Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, १ ऑगस्ट, २०२२

बालभारती,इयत्ता पहिली भाग-1,मी आणि माझे कुटुंब

*

 

 

 

 

माझे नाव-

my name-

 

 

आई

 

 बाबा

 

भाऊ

 

आजी

 

आजोबा




राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०चा विचार करून शिक्षणातील एकात्मिक दृष्टिकोनावर आधारित एकात्मिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती व अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. Learn how to learn a Lifelong Learner यांवर या शैक्षणिक धोरणात भर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर एकात्मिक शिक्षणावरही भर देण्यात आलेला आहे. 'इयत्ता पहिली' च्या या पाठ्यपुस्तकाची निर्मिती एकात्मिक स्वरूपात करण्यात आली असून भाषा, गणित, इंग्रजी आणि खेळू, करू, शिकू या विषयांचा एकत्रित विचार करण्यात आलेला आहे. आर्ट इंटिग्रेटेड (Art Integrated) आणि स्पोर्ट इंटिग्रेटेड (Sport Integrated) दृष्टिकोनाचा विचारही पाठ्यपुस्तक करताना केलेला आहे आणि त्यासाठीच खेळू, करू, शिकू हा विषयही यात सामावून घेतला आहे. बालकांमध्ये वय वर्ष आठपर्यंत एकाचवेळी अनेक भाषा शिकण्याची क्षमता असते, याचा विचार करून पाठ्यपुस्तकात गरजेनुसार दुद्विभाषिक दृष्टिकोन स्वीकारण्यात आला आहे. या विषयांचा आशय मी आणि माझे कुटुंब, पाणी, प्राणी, वाहतूक व आपले मदतनीस या विशिष्ट विषयसूत्रांभोवती (Themes) गुंफलेला आहे त्यामुळे विदयार्थ्यांना आजूबाजूच्या परिसरातून पाठ्यपुस्तकातील आशय स्पष्ट होणार आहे. विदयार्थ्यांच्या अनुभवांवर आधारित उदाहरणांसह आशय स्पष्ट करण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे. विदयाथ्र्यांच्या जीवनाशी आणि भावविश्वाशी निगडित असलेल्या अनुभवांना आशयाची जोड देऊन आणि चित्रे, रंग यांचा वापर करून पाठ्यपुस्तक आकर्षक करण्यात आले आहे. विदयार्थ्यांच्या कृतीला आणि विचाराला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक आशय हा अध्ययन निष्पत्तीला जोडण्यात आलेला आहे. कृती, खेळ, कोडी, चित्रकला, गोष्टी आणि गाणी यांचा उपयोग करून अध्ययन-अध्यापन आनंददायी होण्यासाठीचा प्रयत्न या पाठ्यपुस्तकात केलेला आहे. या पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच पाठ्यपुस्तकात अनेक प्रतीकांचा (emoji) उपयोग करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रतीके पाहूनच विदयार्थ्यांना कोणती कृती करावयाची आहे याचा बोध होऊ शकतो. याबाबतची माहिती पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीच्या भागातच देण्यात आलेली आहे. विचारक चाव्या (Thinker Keys) आणि सहा थिंकिंग हॅट्स (Six thinking huts) यांचा वापर करण्यात आलेला आहे. यांद्वारे विदयाथ्यांच्या विचारांना आणि कल्पनांना चालना मिळणार आहे त्यामुळे इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, विश्लेषणात्मक विचार, तार्किक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादी विकसित होण्यास मदत होणार आहे. या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विदयार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे. या पाठ्यपुस्तकाची अंमलबजावणी सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये करण्यात येत आहे. २१ व्या शतकातील विदयार्थी सक्षम व्हावा, यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा