→ प्रार्थना
असो तुला देवा, माझा सदा नमस्कार....
→ श्लोक
- जिवा कर्मयोगे जनी जन्म झाला । परी शेवटी काळमूखी निमाला || महाथोर ते मृत्युपंथेचि गेले । किती एक ते जन्मले आणि मेले ॥
- आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार या लोकात प्रत्येक जिवाचा जन्म होत असतो आणि शेवटी तो काळाच्या मुखात जातच असतो. (मरतोच) थोर पुरुषही मृत्यूच्याच मार्गाने गेले आहेत. आणि इतर कित्येक जीव तर जन्मले व या जन्मी काहीही साध्य न करताच मरून गेले. अर्थात मरण कोणालाही चुकत नाही, हेच खरे.
→ चिंतन
- सत्य बोलावे, प्रिय बोलावे, न आवडणारे सत्य बोलू नये । आवडणारे असत्यही बोलू नये, हा आपला धर्म होय. ।।
- 'सत्यं वद' हा प्राचीन कालापासून ऋषीमुनींनी आणि वडिलधाऱ्यांनी सांगितलेला एक नीतिनियम आहे. नेहमी खरे बोलावे असे आपण म्हणतो; पण नुसते खरे बोलून भागत नाही. ते बोलणे प्रिय वाटेल असेही बोलावे. त्याचप्रमाणे 'सत्य नेहमी कटू असते' असे म्हणतात, तर असे कटू, न आवडणारे सत्य बोलू नये हे जरी खरे असले, तरी त्याबरोबर आणखीही एक गोष्ट धर्म सांगतो, ती म्हणजे जरी असत्य (खोटे) आवडत असले तरी तेही कधी बोलू नये.
→ कथाकथन
'लोकमान्य टिळक' : (जन्म २३ जुलै १८५६, मृत्यू १ ऑगस्ट १९२०)
-भारतीय स्वातंत्र्याचे एक झुंजार शिल्पकार व भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार केशव तथा बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरीस झाला. वास्तविक दापोली तालुक्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गाव. पण | शिक्षकाच्या नोकरीनिमित्ताने वडिलांनी रत्नागिरीस वास्तव्य केल्याने, लोकमान्यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. प्रखर बुद्धीचा निर्भय विद्यार्थी अशी त्यांची बालपणापासून ख्याती होती. पुढे शाळा खात्यात इन्स्पेक्टर म्हणून त्यांच्या वडिलांनी रत्नागिरीस वास्तव्य केल्याने, लोकमान्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच |झाले. पुण्यास गेल्यावर अल्पावधीतच त्यांच्या मातुःश्रींचे व मॅट्रिकच्या वर्गात असताना वडिलांचे निधन झाले. मॅट्रिकला असतानाच त्यांचा सत्यभामाबाईंशी विवाह झाला. १८७२ साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. एका मित्राने त्यांच्या नाजूक प्रकृतीची चेष्टा करताच त्यांनी प्रकृती सुधारण्याची प्रतिज्ञा केली. आणि सकस आहार व व्यायाम घेऊन एका वर्षात त्यांनी आपली प्रकृती एकदम सुधारली. १८७६ साली ते बी. ए. च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व १८७९ मध्ये एल. एल. बी. झाले; पण सरकारी नोकरी किंवा वकिली न करता कॉलेजशिक्षण घेताना त्यांनी व त्यांचे सहाध्यायी गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे देश व समाजाच्या जागृतीचे एक साधन म्हणून निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या पुढाकाराने निघालेल्या पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल या राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेत त्यांनी पगार न घेता शिक्षकाचे काम पत्कारले. सन १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढून त्यातून चिपळूणकर, टिळक आदि स्नेहीमंडळींनी जनजागृतीसाठी 'केसरी' हे मराठी व 'मराठा' हे इंग्रजी अशी दोन साप्ताहिक वृत्तपत्रे प्रसिद्ध करायला सुरुवात केली. 'केसरी' व 'मराठी' या वृत्तपत्रांतून, त्याचप्रमाणे स्वतंत्र भाषणातून टिळकांनी ब्रिटिश राजवट करीत असलेल्या अन्यायांवर व अत्याचारांवर कडक टीका केल्यामुळे त्यांना अनेक वेळा कारावास भोगावा लागला.
→ सुविचार
• तुमच्याने पुढे जाववत नसेल तर पुढे जाऊ नका, पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.
• स्वच्छ होण्यासाठी फाटावे लागते, पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते आणि अंकुरित होण्यसाठी गाडून घ्यावे लागते.
• विचारांच्या बीजाला कृतीचा अंकुर फुटला पाहिजे बोलणे आणि कृती यांतील अंतर फार महत्त्वाचे आहे.
→ दिनविशेष
चंद्रशेखर आझाद जन्मदिन १९०६ :
- चंद्रशेखर आझाद हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रणी क्रांतिकारक होते. काशी राष्ट्रीय विद्यापीठात शिकत असताना त्यांचे सर्व लक्ष क्रांतिकारक चळवळीकडे होते. १९२५ च्या काकोरी कटातं त्यांनी भाग घेतला. कटातील प्रमुख व्यक्तींना | पकडण्यात येताच चंद्रशेखर भूमिगत झाले. सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने 'हिदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन'ची त्यांनी स्थापना केली व संघटनेचे सेनापतिपद स्वीकारले. हा निग्रही वृत्तीचा क्रांतिकारक अलाहाबाद येथे अॅलफ्रेंड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला.
→ मूल्ये
• देशाभिमान, स्वातंत्र्यप्रेम, नेतृत्व
→ अन्य घटना
•बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म - १८५६.
• ज्येष्ठ कादंबरीकार ताराशंकर बंदोपाध्याय यांचा जन्म १८९८.
• आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचे निधन - १९३९.
• भारतीय बनावटीच्या कल्पाक्कम अणुवीज केंद्राचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन - १९८३.
→ उपक्रम
• भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या जीवनावर कथाकथन कार्यक्रम व निबंध स्पर्धा आयोजित करावी
> समूहगान-
राष्ट्र की जय चेतना का गान बंदे मातरम्....
→ सामान्यज्ञान
• अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलँड या भागांत दर काही दिवसांनी पाऊस पडतो. विषुववृत्ताच्या साऱ्या टण्प्यात संध्याकाळी पाऊस पडतो. दक्षिण आशिया मान्सूनवर अवलंबून असतो. पाऊस पडणारे भाग सर्वस्वी डोंगरावर अवलंबून असतात. पावसाचे ढग डोंगर अडवितात. त्यासाठी डोगरांची उंची किमान हजारभर मीटर तरी आवश्यक असते. डोंगराच्या एका बाजूला कमी पाऊस पडतो. सह्याद्री व हिमालयाच्या रांगा हे याचे उदाहरण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा