२३ डिसेंबर
प्रार्थना
असो तुला देवा, माझा सदा नमस्कार......
श्लोक
• तृष्णां छिन्धि, भज क्षमा, जहि मदं, पापे रति मा कृथाः। सत्यं ब्रूहनुयाहि, सेवस्थ विद्वज्जनान् ॥
• - भान्यान् मानय, विदिषोडष्यनुनय, प्रच्छादय स्वान् गुणान्, कीर्ति पालय, दुःखिते कुरू दयामेतत् सतां लक्षणम् जय - हे मानवा! तुझ्या अंतःकरणातील तृष्णा नष्ट कर, क्षमाशीलता धारण कर, गर्वाचा त्याग कर, पापवासनेने प्रेम करू नकोस, खरे बोल सज्जनतेच्या मार्गावर वाटचाल कर, विव्दानांची सेवा कर, माननीय व्यक्तींना मान दे, शत्रूशी विनयाने वाग (त्यांच्याशी व्देष ठेवू नकोस) आपल्या गुणांची स्तुती करू नकोस, कीर्तीचे रक्षण कर आणि दीनांवर दया कर ही सर्व सत्पुरुषांची लक्षणे आहेत.
→ चिंतन संसारातल्या अनंत दुःखांचे कारण असते असमाधान, अतृप्ती, अहंकार, वृथा अभिमान दुसऱ्यांचा व्देष, मत्सर, हेवादावा या गोष्टींना मनातून बाहेर काढा. आपोआप आनंद त्या ठिकाणी विराजमान होईल.
→कथाकथन '
भागो मत' स्वामी परमहंस यांनी शरीरत्याग केला. सारे शिष्य उदिवग्न झाले. स्वामी विवेकानंद तर सरळ भारत भ्रमण | पडले. केल्याने देशाटन, पंडित मंत्री समेत संचार । शास्त्र विलोकून, मनुजा चातुर्य येतसे फार // या उक्तीनुसार ते कोलकत्याबाहेर पडले. ती || निघाले. तीर्थ हिंडत हिंडत ते काशी वाराणशीस पोचले. काशीचे 'विश्वनाथ मंदिर' भारतातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र, स्वामीजी मंदिरात गेले. | दर्शन घेतले. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा मेरुमणी पाहून विवेकानंदाचे मन भरून आले. डोळ्यात आनंदाश्र चमकले. बाहेर आले तो सर्वत्र वानरसंर | पसरलेली. भगवी कफनी आणि गोरापान सतेज देह, हातातील वेद उपनिषदांची थैली पाहून वानरांना वाटले: थैलीत काही तरी खाद्यपदार्थ अस म्हणून ती स्वामीजींच्या मागे मागे येऊ लागली. आपल्या मागे भलीमोठी वानरसेना येत असल्याचे पाहून स्वामीजी मनात चरकले. ते वेगाने चालू क वानरसेना दुप्पट वेगाने चालू लागली. स्वामीजी पळू लागले. वानरेदेखील पळू लागली. आता काय करणार? कुणाची फटफजिती होत असेल तर लोक सी गंमत वाटते. कुणी मदतीला तर येत नाहीच पण लोकांच्या कुत्सित हारयाला सामोरे जावे लागते. एवढ्यात स्वामीजींच्या कानी कुणाचे तरी पडले. 'डरो मत! भागो मत!' विवेकानंदाची विवेकशीलता जागृत झाली. या शब्दांनी त्यांची विवशता संपली. चैतन्याचा झरा उफाळून वर आला. त्य टपोरे निर्मळ डोळे तेजाने चमकू लागले. ध्येयनिष्ठा, सत्यता, बंधुता, मानवता, अखंड भ्रमण, करुणा, दया, धैर्य यांची पूजा करणारे विश्वबंधुत पुरस्कर्ते विवेकानंद 'भागो मत' या शब्दांनी भानावर आले. संकटाला घाबरून पळाल्यामुळे संकटातून सुटका होत नसते. ती आणखी वेगाने मागे लागतात. एक भित्रे कुत्रे घाबरून पळू लागले की, इतर मरतुकड कुत्रीही त्याच्यामागे लागतात. पण तेच कुत्रे ताठ उभे राहिले की मागे लागलेली कुत्रीही थबकतात. विवेकानंद ताठपणे उभे राहिले. वानरे पण थबकती विवेकानंदांकडे पाहत राहिली, आणि थोड्याच वेळात निमूटपणे निघून गेली. स्वामीजींच्या जीवनाला वळण देणारा हा महत्त्वाचा क्षण होता. शिकागो येथी विश्वधर्म परिषदेतील पहिल्याच भाषणाने विश्वव्यापी घंटा निनाद वाजविणारा प्रभावशील वक्ता म्हणून जगभर त्यांचा डंका वाजला. जीवनात जेव्हा संकट उभी राहिली, तेव्हा तेव्हा निर्भयतेने, ताठ मानेने ते उभे राहिले. जीवनाचे सार्थक केले. महारथी अर्जुन असाच संभ्रमावस्थेत उभा राहिला. निष्काम बुद्धी कर्म करण्याची कला त्याने सांगितली. मनाची समता साधून ममता करा, पण कर्तव्यमार्गापासून पळून जाऊ नकोस. विवेकानंदांच्या जीवनातील तो अत्यंत महत्वाचा परिवर्तनाचा क्षण होता. 'भागो मत!"
→ सुविचार
• दुःख, निराशा, वैताग आणि विरोध यांना शरण जाऊ नये. संकटानीच मनुष्य शहाणा व धीट बनतो, त्यांना घाबरू नका
. • संकटातच स्वतःचा दुबळेपणा किंवा सामर्थ्य किती ते कळते. संघर्ष जितका विकट, तितकेच यश उज्ज्वल.
• सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात । भवतु सर्वे मंगलम्।
→ दिनविशेष
• गोंदवलेकर स्वामी महाराज समाधी दिन १९१३. ही समाधी सातारा जिल्ह्यातील दहिवडी गावानजिक असणाऱ्या गोदवले गावी इ.स. १८४५ मध्ये यांचा जन्म झाला. बालपणापासूनच भक्तिमार्गाकडे यांचा ओढा होता. त्यांचे मन प्रपंचापेक्षा परमार्थाकडेच अधिक धाव घेत | प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर ते घर सोडून बाहेर पडले. त्यांनी सर्व भारतभर भ्रमण केले. तपश्चर्या केली. सत्पुरुषांच्या सहवासात राहून ब्रह्मज्ञानाचा केला. नऊ वर्षांनी पुन्हा गोंदवल्यास परतले. आईने पुन्हा विवाहाचा आग्रह केला तेव्हा जाणून-बुजून त्यांनी एका जन्मांध वधूशी लग्न केले व तिच्याबरो समाधानाने संसार केला. अत्यंत साधी वृत्ती, लीनता, सहनशीलता, निरलसता आणि संतोष या प्रभावी सदगुणांचे ते मूर्तिमंत दर्शनच होते. प्रपंचात र परमार्थ कसा करावा, जीवनात आनंद, समाधान कसे मिळवावे अशा सर्वसामान्यांच्या समस्या उकलण्यासाठीच त्यांचा ‘रामनामजपाचा’ उपदेश हुए | त्यांची बोधवचने त्यांच्या शिष्यांनी संग्रहित केली आहेत. ती आजही सर्वांना प्रेरक आहेत. यातच गोंदवलेकर महाराजांचे महात्म्य भरलेले आहे.
मूल्ये
भक्ती, शुचिता, कर्तव्यदक्षता -
→ अन्य घटना
• प्रसिध्द कायदेपंडित, थोर देशभक्त व काँग्रेसचे अध्यक्ष रासबिहारी घोष यांचा जन्म १८४५
• श्रध्दानंद स्वामी स्मृतिदिन १९३
• उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी बंगलोर येथे विमान निर्मितीचा पहिला कारखाना हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड या नावाने स केला. - १९४०
• नटश्रेष्ठ गणपतराव बोडस यांचे निधन १९६५
• २३ डिसेंबर हा 'किसान दिन' म्हणून पाळण्यात येतो.
→ उपक्रम
• विविध धर्मातील संत महंतांची जीवन चरित्रे विद्यार्थ्यांना वाचायला देऊन मानवता धर्माची महानता विद्यार्थ्याना पटवून देणे
. समूहगान -
• राष्ट्र की जय चेतना का गान वंदे मातरम्.....
→ सामान्यज्ञान
• मानवाचा रक्तदाब साधारणपणे ८०-१२० असतो. सुदृढ माणसाच्या १०० एम.एल रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण १४ ग्रॅम अ • शरीराच्या एकूण वजनापैकी १६ टक्के वजन त्वचेचे असते. शरीराचा एकूण सुमारे १९,००० चौरस सेंटीमीटर एवढा पृष्ठ त्वचेने व्यापलेला असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा