2) अंतर्गत हालचाली
■प्र. अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खूण करा
(१) अंतरंगातील मंद भू-हालचाली कोणत्या घटकावर आधारित आहेत ?
भूरूपांवर
गतीवर
दिशेवर
उत्तर -गतीवर
----------------------
(२) मंद हालचाली एकमेकींच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात,
तेव्हा काय निर्माण होतो ?
दाब
ताण
पर्वत
उत्तर-ताण
----------------------
(३) खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची कोणती
क्रिया घडावी लागते ?
ताण
दाब
अपक्षय
उत्तर- ताण
----------------------
(४) पुढीलपैकी 'वली पर्वत' कोणता?
सातपुडा
हिमालय
पश्चिम घाट
उत्तर- हिमालय
----------------------
(५) विस्तीर्ण पठाराची निर्मिती ही कोणत्या प्रकारच्या
भू-हालचालींचा परिणाम आहे ?
पर्वतनिर्माणकारी
क्षितिजसमांतर
खंडनिर्माणकारी
उत्तर- खंडनिर्माणकारी
----------------------
■प्र. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा :
(१) किनारी भागात त्सुनामी लाटा निर्माण होतात.
उत्तर : शीघ्र भू-हालचाली.
----------------------
(२) हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे.
उत्तर : मंद भू-हालचाली.
----------------------
(३) पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो.
उत्तर : शीघ्र भू-हालचाली.
----------------------
(४) प्रस्तरभंगामुळे खचदरी निर्माण होते.
उत्तर : मंद भू-हालचाली.
----------------------
■प्र. भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना पुढील विधानांचा
योग्य क्रम लावा :
(१) पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो.
(२) भूपट्ट अचानक हलतात.
(३) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.
(४) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.
(५) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.
उत्तर-१)भूपट्ट अचानक हलतात.
२) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.
३)कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.
४) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.
५) पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो.
----------------------
■ भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.
उत्तर : भूकंप होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
(१) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट
सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या
वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात.
(२) ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात.
(३) याशिवाय, भूपृष्ठाखालील खडकांत विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतात.
----------------------
■ जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालींमुळे निर्माण झाले आहेत ?
उत्तर : (१) जगातील प्रमुख वली पर्वत हे पर्वतनिर्माणकारी मंद भू-हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.
(२) उदा., हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स इत्यादी वली पर्वत हे पर्वतनिर्माणकारी मंद भू-हालचालींमुळे निर्माण झाले आहेत.
----------------------
■ भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे ?
उत्तर : (१) भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर
घरांची पडझड होते.
(२) भूकंपाच्या प्राथमिक लहरींनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर
पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात.
(३) या लहरींच्या मार्गातील पदार्थांतील कणांची हालचाल ही
लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते. त्यामुळे भूपृष्ठावरील
इमारती/घरे वरखाली हलतात व त्यामुळे घरांची पडझड होते.
----------------------
■भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते ?
उत्तर : (अ) भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम :
(१) भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात. (२) भूमिपात होऊन दरडी
कोसळतात. (३) भूजलाचे मार्ग बदलतात. (४) काही प्रदेश उंचावले
जातात, तर काही प्रदेश खचतात. (५) सागराच्या पाण्यात त्सुनामी
लाटा तयार होतात. (६) हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात.
(ब) भूकंपाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम :
(१) भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते.
(२) वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. (३) संदेशवहन व्यवस्था कोलमडते.
----------------------
■ प्र. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :
(१) हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती
कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे-पुढे हलत होत्या.
उत्तर : (१) हिमालयाच्या पायथ्याशी भूकंप झाला असता, जमीन हादरते.
(२) प्राथमिक लहरींच्या मार्गातील पदार्थांतील कणांची हालचाल
ही लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होते. याउलट दुय्यम लहरींच्या
मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप
व ऊर्ध्वगामी (वर-खाली) होत असते.
(३) भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात. त्यामुळे भूकंपानंतर हिमालयाच्या
पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी जोरजोरात मागे-पुढे हलल्या व त्यानंतर वेगाने खाली कोसळल्या.
----------------------
(२) मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.
उत्तर : (अ) मेघालय पठार निर्मिती : पृथ्वीच्या अंतर्भागात
एकमेकींकडे येणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होतात, तेव्हा भूपृष्ठावरील
कठीण खडकांवर दाब पडतो. या दाबामुळे कठीण खडकांमध्ये विभंग
होतात. भूपृष्ठावरील कठीण खडकांवर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर
विभंगांमधील भूकवचाचा भाग वर उचलला गेल्यास पर्वताची निर्मिती
होते. या वर उचलल्या गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला
'गट पर्वत' म्हणतात. मेघालय पठार हे या प्रकारे निर्माण झाले आहे.
मेघालय पठार मंद भू-हालचालींमुळे निर्माण झाले आहे.
(ब) दख्खन पठार निर्मिती : (१) भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक
होताना लाव्हारस एखादया नलिकेसारख्या मार्गातून बाहेर न पडता
अनेक भेगांतून बाहेर पडतो.
(२) ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे
पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात.
(३) भेगीय ज्वालामुखींमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात.
(४) दख्खनचे पठार हे या प्रकारे निर्माण झाले आहे. दख्खन पठार
हे शीघ्र भू-हालचालींमुळे निर्माण झाले आहे. अशा प्रकारे, मेघालय
पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे.
----------------------
■ बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.
उत्तर : (१) जागृत ज्वालामुखींचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत
असतो.
(२) भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो.
(३) त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर
तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव, घन आणि वायू पदार्थ
पृष्ठभागावर फेकले जाण्यास वाव मिळतो. म्हणून बहुतांश जागृत
ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात.
----------------------
■ बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
उत्तर : (१) अंदमान समुद्रातील बॅरन बेटावरील ज्वालामुखी हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो.
(२) या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो. (३) या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे.
----------------------
■ ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.
उत्तर : (१) भूकंप क्षेत्राचा व त्याचप्रमाणे ज्वालामुखी क्षेत्राचा विस्तार भूपट्टांच्या सीमावर्ती भागात दिसून येतो. (२) भूपट्टांची हालचाल झाल्यामुळे दाब वाढत जाऊन भूपृष्ठाखालील खडक फुटले असता, मोठ्या प्रमाणावर शिलारस तयार होतो. भूपट्टांच्या सीमावर्ती भागास तडे पडून हा शिलारस बाहेर पडतो व ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या ऊर्जेच्या उत्सर्जनामुळे भूकवचास हादरे बसू शकतात. अशा प्रकारे, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो.
----------------------
■प्र. फरक स्पष्ट करा :
(१) गट पर्वत व वली पर्वत.
1)गट पर्वत
१. अंतर्गत हालचालींमुळे
व क्षितिजसमांतर व एकमेकांच्या एकमेकांपासून दूर जाणाऱ्या
दिशेने जाणाऱ्या ऊर्जालहरी ऊर्जालहरी निर्माण होऊन
निर्माण होऊन मृदू खडकांच्या खडकांवर ताण निर्माण होऊन
विभंग तयार होतात. थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात.
२. दोन समांतर विभंगांमधील।
जातो वठोकळ्याप्रमाणे पर्वतांची निर्मिती होते.दिसणाऱ्या गट पर्वतांची निर्मिती होते.
३. उदा.,युरोपमधील ब्लॅक ३. उदा., हिमालय, अरवली,
फॉरेस्ट पर्वत, भारतातील रॉकी, अँडीज, आल्प्स.
मेघालय पठार.
2)वली पर्वत
१. अंतर्गत हालचालींमुळे क्षितिजसमांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात.
२. वळ्यांमुळे पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते.
३. उदा., हिमालय, अरवली. रॉकी, अँडीज, आल्प्स.
----------------------
■ प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी.
1)प्राथमिक भूकंप लहरी
१. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात, त्यांना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात.
२. प्राथमिक भूकंप लहरी या घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास शकतात. करू ३. प्राथमिक भूकंप लहरींच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-मागे होते.
४.प्राथमिक भूकंप लहरी या दुय्यम भूकंप लहरींपेक्षा कमी विध्वंसक असतात.
2)दुय्यम भूकंप लहरी
१. प्राथमिक भूकंप लहरींनंतर भूपृष्ठावर ज्या लहरी पोहोचतात, त्यांना दुय्यम भूकंप लहरी म्हणतात.
२. दुय्यम भूकंप लहरी या केवळ घन माध्यमातून प्रवास करू शकतात.
३. दुय्यम भूकंप लहरींच्या न मार्गातील कणांची हालचाल ने ही लहरींच्या वहनाच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी होते.
४. दुय्यम भूकंप लहरी या प्राथमिक भूकंप लहरींपेक्षा जास्त विध्वंसक असतात.
----------------------
■ भूकंप व ज्वालामुखी.
भूकंप
१. भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हा हादरा, म्हणजेच 'भूकंप' होय.
२. भूकंपामुळे थोड्या प्रमाणावर काही प्रदेश उंचावतात, तर काही प्रदेश खचतात.
३. भूकंपाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतोच असे नाही.
2)ज्वालामुखी
१. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकला जाण्याची क्रिया, म्हणजे ‘ज्वालामुखी' / 'ज्वालामुखीचा उद्रेक' होय.
२. ज्वालामुखीच्या उद्रेकातून र शंकू पर्वत किंवा ज्वालामुखीय पठारे तयार होतात.
३. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतो.
----------------------
■ ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण करा.
उत्तर : ज्वालामुखींचे सोदाहरण वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे :
(अ) उद्रेकानुसार वर्गीकरण : उद्रेकानुसार ज्वालामुखींचे पुढील दोन प्रकार पडतात :
(१) केंद्रीय ज्वालामुखी : (१) ज्वालामुखीचा उद्रेक
असताना लाव्हारसाचा मोठ्या नलिकेसारखा मार्ग तयार होतो व या
नलिकेसारख्या मार्गातून लाव्हारस बाहेर पडतो. याला केंद्रीय ज्वालामुखी
म्हणतात.
(२) ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे
पदार्थ नलिकेच्या मुखाभोवती पसरतात.
(३) केंद्रीय ज्वालामुखींमुळे शंकूंच्या आकाराचे ज्वालामुखीय पर्वत
तयार होतात.
(४) उदा., जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलीमांजारो
पर्वत.
(२) भेगीय ज्वालामुखी : (१) ज्वालामुखीचा उद्रेक होताना
लाव्हारस ज्या वेळी एखादया नलिकेसारख्या मार्गातून बाहेर न पडता
अनेक भेगांतून बाहेर पडतो. याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात.
(२) ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात.
(३) भेगीय ज्वालामुखींमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात.
(४) उदा., महाराष्ट्रातील दख्खनचे पठार.
(ब) उद्रेकाच्या कालावधीनुसार वर्गीकरण : उद्रेकाच्या
कालावधीनुसार ज्वालामुखींचे पुढील तीन प्रकार पडतात :
(१) जागृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखीचा वर्तमानात वारंवार
उद्रेक होत असतो, असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय.
उदा., जपानमधील फुजियामा व भूमध्य सागरातील स्ट्रांबोली.
२) सुप्त / निद्रिस्त ज्वालामुखी : जो ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो, असा ज्वालामुखी म्हणजे सुप्त / निद्रिस्त ज्वालामुखी होय. उदा., इटलीतील व्हिस्याव्हियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. (३) मृत ज्वालामुखी : ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही, असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय. उदा., टांझानियातील किलीमांजारो.
-------------------
■ भूकंप लहरींचे प्रकार स्पष्ट करा.
उत्तर : भूकंप लहरींचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
(१) प्राथमिक भूकंप लहरी : (१) भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात, त्यांना प्राथमिक
किंवा 'P' भूकंप लहरी म्हणतात.
(२) प्राथमिक भूकंप लहरी या भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या
दिशेत सर्व दिशांनी भूपृष्ठात प्रवास करतात.
(३) या लहरींना पुढे-मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात.
(४) या लहरींच्या मार्गातील कण लहरींच्या वहनाच्या दिशेने पुढे-
मागे होतात.
(५) या लहरी घन, द्रव व वायू या तीनही माध्यमांतून प्रवास करू
शकतात. मात्र द्रवस्वरूपातील गाभ्यातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत
बदल होतो. प्राथमिक लहरींमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे-मागे हलतात.
(२) दुय्यम लहरी : (१) प्राथमिक लहरींनंतर भूपृष्ठावर
पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा 'S' लहरी म्हटले जाते.
(२) या लहरी नाभीकेंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्यांचा वेग
प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो.
(३) या लहरी फक्त घन पदार्थांतून प्रवास करतात. मात्र द्रव
पदार्थांतून प्रवास करताना शोषल्या जातात.
(४) पदार्थांतील कणांची हालचाल या लहरींच्या दिशेशी लंबरूप
व ऊर्ध्वगामी असते.
(५) त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात.
(६) प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात.
(३) भूपृष्ठ लहरी : (१) प्राथमिक व दुय्यम लहरी भूकंपाच्या
बाह्यकेंद्रावर येऊन पोहोचल्यानंतर निर्माण होणाऱ्या लहरी, म्हणजे
भूपृष्ठ लहरी होत.
(२) या लहरी भूकवचात परिघाच्या दिशेने प्रवास करतात.
(३) त्या अतिशय विनाशकारी असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा