोणी स्थापन केली ?
उत्तर :- अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी
प्रश्न :- गदर संघटनेचे प्रमुख कोण ?
उत्तर :- लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉ. पांडूरंग सदाशिव खानखोजे
प्रश्न :- गदर म्हणजे काय ?
उत्तर :- विद्रोह
प्रश्न :- कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये तरुणांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली ?
उत्तर :- हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
प्रश्न :- भगतसिंग य राजगुरु यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी कोणाला गोळ्या घातल्या ?
उत्तर :- सॉडर्स या अधिकाऱ्याला
प्रश्न :- लाहोरच्या तुरुंगात कोणाला फाशी देण्यात आली ?
उत्तर :- भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना
प्रश्न :- भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना फाशी कधी व कोठे देण्यात आली ?
उत्तर :- २३ मार्च १९३१ रोजी लाहोर येथे
प्रश्न :- पोलिसांच्या हाती शेवटपर्यंत कोण सापडले नाही ?
उत्तर :- चंद्रशेखर आझाद
प्रश्न :- अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये कोण ठार झाले ?
उत्तर :- चंद्रशेखर आझाद
प्रश्न :- चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते ?
उत्तर :- सूर्यसेन
प्रश्न :- शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी कोणाच्या सहाय्याने केली ?
उत्तर :- अनंतसिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा