हुंडाबळी तरुणीचे मनोगत
साऱ्यांनी मिळून म मला पेटवणार ए ओक्साबोक्शी रड पळून गेली. सरळ माहेरी गेल्या पुढे सासूबाई मरण माझ्या नवऱ्याने म आहे. तो तारवाला आज ही दुर्दैवी कहा साऱ्यांच नवऱ्यांना साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध अधिकार आहे फुलण्याचा मातीमधला वतनवारसा आकाशावर कोरण्याचा प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा दिमाखाने दिसण्याचा अन् सुगंधाने असण्याचा.
कवी कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती उराशी बाळगूनच मी सप्तपदी केली आणि सासरी आले. संसाराचं एक सुंदर स्वप्न मनात उगवलं होतं. पण अल्पावधीतच माझ्या स्वप्नांचा पार चुराडा झाला.
मी एक हुंडाबळी तरुणी आहे. माझे नशीब थोर म्हणून मी जिवंत आहे. तुमच्याजवळ माझी व्यथा व्यक्त करण्याची संधी लाभल्याचे मला मोठे समाधान वाटत आहे..
वास्तविक पाहता दोन वर्षांपूर्वी हे जग सोडून जाण्याचा माझ्यावर दुर्धर प्रसंग ओढवला होता. पण 'देव तारी त्याला कोण मारी? या म्हणीचा अनुभव मला त्या दिवशी आला.
अजूनही मला तो दिवस आठवला की अंगावर शहारे येतात आणि त्या प्रसंगी मला अप्रत्यक्षपणे जीवदान देणाऱ्या देवमाणसाच्या स्मरणाने मन कृतज्ञतेने ओथंबून येते.
माझ्या लग्नाला अवघी दोन वर्षे उलटली होती. परंतु लग्न झाल्यापासूनच माझ्या छळाला सुरवात झाली. कारण काय तर माझ्या वडिलांनी म्हणे ह्यांना स्कूटर दिली नाही. या लोकांनी लग्नाआधी स्कूटरची अट घातली असती तर या माणसाबरोबर लग्नही केले नसते आणि माझ्या नशिबी हे दुर्दैवी छळही आले नसते, तेव्हा मला वाटले होते की हुंडा न घेणारा हा मुलगा पुरोगामी विचारांचा असेल. पण याने लग्नानंतर हा प्रकार सुरू करून आपल्या मनाचा हीनपणा दाखवून दिला.
मी माझ्या वडिलांना पत्र लिहिले. पण ते कुणी कसे गायब केले ठाऊक नाही कारण माझ्या वडिलांना ते कधी मिळालेच नाही. माझ्या धाकट्या बहिणीचे लग्न ठरले तेव्हा आई आणि बाबा दोघेही अक्षत घेऊन माझ्या घरी आले. माझी दुर्दशा पाहून त्यांना रडूच कोसळले. पण ते तरी काय करणार? लग्नानंतर मुलीचे आईवडील अगतिक होत असतात. घरी आलेल्या माझ्या आईवडिलांना या लोकांनी जेवायलादेखील दिले नाही. त्या दिवशी मी खूप रडले. मी आईवडिलांशी काय बोलते ते पहायला माझ्यावर सक्त पहारा होता. म्हणून वडिलांशी मला थोडेही बोलता आले नाही. दुसऱ्या दिवसापासून मात्र मला एक आशा वाटू लागली. लग्नात आपल्याला बोलता येईल असे मला वाटत होते. पण या दुष्टांनी मला बहिणीच्या लग्नालाही जाऊ दिले नाही.
स्कूटर न मिळाल्याने माझ्या नवऱ्यापासून तो सासूसासऱ्यापर्यंत सर्वांनी माझा छळ करायला सुरवात केली. रोज माझ्या आईवडिलांचा उद्धार करायचे. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत मला काम करावे लागे आणि जेवायला मात्र फक्त एकदाच द्यायचे. 'एका जेवणाचे पैसे वाचवून पंधरावीस वर्षांनंतर स्कूटर घेऊ' असे बोलायचे.
पण एक दिवस माझ्या संयमाची सीमा संपली. मी सासूला म्हणाले, 'असेच होते तर माझ्याऐवजी एखाद्या स्कूटरशीच लग्न लावून घ्यायचे असते तुमच्या मुलाचे' सासू भडकली. तिने पराचा कावळा करुन माझ्या नवऱ्याला चिथावले. रात्र झाली. मी झोपायला गेले. त्या साज्यांनी मिळून मला झोपल्या स्थितीत खाटेला करकचून बांधून टाकले. रॉकेल अंगावर ओतून मला पेटवणार एवढ्यात यांचा मामा मरण पावल्याची तार आली. तार वाचताना सासू ओक्साबोक्शी रडू लागली. ती वेळ साधून मी मोठ्या शिताफीने बांधलेली दोरी सोडून तिथून पळून गेली. सरळ पोलीस स्टेशन गाठले.
माहेरी गेल्यावर आईच्या कुशीत डोके खुपसून खूप रडले. दोन-तीन वर्ष सासरी गेलेच नाही. पुढे सासूबाई मरण पावल्या. बरेच परिवर्तन होऊन आणि झाल्या गोष्टींचा पश्चाताप होऊन माझ्या नवऱ्याने मला माफी मागितली. मला न्यायला आले. मी पुन्हा गेले. तेव्हापासून सुखात आहे. तो तारवाला देवासारखा त्यावेळी आमच्या दारात तार घेऊन त्या रात्री आला नसता, तर आज ही दुर्दैवी कहाणी मला स्वर्गातच सांगावी लागली असती. माझ्या पतीला आणि जगातल्या साऱ्यांच नवऱ्यांना मला सांगायचं आहे,
हे बंध रेशमाचे धागा अतूट हाच ठेवी जपून जीवा प्राणात गुंतवावा तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा