संविधान दिन चाचणी
खालील १ ते १० असे सर्व दहा प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला होता ?
2 points
सातारा
महाड
*महू (मध्यप्रदेश )*
दापोली
----------------------------
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
2 points
ताराबाई
*रमाबाई*
कमला
कस्तुरबा
----------------------------
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये अर्थशास्त्रामध्ये PHD करणारे कितवे भारतीय आहेत ?
2 points
दुसरे
*पहिले*
तिसरे
सातवे
-------------------------- ---
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे कोणते मंत्री होते ?
2 points
परराष्ट्र मंत्री
संरक्षण मंत्री
*कायदा व न्याय मंत्री*
गृहमंत्री
---------------------------
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे काय म्हणून ओळखले जाते ?
2 points
भारताचे तारणहार
राष्ट्रपिता
*आधुनिक भारताचे शिल्पकार*
भाग्यविधाते
----------------------------
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कुठे जावून केला ?
2 points
नागपूर
महू
सातारा
*महाड*
----------------------------
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे राज्य घटना निर्मितीच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते ?
*
2 points
घटना समिती
*मसुदा समिती*
लोखलेखा समिती
सुकाणू समिती
----------------------------
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
*
2 points
दामोदर
*रामजी*
भिमराव
रामदास
---------–-- -----------------
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह केव्हा बौद्ध धर्म स्वीकारला ?
2 points
१९४७
*१९५६*
१९५९
१९५१
---------------------------
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयात PHD केली ?
*
2 points
कायदा
*अर्थ शास्त्र*
राज्यशास्त्र
संख्या शास्त्र
-------------------------
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केव्हा भारत रत्न या सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला ?
2 points
१९५६
*१९९०*
१९८७
१९९३
----------------------------
संविधान दिन घोषणा
संविधान दिनासाठी घोषणा -
१. जब तक सूरज चाँद
तब तक संविधान
२. विवेक पसरवू जनाजनात
संविधान जागवू मनामनात
३. समता, बंधुता, लोकशाही
संविधानाशिवाय पर्याय नाही
४. कर्तव्य, हक्कांचे भान
मिळवून देते संविधान
५. संविधान एक परिभाषा है
मानवता की आशा है
६. संविधानावर निष्ठा
हीच व्यक्तीची प्रतिष्ठा
७. संविधानाची मोठी शक्ती
देई आम्हा अभिव्यक्ती
८. मिळून सारे देऊ ग्वाही
सक्षम बनवू लोकशाही
९. संविधानाची कास धरू
विषमता नष्ट करू
१०. सर्वांचा निर्धार
संविधानाचा स्वीकार
११. संधीची समानता
संविधानाची महानता
१२. संविधानाने दिले काय?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय
१३. संविधान आहे महान
सर्वांना हक्क समान
१४. लोकशाही गणराज्य घडवू
संविधानाचे भान जागवू
१५. संविधानाचा सन्मान
हाच आमचा अभिमान
१६. भारत माझी माऊली
संविधान त्याची सावली
१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य
हाच संविधानाचा मूलमंत्र
१८. नको ताई घाबरू
चल संविधान राबवू
१९. जर हवी असेल समता
तर मनात जागवू बंधुता
२०. सबसे प्यारा
संविधान हमारा
२१. अरे, डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है
२२. संविधानाची महानता
विविधतेत एकता
२३. देशभरमे एकही नाम
संविधान! संविधान!
२४. समानता कशाची?
दर्जाची, संधीची
२५. अरे, सबके मुँह में एकही नारा
संविधान हमारा सबसे प्यारा
२६. लोकशाहीचा जागर
संविधानाचा आदर
२७. तुमचा आमचा एकच विचार
संविधानाचा करू प्रचार
============
1) दर्जाची, संधीची, समानता,
हीच संविधानाची महानता.
2) समानता संधींची,
संविधानाच्या गाभ्याची.
3) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हाच संविधानाचा हेतू हाय.
4) संविधानाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती.
5) संविधान सर्वांसाठी,
हक्कासाठी, न्यायासाठी.
6) ऊठ, नागरिका, जागा हो,
संविधानाचा धागा हो.
7) जातीयतेच्या बेड्या तोडू,
संविधानाने भारत जोडू.
8) संविधान आपले आहे कसे ?
सर्वांना न्याय देईल असे.
9) संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान.
10) संविधानाचा विचार काय ?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय.
11) संविधान देते समान पत,
एक व्यक्ती – एक मत.
12) घरात कोणत्याही धर्माचे,
समाजात मात्र संविधानाचे.
13) अत्याचार-जुलूम नष्ट करा,
संविधानाचा ध्यास धरा.
14) भारताचे संविधान,
भारतीयांचा सन्मान.
15) स्वातंत्र्य, समता, बंधुता,
संविधान सांगते एकात्मता.
16) वंचिताना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी.
17) बाबासाहेबांचे योगदान,
भारताचे संविधान.
18) लोकशाहीचे देते भान,
भारतीय संविधान.
19) भारताचा अभिमान,
संविधान ! संविधान !
20) समाजाला जागवू या,
संविधान रुजवू या.
21) सर्वांना देई दर्जा समान,
संविधानाचे काम महान.
22) संविधानाचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण.
23) आपला देश, आपले सरकार,
संविधानाने दिला अधिकार.
24) संविधान भारताचा आधार,
कुणी नसेल निराधार.
25) हक्क बजावू, कर्तव्य पाळू
प्राणपणाने संविधान सांभाळू.
26) संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही.
27) नको राजेशाही, नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही.
28) भारताचे एकच विधान,
संविधान ! संविधान !
-----------------------------
संविधान अर्थ
🌀
*प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया. अगदी एका एका वाक्यात.*
🍁🇮🇳
*भारतीय संविधानाची प्रास्ताविका*
🔅 *आम्ही*-
स्वातंत्र्यापुर्वी आपण एकत्र नव्हतो. विखुरलेले होतो. संविधानाने "मी" ला "आम्ही" केले.
🔅 *भारताचे लोक* -
विविध वतने, राजांची स्वतंत्र राज्ये, वेगवेगळे व आपापले भूभागाचे लोक एकमेकांना एकाच देशाचे समजत नसत. यांना संविधानाने एका देशाचे /भारताचे नागरिक/लोक म्हंटले.
🔅 *सार्वभौम*-
आपण आपल्या देशात आपल्याला योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत.
🔅 *समाजवादी* -
आमच्या देशात गरिब आणि श्रीमंत यांच्यात मोठी दरी असणार नाही. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असेल. संपत्तीचे काही मोजक्या लोकांच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
🔅 *धर्मनिरपेक्ष* -
विविध धर्माचे लोक असणारा देश चालवताना मात्र शासनातील व्यक्तींना काम करताना कोणताही धर्म असता कामा नये. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जाणार नाही. धर्म हा व्यक्तिपुरता असावा. तो रस्त्यावर आणु नये.
🔅 *लोकशाही गणराज्य* -
लोकांकडून / मतदानाद्वारे निवडलेला प्रतिनिधी या राष्ट्राचे काम पाहील. लोकांच्या मतालाच प्रचंड किंमत असेल. लोक ठरवतील त्यांचीच टीम लोकांचे भले करणारे काम करण्यासाठी निवडली जाईल.
🔅 *घडवण्याचा* -
वरीलप्रमाणे असणारा असा देश निर्माण करण्याचा
🔅 *सामाजिक न्याय* -
व्यक्तींमध्ये जात धर्म वंश भाषा प्रदेश जन्मस्थान किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव केला जाणार नाही माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच असेल. अस्पृश्यतेसारखी, बिहिष्कृत करण्यासारखी परिस्थिती निर्माण न होऊ देणारा.
🔅 *आर्थिक न्याय* -
कोणाही एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतन, मुल्ये दिले जाईल. देशातील प्रत्येकाला कोणत्याही भेदभावाशिवाय आपल्या आवडीप्रमाणे उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क असेल.
🔅 *राजनैतिक न्याय* -
लोकशाही प्रक्रियेत महिला, पुरुष व अन्यलिंगीय व्यक्तींना व प्रत्येक घटकास निवडणूक प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवता येईल व त्याला त्याचे मत देण्याचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार असणारा.
🔅 *विचार* स्वातंत्र्य -
देशाच्या नागरिकास स्वतंत्रपणे विचार करण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यावर कोणाचाही अंकुश असणार नाही.
🔅 *अभिव्यक्ती* स्वातंत्र्य -
प्रत्येकास आपला विचार मांडण्याची मुभा असेल. विचार मांडताना व्यक्तिद्वेषी विचार नसतील तर त्यावर कोणाचेही बंधन नसेल. लिहिणे, बोलणे, सादर करणे याचे स्वातंत्र्य असेल.
🔅 *विश्वास* स्वातंत्र्य -
प्रत्येकास आपण मानत असलेल्या मूल्यानुसार विश्वास ठेवण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यावर कोणाचे बंधन नसेल.
🔅 *श्रध्दा व उपासना* स्वातंत्र्य -
प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्मावर श्रध्दा ठेऊ शकतो व व त्यानुसार उपासना करू शकते. धर्मांतर करणे, धर्म स्वीकारणे वा नाकारण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीस असणार आहे.
🔅 *दर्जाची* समानता-
प्रत्येकास समान वागणूक दिली जाईल याची खात्री. त्याचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था.
कोणासही आपला दर्जा उंचावण्याचा अधिकार असेल. आर्थिक सामाजिक व इतर प्रकारचा दर्जा उंचावताना त्या व्यक्तीस कोणीही आडकाठी करणार नाही.
🔅 *संधीची* समानता-
प्रत्येक नागरिकास समान संधी व समान काम मिळेल याचे नियोजन असेल. कोणत्याही कारणाने कोणास संधीच उपलब्ध होणार नाही अशी स्थिती राहणार नाही. लोकांना आपली प्रगती साधता येईल.
🔅 *व्यक्तीची प्रतिष्ठा* -
नागरिकांना आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवता येईल असे वातावरण निर्माण केले जाईल. कोणाच्याही प्रतिष्ठेस ठेच लागणार नाही याची आपण काळजी घेऊ.
🔅 *राष्ट्राची एकता* -
राज्य, भाषा, वेश तसेच राज्यांचे सीमावाद सामंज्यसाने निकाली काढून देशांतर्गत फूट निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
🔅 *राष्ट्राची एकात्मता* -
विविधतेने नटलेले राष्ट्र एकात्म रहायला हवे. आम्ही एकमेकांमध्ये इतके मिसळून जावे की एकापेक्षा दुसरा वेगळा आहे असे चित्रही न दिसावे. असे आश्वासन मिळावे.
🔅 *बंधुता* -
देशातील नागरिकांनी एकमेकांशी वागताना बंधुत्व भावनेने वागावे. जगावे. प्रत्येक व्यक्ती आपलाच आहे ही भावना निर्माण व्हावी.
🔅 *प्रवर्धित करण्याचा* -
वरील सारे भारतात निर्माण करण्याचा. . .
🔅 *संकल्पपुर्वक निर्धार*-
मनामध्ये पक्का विचार करुन, ठेवून, मनात नक्की करुन. . .
आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान. . .
🔅 *अंगीकृत* -
भारतीय संविधान "स्वीकारून"
🔅 *अधिनियमित* -
या बाबतचा नियम, कायदा बनवुन
*स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा