२२ डिसेंबर
प्रार्थना -
ॐ तत् सत् श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू..
श्लोक -
नेचि माणुसकीचे कर्म । जे दुसऱ्यांसाठी केले श्रम एरव्ही पशुपक्षीहि करिती उद्यम । आपुलाले निषिद्ध आणि सकामकर्म । तैसेची लागूनि अहं मम जगासाठी करावेत श्रम ।
ईश्वरार्पण बुध्दीने • जय - जे दुसऱ्यांसाठी कर्म केले जाते तेच खरे माणुसकीचे कर्म होय. एरव्ही पशुपक्षी आपापले उद्योग कर्म करतात. जे कर्म निषिद्ध आहे किंवा ज्या कर्मातून फळाची अपेक्षा आहे. अशा कर्माचा त्याग करावा. आपल्या मनातील अहंकार, मी पणा नष्ट करावा. ईश्वराला बुध्दी अर्पण करून जगासाठी श्रम करावेत.
→ चिंतन
- लोककला या लोकसंस्कृतीचे रक्षण करणाऱ्या जनसामान्यांच्या मुक्त शिक्षणाच्या शाळा आहेत. या कला समाजात चैतन्य आणतात, जीवनात निर्भयता आणतात. सुप्त मनात सुरेल संगीत निर्माण करून जीवन समृध्द आनंदी बनविण्याची किमया करतात. लोकसंस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करीत राहतात.
कथाकथन
'आमचा जीव वाचवा' - "उद्या झाडे तोडायला माणसे येणार. आम्ही मरणार हे वृक्षदेवी, काहीही कर आणि आमचा जीव वाचव" मध्यभागी वृक्षदेवता उभी होती. तिच्याभोवती सर्व झाडे गोळा झाली होती. तिच्या डोळ्यात अश्रु होते. व्याकूळ होऊन ती देवीची विनवणी करत होती. देवोल्या माणसांचा संताप आला. ती रागाने लाले लाल झाली. तिने ठरविले, माणसांना धडा शिकवायचा. दुसऱ्या दिवशी कुन्हाडी घेऊन माणसे आली, पण काय आश्चर्य! सर्व झाडे गवताएवढी लहान! माणसांना कळेना, झाडे कुठे गेली? ती झाडांना शोधायला निघाली. तासन्तास चालत होती. या रस्त्यावरून, या डोंगरावरून, नुसती चालत होती; पण त्यांना एकही झाड दिसेना. आता त्यांना चालवेना. पाय थकले. घामाच्या धारा वाहत होत्या. ऊन रणरणत होते. तळहाताएवढीसुध्दा सावली दिसेना. तहानेने घसा कोरडा पडला. कोठे पाणी मिळेना. विहिरी, तलाव आटले, ओढे, नद्या कोरड्या पडल्या. एकेक माणूस बेशुद्ध पडू लागला तेव्हा सगळी माणसे हादरली. हात जोडून देवीची प्रार्थना करू लागली. इतक्यात वृक्षदेवता प्रकट झाली. माणसांनी कुन्हाडी टाकल्या. देवीसमोर लोटांगण घातले. वृक्षदेवता माणसांना म्हणाली, "कळली ना तुमची चूक? आता यापुढे लक्षात ठेवा, झाडांनासुध्दा प्राण असतो. त्यांनासुध्दा भावना असतात. झाडांप्रमाणेच, प्राण्यांनासुध्दा भावना असतात. वनस्पतींना, प्राण्यांना बोलता येत नाही म्हणून ते आपले दुःख सांगू शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला वाटते की, त्यांना दुःख होतच नाही. आंधळा, मुका, बहिरा, अपंग यांचेही असेच आहे. त्यांनाही मदतीची गरज असते. तर मग त्यांना त्रास दिला, तर किती वेदना होतील त्यांना? म्हातारी व गरीब माणसे ही सुध्दा खूप दुबळी असतात. त्यांनाही दुःख देऊ नका. "तेव्हा झाडे तोडणार नाही: प्राण्यांना मारणार नाही, अनाथ अपंगाना व म्हाताऱ्या माणसांना दुःख देणार नाही, असे मला वचन द्या. तरच मी तुम्हाला मदत करीन." माणसांनी ताबडतोब देवीला तसे वचन दिले. तेव्हा, देवी अदृश्य झाली आणि सगळीकडे हिरवीगार झाडे दिसू लागली.
सुविचार • वनस्पतींनाही आपल्यासारखीच सुखदुःखे आहेत, भावना आहेत. - डॉ. बोस
- • वृक्ष लाविता मिळे सदा, आरोग्य धनसंपदा
दिनविशेष
- शाहीर पठ्ठे बापूराव स्मृतिदिन - १९४५. श्रीधर बाळकृष्ण कुलकर्णी पठ्ठे बापूराव यांचा जन्म रेठरे हरणाव, ता. पाढये 1. सांगली या ठिकाणी इ.स. १८६८ मध्ये झाला. बालपणापासून त्यांना काव्यरचनेची आवड होती. सहशिक्षा झाल्यानंतर रेठरे पाणी त्यांनी कुलकर्णीपणाचे वतनदारी काम करण्यास सुरुवात केली. पण त्यांचा ओढा तमाशा, सावणी या कलाकडे होता. श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असून, सोवळे ठेवले घालून घडी, मशाल धरली हाती तमाशाची, लाज लावली देशोधडी' असे म्हणून त्यांनी तमाशा या प्रकारात स्वतःला झोकून दिले. सम्राट पठ्ठे बापूराव असा नावलौकिक मिळविला. ते शीघ्रकवी होते. हजारो लावण्या त्यांनी रचल्या. त्यांच्या तमाशातील फडात पवळाबाई हिवरगावकर नावाच्या स्वरूपसुंदर नर्तिका होत्या. त्या दोघांनी मिळून महाराष्ट्रातील तमाशा या कलाप्रकाराला रसिकमान्यता मिळवून दिली. १९४२ साली पुण्यात पठ्ठे बापूरावांचा सत्कार करण्यात आला तेव्हा त्यांनी उद्गार काढले- “गर्द छाया तुम्ही करून दाबली. झाली संतोषित माझी कुडी." आजही बापूरावांच्या लावण्या गायल्या जातात.
मूल्ये
रसिकता, कलाप्रेम, सौंदर्य.
अन्य घटना
• भारतीय गणिती श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांचा जन्म १८८७
• भारत वर्षातील सर्वांत लहान दिवस
• उत्तरायणास प्रारंभ (आयन दिन)
उपक्रम •
पोवाडे, लावणी, लोकनाट्य इ. लोककलांची आणि लोकवाङ्मयाची, शाहिरांची मुलांना ओळख करून देणे.
समूहगान
• दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए......
सामान्यज्ञान-
देण्याची ४ • माणसाचे वय ६० वर्षाचे झाले की बहुसंख्य लोकांच्या जिभेतील चव निदर्शक निम्म्या ग्रंथी नष्ट झालेल्या असतात. त्यांची वास नष्ट झालेली असते. वयोमानाप्रमाणे माणसाच्या अंतर्कर्णातील मज्जापेशींचा -हास होऊन श्रवण मंद होत जाते. या प्रकाराला जराबधिरता' असे म्हणता जगातील महत्त्वाचे धर्म व त्यांच्या अनुयायांची संख्या (सुमारे) • ख्रिस्ती धर्म : १,९९,९५,६०,०००
• इस्लाम १,१८,८२,४२,००० * हिंदू धर्मः ८१,१३,३७,००० •बौद्ध धर्म : ३५,९९,८१,०००
• चिनी लोकधर्म : ३८.४८,०७,०००
• शीख धर्म: २,३२,५९,००० . धर्म (जुदाइझम) : १,४४,३३,०००
• कन्फ्युशिअॅनिझम : ६२,९९,०००
• जैन धर्म: ४२,१८,०००
• शिंटो धर्म: २७,६२,०००. पारसी धर्म (झोरॅस्ट्रिअॅनिझम) २५,४४,०००
• २. प्रस्थापित धर्मांपलीकडील लोक : प्रस्थापित धर्म : ७६,८१,५८,००० न मानणारे लोक निरीश्वरवादी : १५,००,८९,०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा