Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

रविवार, १६ जुलै, २०२३

17 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ



प्रार्थना 

राम रहीम को भजनेवाले, तेरे है बंदे खुदा या .... 

 → श्लोक

 - उद्धरेदात्मनात्मानं मनात्मानं नात्मानमवसादयेत्। आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः ॥ 

  - आपणच आपला उद्धार करावा. स्वतःला हीन लेखू नये. कारण आपणच आपले बंधू व हितकर्ते असतो आणि आपणच आपले शत्रूही असतो. 

चिंतन 

-शास्त्र हे असे शस्त्र आहे की, याच्या साहाय्याने मनुष्याने निसर्गावर मात केली आहे. एमर्सन

- विविध शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रांतांत अनेक शास्त्रीय शोध लावले आहेत. या शास्त्रीय शोधांमुळे मानवाचे दैनंदिन जीवनाचे अधिक सुखकारक, आरामदायी केले आहे. शास्त्र हा परमेश्वराने मानवाला दिलेला असा गुरुमंत्र आहे, की त्याच्या साहाय्याने मानवाने निसर्गाची गुपिते सहजासहजी शोधून काढली आहेत. पुराणकथांतील आश्चर्यांपेक्षाही मोठमोठी आश्चर्ये शास्त्राने निर्माण केली आहेत. शास्त्ररूपीशस्त्राच्या साहाय्याने मानवाने निसर्गावर विजय मिळविला आहे. 

 → कथाकथन

'जेथे दुसऱ्याच्या सुखाची चिंता तेथे मानवता' :

 - संत इब्राहिम शिष्यांसमवेत बसला होता. त्याने एका शिष्याला प्रश्न विचारला, “माणूस कोणाला म्हणतात?" शिष्याने उत्तर दिले, “भूक लागली असता अन्न मिळाले तर खातो, न मिळाले तर उपाशी राहतो, याला म्हणतात माणूस.” इब्राहिम म्हणाला, “हे तर तू कुत्र्याचे लक्षण सांगितलेस. कुत्राही अन्न मिळाले तर खातो, न मिळाल्यास झोपून राहतो.” त्यावर शिष्यांनी विचारले, “मग माणसाचे लक्षण कोणते ते सांगा पाहू तुम्ही?" इब्राहिमने उत्तर दिले, “प्रामाणिकपणाने कष्ट करूनही जर अन्न मिळाले नाही, तर परमेश्वराने आज रोजाचा (उपवासाचा) दिवस दिला म्हणून त्याचे आभार मानतो आणि अन्न मिळाले तर आधी दुसऱ्याला खाऊ घालून मग आपण खातो. याला म्हणतात माणूस. " दुसऱ्याचे सुख-दुःख जाणता येणारे संवेदनाशील हृदय माणसाला लाभले आहे. माणूस सहृदय आहे असे आपण म्हणतो. म्हणून आपल्या सुखाने सुखी होणे आणि दुःखाने दुःखी होणे हे जनावराचे लक्षण आहे. तर दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणे आणि त्याच्या दुःखाने दुःखी होणे हे मनुष्याचे लक्षण आहे. आणि सुख-दुःखाच्या पलीकडे जाणे, हे महापुरुषाचे किंवा संताचे लक्षण आहे. जोपर्यंत आपल्याच सुखाची चिंता सुरू होते, तोपर्यंत पशुता असते, जेथे दुसऱ्याच्या सुखाची चिंता सुरू होते, तेथे मानवतेची सुरूवात होते. आणखी एक छोटेसे उदाहरण सांगता येईल. पायवाटेवर एक मोठा दगड पडलेला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला त्याची ठेच लागते. तरीसुद्धा एकसाही असे वाटत नाही, की आपण तो दगड बाटेच्या बाजूला फेकून द्यावा, म्हणजे इतरांना तरी ठेच खागणार नाही. जो दुसऱ्याच्या सुखाचा विचार करीत नाही, त्याला माणूस म्हणत नाहीत. "जो दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो, तोच माणूस." 

सुविचार

 - • 'इतरांच्या सुखदुःखात भागीदार व्हावयास शिकणे, ही शिक्षणाची फलश्रुती होय.'


 दया ही अशी भाषा आहे की, जी बहिन्यालाही ऐकायला येते आणि मुक्यालाही समजू शकते' महावीर.

 → दिनविशेष 

• मोडी लिपीतून प्रथम मुद्रण १८०२ :

  भारतात मराठी भाषेत जो मजकूर पहिल्या प्रथम छापला गेला. तो एका शासकीय प्रकटनाच्या - स्वरूपात मोडी लिपीमध्ये छापला गेला. मुंबई येथे प्रसिद्ध होणाऱ्या 'बॉम्बे कुरिअर' या सरकारी इंग्रजी वृत्तपत्रात १७ जुलै १८०२ साली पहिल्याच पानावर एतद्देशीय वाचकांकरिता मराठी भाषेतून तत्कालिन समाजात मोडी लिपी रूढ असल्याने मोडी लिपीमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ही जाहिरात देवीच्या रोगावर प्रतिबंधक लस टोचून घेण्यासंबंधी होती. त्या जाहिरातीला प्रतिसाद देऊन पेशवे आणि त्यांच्या कुटुंबियांनीही देवीची लस टोचून घेतली. त्यानंतर १८०४ मध्ये मराठी भाषेचे व्याकरण छापण्यात आले. मोडी लिपीत अखंडित वर्णाची सोय नाही म्हणून तिचे छापण्यासाठी टाईप तयार करणे कठीण होते. त्यामुळे तिचे शिळामुद्रण चांगले होई पण टाईप जुळणी चांगली होत नसे. म्हणून तिचा वापर मर्यादित होऊ लागला. मुद्रणयुगामुळे मोडी लिपी मागे पडू लागली. सन १९५० च्या सरकारी आदेशाने शालेय शिक्षणातून ती काढून टाकण्यात आली...

  

 → मूल्ये 

 विज्ञाननिष्ठा, भूतदया, प्रेम. - 

अन्य घटना 

आधुनिक अर्थशास्त्राचे जनक अॅडम स्मिथ यांचे निधन १७९०

 रामदास बोटीला जलसमाधी १९४७, •

  → उपक्रम विद्यार्थ्यांना वैज्ञानिक उपकरणांची माहिती द्यावी. • विज्ञान प्रदर्शन आयोजित करावे. 

→ समूहगान हा देश माझा याचे भान जरासे राहू द्यारे .

सामान्यज्ञान 

भारतीय रेल्वे.        

उत्तर रेल्वे 

उत्तर-पूर्व रेल्वे 

दक्षिण रेल्वे 

• दक्षिण-पूर्व रेल्वे


मुख्य कार्यालय 

• दिल्ली •

•  गोरखपूर

•  मद्रास 

• सिकंदराबाद

भारतीय रेल्वे 

• पूर्व रेल्वे 

• पश्चिम रेल्वे 

• मध्य रेल्वे

मुख्य कार्यालय 

 कलकत्ता 

 मुंबई

 मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा