Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १२ जुलै, २०२३

24 dece

 २४ डिसेंबर

प्रार्थना

ऐ मातृभूमी तेरे चरणों में सिर नवाऊँ......


श्लोक 

- सर्वाचे हात सर्वासि लागे । सर्वात जगवितो गुंतविले धागे । हे समजोनि जो गावी बागे । तोचि खरा बुध्दिमान ॥ ) जय सावित्री ग्रामगीता सर्वांनी मिळून कार्यास मदत केली पाहिजे. गावगाड्यात सर्वांनी मिळून राहिल्यास दृढ नाते निर्माण होतात. हे जो जाणतो तो खरा बुध्दिमान होय. 


→ चिंतन 

- मनाचे, बुध्दीचे सर्व दरवाजे व खिडक्या उघड्या ठेवा. दहाही दिशांनी नव्या विचारांच्या वाऱ्याचा मुक्तस्पर्श अनुभवास येतो. निः स्वार्थ प्रेमाच्या शीतल शिडकाव्याचा अल्हाददायक अनुभव येतो. त्याने अवघी जीवनदृष्टी बदलते. दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जीवन दृष्टिकोन विधायक बनतो. - रवींद्रनाथ टागोर


कथाकथन

 'साने गुरुजी' (जन्म: २४ डिसेंबर १८९९ मृत्यू : ११ जून १९५०) - आईची ममता, प्रेम, वात्सल्य यांच्या माध्यमातून सान्या मुलांची आई बनलेल्या साने गुरुजींचा जन्म कोकणातील दापोली तालुक्यातील पालगड या गावी अत्यंत गरीब परिवारात २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तरीही अत्यंत कष्ट घेऊन, माधुकरी मागून ते पालगड व औध शाळेत शिकून १९१८ साली मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुणे येथे जाऊन कष्ट करून ते बी.ए. झाले. त्यानंतर खानदेशातील अमळनेर 'तत्त्वज्ञान मंदिरा'तील गृहाच्या संचालकपदी त्यांची नेमणूक झाली. संचालकपदी नेमणूक झाल्यावर तेथील सर्व मुलांचे ते 'आई' बनले. मुलांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्यावर रागवता त्यांच्याबरोबर काम करून त्यांना स्वच्छता, टापटीप, स्वावलंबन, सारं काही शिकवले. खानदेशात नोकरी करीत असतानाच देशासाठी काहीतरी करायला हवे, याची जाणीव झाली. यासाठी त्यांनी नोकरी सोडून अविश्रांतपणे सर्वत्र हिंडून लोकजागृतीचं काम केले. देशातील अज्ञान व दारिद्रय नाहीसे हावे, यासाठी साने गुरुजींनी धडपड केली. साने गुरुजींची राहणी साधी होती. ते अत्यंत नम्र, सेवाभावी व कर्तव्यपरायण होते, ते स्वतः सूत कातून खादीचे कपडे वापरायचे. साने गुरुजींना मुले फार प्रिय होती. मुलांमध्ये ते सहजपणे मिसळत. त्यांना ते गोष्टी सांगत. मुलांसाठी त्यांनी पुष्कळ लेखन केले. नाशिकच्या तुरूंगात शिक्षा भोगत असताना 'श्यामची आई' ही कादंबरी त्यांनी लिहिली. त्यात मुलांवर सज्जनतेने संस्कार घडवलेले आढळतात. संपूर्ण कादंबरी कारुण्यमय असली तरी तितकीच ती प्रेरणादायक व बोधप्रदही झाली आहे. आचार्य अत्रे यांनी या कादंबरीवर पुढे चित्रपटही काढला व तो चित्रपट राष्ट्रपतीपदाचा मानकरी ठरला. तसेच 'श्यामची आई' या पुस्तकाच्या अनेक आवृत्याही छापल्या गेल्या. 'श्यामची आई' हे पुस्तक माणुसकीचे दर्शन घडवते. गरिबीलाही हसत हसत कसे सामोरे जायचे हे शिकविते. तसेच झाडावर, पशु-पक्ष्यांवर, फुलपाखरांवर प्रेम करायला शिकविते. साने गुरुजींनी गावोगावी फिरून स्त्रियांच्या ओव्यांचे संकलन केले आणि 'पत्री' या नावाने प्रसिद्ध केले. गोड गोड गोष्टींचे दहा भाग, भारतीय संस्कृती, क्रांती यासारखी पुस्तके त्यांनी लिहिली. तसेच 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' यासारख्या अनेक सुंदर कविताही त्यांनी लिहिल्या. अश्रूंतून अंगार फुलविण्याचे सामर्थ्य जसे साने गुरुजींच्या लेखणीत होते. तसेच तापलेल्या शब्दांचा मारा करण्याचे सामर्थ्यही त्यांच्या लेखणीत होते. त्यांचे लेखन सोप्या भाषेत व रसाळपणे केलेले असे. १९३८ साली स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी त्यांनी 'कॉंग्रेस' मासिक काढले. १९४२ च्या 'भारत छोडो' स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल शिक्षा भोगून तुरूंगाबाहेर पडल्यानंतर त्यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले करून दिले. काँग्रेसची धोरणे न पटल्यामुळे काँग्रस पक्ष सोडून साने गुरूजी समाजवादी पक्षात गेले व त्या पक्षाच्या तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी 'साधना' साप्ताहिक काढले. त्यात कुणाची गय न करता,



सुविचार 

• स्वशासन, स्वशिक्षण आणि स्वविकास ही बालशिक्षणाच्या विकासातील त्रिसूत्री आहे. - मादाम मारिया माँटेसरी • शिक्षण 


•कारासाठी असते आणि संस्कार म्हणजे माणसाच्या संवेदना अधिक तरल, व्यापक करणे आणि त्याची विवेकशक्ती जागृत करणे यासाठी असते. 


→ दिनविशेष - • विश्वभारती विद्यापीठ सुरू - १९१९. बालकांच्या सहज, कुतुहलपूर्ण आनंदी शिक्षणासाठी १९०१ मध्ये रवींद्रनाथांनी सुरू केले. • भारताच्या प्राचीन अर्वाचीन परंपरांचे मेळ घालणारे निसर्गाच्या सान्निध्यातले हे शिक्षणाचे रोपटे चांगलेच रुजले. खऱ्या अर्थाने 'हे विश्वची माझे घर' 'यत्र विश्वम् भवत्येक नीडम्' होण्यासाठी हेच ब्रीदवाक्य ठेवून रवींद्रनाथांनी विश्वभारती हे विद्यापीठ सुरू केले. निर्सर्गाची, विविध संस्कृतीची जपणूक करत विकसीत होत जाणाऱ्या इथल्या शिक्षण पध्दतीत शेती, आरोग्य, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, कलेची क्षेत्रे याबरोबर चिनी भाषा, बौध्द धर्म यांचाही अभ्यास सुरू झाला. पौर्वात्य, पाश्चिमात्य तत्वज्ञान, प्राच्यविद्या, भाषा यांचे शिक्षण देणे सुरू झाले. ब्रिटिश संस्कृतीच्या आक्रमणाखाली दडपून न जाता, भारताच्या मातीत पाय रोवून विश्वज्ञानाला गवसणी घालण्याचा एक प्रयोग यशस्वीपणाने सुरू झाला. माणसामाणसातील मानवनिर्मित भेद संपवून माणुसकी वाढविण्याचा, समाजाची सर्वांगीण उन्नती करण्याचा इथला दृढ निश्चय अनेक बदलातून विश्वभारतीने अजूनही टिकवून ठेवला आहे. 


मूल्ये 

स्वातंत्र्यप्रेम, मानवता, ज्ञाननिष्ठा. 


→अन्य घटना- 

• पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामा स्मृतिदिन १५२४ साने गुरुजी जन्मदिन १८९९ +


 उपक्रम 

 • परिसरातील सण, उत्सव, जत्रा, परंपरा यांची माहिती मिळवा.

 

→ समूहगान 

 • ये देश है वीर जवानोंका, अलबेलोंका मस्तानों का....... 



→ सामान्यज्ञान -

 • भारतातील प्रसिद्ध जादूगार - डॉ. बी. के. लेले, पी.सी. सरकार, रघुवीर, के. लाल • जादूचे खेळ - चमत्कृतीपूर्ण खेळ. अशक्य वा अस्वाभाविक वाटणारी गोष्ट वा घटना घडवून आणणे जादूच्या खेळात आवश्यक असते. अनपेक्षितता व शीघ्र हालचाली है। या खेळाचे वैशिष्ट्य आहे. रासायनिक, यांत्रिक, विद्युत इ. प्रकारच्या साधनसामग्रीने आणि हालचालीने जादूगार एकट्याने किंवा मदतनीसांच्या साह्याने निरनिराळे चमत्कार करून दाखवित असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा