14 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो
→ श्लोक
- मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे। मना बोलणे नीच सोशीत जावे । स्वये सर्वदा नम्र वाचे बदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ||
- हे मना, तू धीट हो, खंबीर हो. कोणी नीचपणाने बोलला, तर ते सहन कर. स्वतः नम्रतेनेच बोल. अशा वागणुकीने सभोवतालच्या लोकांना संतुष्ट कर.
→चिंतन
कोणीतरी अस्तित्वात असलेल्या लोकमतातील दोषस्थळे दाखविण्याचे व समाजातील बहुतेक लोकांना अप्रिय परंतु पथ्यकर असे विचार त्यांच्यापुढे आणण्याचे अनभिमत कार्य करण्यास तयार झालेच पाहिजे. जो तो लोकमताच्या बागुलबुवाला भिऊन दडून बसेल, तर कोणत्याही समाजाला उन्नतावस्था येणार नाही व त्याची चालू स्थितीदेखील कायम न राहता उलट त्याचा हास होईल - आगरकर
→ कथाकथन
एकीचे बळ
-पुर्वी वाराणसीत ब्रम्हादत्त राजा राज्य करीत होता. त्या काळी बोधिसत्तव लावा पक्ष्यांच्या कुळात जन्माला. - सर्व लावा पक्षी बोधिसत्वाचं ऐकत असत. बोधिसत्त्व आपल्या पक्षिगणांसह अरण्यात राहत होता. त्यावेळी एक पारधी हे लावा पक्षी चारा खात असले की त्यांच्यावर जाळ टाकून त्यांना पकडत असे. मग त्यांना बाजारात विकल्यावर आपला निर्वाह करत असे. तेव्हा एक दिवस बोधिसत्त्व आपल्या समुद्रातील लाव्यांना म्हणाला, मित्रांनो, हा पारधी रोज जर अशी आपली शिकार करायला लागला तर लौकरच आपली जात नष्ट होऊन जाईल. तेव्हा त्याला एकच उपाय आहे. त्याच्या जाळ्यात जेवढे लावे सापडतील तेवढ्यांनी सर्वांनी आपले सर्व शक्ती एकवटून ते जाळे उडवुन काटेरी झुडपावर टाकायचे नि हळूच आपली सुटका करुन घ्यायची.' सर्वांना बोधिसत्त्वाची कल्पना पसंद पडली. दुसऱ्या दिवशी पारध्यानं जाळे टाकल्याबरोबर बोधिसत्त्वाच्या सांगण्याप्रमाणे आपली सर्वशक्ती एकवटून ते जाळे ऊडवुन त्यांनी एका काटेरी झुडपावर टाकले. काही वेळानं पारधी आल्यावर त्याला ते जाळे दिसले. | पहातो तो काय एकही लावा त्यात नव्हता! त्या झुडपातून ते जाळे सोडवायला त्याला संध्याकाळ झाली असे बरेच दिवस चालेल. तो संध्याकाळी रिकाम्या हाताने घरी गेल्यावर बायको रोज बडबड करायची. दिवसभर तुम्ही कामासाठी म्हणून बाहेर असता. पण घरी येताना मात्र रिकाम्या हातानं परत घरी येता. नक्की तुम्ही दुसरी बायको केलेली दिसते. तिच्यासाठीच तुम्ही सर्व पैसा खर्च करत असणार. पारधी म्हणाला, 'बये,
तुझं म्हणण खरं नाही. मी दुसरी बायको केलेली नाही. पण मी दररोज जे लावा पक्षी पकडतो ते सर्वजण मिळून रोज माझं जाळ उडवून लावतात नि काटेरी झुडपात टाकतात. ते सोडवायला. मला संध्याकाळ होते. पण त्यांची एकी फार काळ टिकणार नाही. लौकरच त्यांच्यात भांडण होऊन आपल्याला पुन्ना लावे मिळु शकतील.' मग काही दिवसांनी एक लावा दुसऱ्याच्या डोक्यावरून गेला, त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. ते पुढे वाढतच गेले. त्यामुळे संपूर्ण समुदायात फूट पडली. मग मात्र इथे काही रहाण्यात शहाणपणा नाही हे समजून बोधिसत्त्व त्याच्याबरोबर येणाऱ्या लाव्यांना घेऊन दुसरीकडे निघून गेला. पण तिथे जे लावे राहिले तेही एकीनं राहिले नाहीत. त्यांच्यातही भांडणे सुरू झाली. त्यामुळे पारध्याला मात्र रोज लावे मिळू लागले.
→ सुविचार
• सुधारणा ही मनातून झाली पाहिजे. नुसते नियम करून सुधारणा कधीच होणार नाही.
• 'केवळ कायद्याने समाजसुधारणा होणार नाही त्यासाठी समाजप्रबोधनातून समाजमत परिवर्तन व्हायला हवे.'
• दिव्याखाली अंधार असतोच पण अनेक दिवे एका ठिकाणी आले म्हणजे एकमेकाखालचा अंधार 'दूर होतो.
→ दिनविशेष
• गोपाळ गणेश आगरकर जन्मदिन १८५६ :
-अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या आगरकरांनी आजन्म विद्यादानाचे, समाज जागृतीचे, | देशसेवेचे खडतर व्रत घेतले. ते न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, केसरीतील संपादक अशी विविध कामे करताना त्यांनी स्वतःचे 'सुधारक' नावाचे पत्र काढले. त्यातून समाजजागृतीसाठी निबंध लिहिले. आगरकरांचा प्रखर बुद्धिवाद, सत्याचा निर्भयपणे पाठपुरावा करण्याची त्यांची वृत्ती, रोखठोक तत्त्वज्ञान या गोष्टींना महाराष्ट्राने विरोध केला; परंतु त्यांनी सुचविलेल्या आचारविचारातील काही सुधारणा त्यांच्या निधनानंतर बदलत्या कालप्रवाहात समाजाने स्वीकारल्या. देव न मानणाऱ्या या समाजसेवकाचा अल्पायुष्यातच १७ जून १८९५ ला अंत झाला.
→ मूल्ये
• समाजसुधारणा, देशभक्ती, परोपकार, निर्भयपणा, तत्त्वनिष्ठा
→ अन्य घटना
• फ्रान्समधील राज्यक्रांती- १७८९
• माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण जन्मदिन - १९२०
→ उपक्रम •
-आगरकरांच्या चरित्राचे वाचन करून घ्यावे.
-मुलांच्या मदतीने शालेय मासिक, नियतकालिक प्रकाशित करावे.
समूहगान
• देश हमारा धरती अपनी, हम धरती के लाल
→ सामान्यज्ञान
- लेखक व महत्त्वाची पुस्तके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा