Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

मी तुरुंग बोलतोय

              मी तुरुंग बोलतोय



 'भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी काठी हाणू ।।' हे माझे ब्रीद आहे. किती किती सुखद आणि दुःखद आठवणी माझ्या मनात भरुन आहेत म्हणून सांगू ! काही आठवणींनी माझा मलाच तिरस्कार वाटतो, तर काही स्मृतींमुळे माझा उर अभिमानाने भरून येतो. पण जेव्हा कधी या थोर व्य भगतसिंग तर 'वंदे मातरम्' म्ह तेव्हा मी परतंत्र होतो म्हणू आहे. भारतमातेच्या स्वातंत्र्यात वाटेकरी राहणार आहे कारण दु दय आ.  

                  माझे नाव काढताच काही माणसांच्या अंगात कापरे भरते. त्यांचे पाय लटपटतात. भीतीने त्यांचे अंग शहारते. कारण माझी शिस्त फार कडक आहे. माझ्याकडे इतकेकाम करावे लागते की काम करता करता काहींचा जीवही जाती. चोर, दरोडेखोर रामोशी खुनारी साना मी अशी शिक्षा करतो की त्यांना कायमची आठवण राहावी, चांगलीच अटल पदवी 

                 पण म्हणून मी निष्ठुर आहे असे मात्र तुम्ही समजू नका ही समाजकटक असलेली माणसे कठोर शिक्षेशिवाय ताळ्यावर येत नाहीत. म्हणून मला असे वागावे लागते. 

                मी नसतो तर तुमच्या दुनियेत सज्जनाना जीवन जगणे केवळ असदा झाले असते. मी सज्जनांचा पाठीराखा आणि दुर्जनाचा काळ आहे.

                गीतेत भगवान श्रीकृष्णाने हेच सांगितले आहे. ईश्वर अवतार घेतो तो दोन कारणांसाठी.. एक कारण म्हणजे सज्जनांचे संरक्षण करणे आणि दुसरे कारण म्हणजे दुर्जनांचे पारिपत्य करणे. ईश्वरी अवताराचे हे दुसरे कार्य मी करत असतो. म्हणून मी कठोर नाही, हवे तर मला तुम्ही न्यायदेवता म्हणू शकाल.

                म्हणून तर एस. एम. जोशी मला विद्यापीठ म्हणतात. कारण माझ्याकडे चर्चा चालतात, वादविवाद होतात. लोकमान्य टिळक, पंडित नेहरू यासारखे लोक माझ्याच घरी ग्रंथलेखन करतात. कुणी संगीत शिकतात तर कुणी निरनिराळ्या भाषांचा अभ्यास करतात. कोणतेही काम हलके किंवा नीच मानू नये असे मी शिकवतो. माझ्या दुनियेत मानवतेचा साक्षात्कार व अनुभवांची विविधता मिळते. 

                 तुम्हाला आठवत असेल की माझ्या पोटी श्रीकृष्णासारखे लोकोत्तर पुरुष जन्माला आले आहेत. कंसाचे अत्याचार पराकोटीला पोचले होते. त्याचे सामान्य जनतेवरील जुलूम दूर करायला भगवान श्रीकृष्णाने माझ्या पोटी जन्म घेतला. त्या रात्री आनंदाने साखळ्या तोडून मी दारे मोकळी केली होती. बाहेर दुथडी भरून वाहणारी यमुना माझ्याकडे अभिमानानं पाहत होती. श्रीकृष्णाने माझ्या कुशीत जन्म घेतला आणि मी कृतार्थ झालो.. मी पारतंत्र्यात असतो तेव्हा अशा लोकोत्तर पुरुषांना व सज्जनांना माझ्याकडे पाठवण्यात येते किंवा राजा जुलुमी असेल तर त्यावेळी स्वातंत्र्यात देखील सज्जनांवर ही पाळी येते. बरेचदा ही माणसे नुसती सज्जनच असतात असे नव्हे तर ती राष्ट्राचा गौरव असलेली अशी मोठी माणसे असतात. ती माणसे म्हणजे राष्ट्राचा प्रकाश असतात. 

                  पण पारतंत्र्यात त्यांनाही माझ्याकडे पाठवले जाते. त्यांना फटके खावे लागतात. अपमानही सहन करावा लागतो, तेव्हा मात्र माझ्या डोळ्यांतून आसवे गळतात. 

                   महात्मा गांधी माझ्याकडे याला राहले आहेत. लोकमान्य टिळक माझ्याकडे मंडालेला आले होते. सावरकर तर अंदमानला माझ्याजवळ खूप काळ राहिले. मी तर असे म्हणेन की जेवढी म्हणून मोठी माणसे झाली ती बहुतेक सर्वच माझ्याकडे राहिली आहेत. पंडित नेहरू राहले, सरदार वल्लभभाई पटेल राहले, विनोबा भावे राहले.. ज्या मुली माझ्याकडे राहायला आल्या त्या फार मोठ्या झाल्या. पण सर्वच नाही है। चांगल्या कामामुळे ज्या माझ्याकडे येतात त्याच मोठ्या होतात, कमला नेहरू, सरोजिनी देवी नायडू या अशा मुली होत. 

                   पण जेव्हा कधी या थोर व्यक्तींचे माझ्या घरी हाल व्हायचे तेव्हा मी ढसढसा रडायचो. माझा भगतसिंग तर 'वंदे मातरम्' म्हणत म्हणत माझ्याच घरी फासावर गेला. 

                   तेव्हा मी परतंत्र होतो म्हणून माझ्या घरी देशभक्तांचे हाल होत. पण आता मी स्वतंत्र झालो आहे. भारतमातेच्या स्वातंत्र्यात माझाही लहानसा वाटा आहे. स्वराज्याप्रमाणेच सुराज्यातही मी वाटेकरी राहणार आहे कारण दुष्टांना शिक्षा करणे हेच माझे ध्येय आहे.. दया तिचे नाव । सुष्टांचे पालन। आणिक निर्दालन। कंटकाचे ।।। तुकाराम.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा